Tuesday, November 29, 2016
शेतीतील गुंतवणूक वाढायला हवी
नागरी संस्थांनी स्वत:चे उत्पन्न वाढवायला हवे
आपल्या देशात शहरीकरण झपाट्याने वाढत आहे. त्यातून अनेक समस्या उभा राहत आहेत. अन्न,वस्त्र, निवार्याबरोबरच आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. शहरात सोयी-सुविधा महत्त्वाच्या आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे शहरातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांना या सोयी पुरवणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत असून या गोष्टी शहरीकरणाला मारक ठरत आहेत. याचा सांगोपांग विचार सत्ताधारी घटकाकडून होणे आवश्यक आहे. 1951 मध्ये भारतात शहरी किंवा नागरी भागात राहणारी लोकसंख्या 17 % होती तर इ.स. 2011 मध्ये एकूण लोकसंख्येपैकी 31 % लोकसंख्या शहरी भागात राहत होती. विकसित देशांमध्ये हे प्रमाण 80 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
भारतात नागरी संस्था ज्या विविध सेवा नागरिकांना पुरवितात त्यांचा दर्जा समाधानकारक नसल्याचे दिसून येते. नागरी क्षेत्रातील प्रशासनला या सेवा चांगल्या दर्जाच्या पुरविण्यात अपयश का येते, असा प्रश्न सहाजिकच मनात निर्माण होतो. या बाबत जी कारणे सांगितली जात आहेत, त्या कारणापैकी एक कारण महसुलाचा अभाव. बहुतांश स्थानिक प्रशासनाजवळ पुरेसा महसूल उपलब्ध नसल्यामुळे सोयी-सुविधा पुरवताना अडचण येते आणि ज्या काही सोयी-सुविधा पुरवल्या जातात, त्याला दर्जा नसतो.
आपल्या देशाच्या राज्यघटनेनुसार देशात त्रिस्तरीय प्रशासकीय यंत्रणा आहे. केंद्र, राज्य व स्थानिक संस्थाना आपापली जबाबदारी पार पाडता यावी म्हणून त्यांना उत्पन्न प्राप्तीची साधने उपलब्ध करून दिली आहेत. स्थानिक संस्थांना उदा. नगरपरिषद, महानगर पालिका करांच्या द्वारा जो महसूल प्राप्त होतो तो त्यांच्यावर टाकलेल्या जबाबदारीच्या तुलनेत पुरेसा नसतो. जेथे औद्योगिकरण झाले आहे तेथील महानगरपालिकांची आर्थिक स्थिती तुलनात्मक दृष्ट्या समाधानकारक असल्याचे दिसून येते. 1992 मध्ये झालेल्या महत्त्वाच्या घटनादुरुस्तीमुळे या संस्थांची कायदेशीर स्थिती निश्चित झाली. त्यांना नागरी स्थानिक संस्था म्हणून संबोधल्या गेले. स्थानिक स्वराज्य संस्था व राज्य सरकार या दरम्यान राजकोषीय संबंधही ठरवले गेले आहेत.
देशातील नागरी स्थानिक संस्थांचा एकूण महसूल (कर+राज्य शासनाकडून प्राप्त अनुदाने) बराच अल्प असल्याचे दिसते. भारतातील सर्व नागरी स्थानिक संस्थांचा एकूण महसूल जीडीपीच्या जेमतेम 1टक्का आहे! ब्राझील, द. आफ्रिका, पोलंड अशा देशांमध्ये ही टक्केवारी 4.5 ते 6च्या दरम्यान आहे. भारतातील ’नागरी स्थानिक संस्थांच्या एकूण महसूलापैकी 42 ते 44 % उत्पन्न राज्य वा केंद्राकडून अनुदानांच्या स्वरूपात असते.
भारतात संघीय वित्त व्यवस्था आहे केंद्र व राज्य शासनास व्यापक प्रमाणात उत्पन्न प्राप्तीचे स्रोत उपलब्ध आहेत. नागरी स्थानिक संस्थांना उत्पन्न प्राप्तीची साधने र्मयादित आहे. यात संपत्तीकर हे महत्त्वाचे साधन आहे; पण हा कर गोळा करणारी व्यवस्था अकार्यक्षम असून दोषपूर्ण आहे. या संस्था ज्या सेवा उदा. वीज, पाणी इ. आपल्या नागरिकांना उपलब्ध करून देतात. उपलब्ध कर स्रोत अपुरे आहेतच; पण कार्यक्षमता व भ्रष्टाचार यामुळे बहुतांश नागरी स्थानिक संस्थांचे अंतर्गत उत्पन्न पुरेसे नाही, हे कटू सत्य आहे. त्यामुळे या संस्थांना राज्य आणि केंद्रांच्या अनुदानावर अवलंबून राहावे लागत आहे.
नागरी स्थानिक संस्थांना आपले सर्व कार्य जबाबदारीने व दर्जेदार पद्धतीने करायचे असेल तर त्यांना आपले अंतर्गत उत्पन्न वाढवावे लागणार आहे. शासनानेही आपल्या स्तरावर आर्थिक सुधारणा घडवून राज्यांकडून अधिकाधिक अनुदान या नागरी संस्थांना पुरवायला हवे.
Sunday, November 27, 2016
भ्रष्टाचार्याला जरब बसावी
भ्रष्ट्राचार ही आपल्या देशाला लागलेली मोठी कीड आहे. लोकसेवक,शासकीय अधिकारी,कर्मचारी यांच्या हातून घडत असलेली ही कीड देशाला कुरतडत आहे.यात आणखीही घटक आहेत,मात्र त्यांच्यावर कारवाई करायला आपले कायदे तोकडे पडत आहे.मोदी सरकारच्या नोटाबंदीमुळे काही गोष्टी साध्य होतील, अशा आशा व्यक्त केली जात आहे. भ्रष्टाचारामुळे देशाच्या प्रगतीला अनेक प्रकारे खीळ बसत आहे. भ्रष्टाचाराचा परकीय गुंतवणूक व देशांतर्गत गुंतवणुकीवर निश्चितच परिणाम होत आहे. नवउद्योजकतेवरसुद्धा विपरीत परिणाम होतो. नवउद्योजक निरुत्साही होतात. त्यांना परवान्यांकरिता लाच द्यावी लागते. सार्वजनिक पायाभूत सुविधांचा दर्जा खालावत जातो. शासनाला कमी कर प्राप्त होतो. मूलभूत सुविधांवर खर्च करण्यास शासनाकडे कमी निधी उपलब्ध होतो. या सर्व बाबींमुळे आर्थिक वाढीचा दर मंदावतो. त्याचा स्वाभाविक परिणाम नागरिकांच्या जीवनमानावर होऊन त्याचाही स्तर खालावत जातो. म्हणजे पुढे जायचा राहोच,तो मागे खेचला जातो.
भ्रष्टाचाराचा सर्वाधिक फटका गोरगरीब आणि मध्यमवर्गीयांना सहन करावा लागतो. रोखीच्या व्यवहारातून भ्रष्टाचार मोठया प्रमाणावर होण्याची शक्यता असते. ’कॉल्युसिव्ह’ आणि ’कोअरसिव्ह’ अशा दोन प्रकारांत चालणारा भ्रष्टाचार समाजासाठी कीड आहे. भ्रष्टाचारामुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या आर्थिक, सामाजिक व राजकीय संधी हिरावल्या जातात. काही भ्रष्टाचार तर लक्षातच येत नाहीत. कॅशलेस व्यवहारांमधून भ्रष्टाचार आणि लाचखोरीला मोठया प्रमाणावर आळा बसू शकेल. लाचखोरांवर कारवाईसाठी तक्रारदारांनीही पुढे येणे आवश्यक आहे. एसीबीकडून तक्रारदारांसाठी अँप तयार करण्यात आलेले आहे. यासोबतच ई-मेल, व्हॉट्सअँप आणि टोलफ्री क्रमांकावरही नागरिक आपल्या तक्रारी देऊ शकतात.त्यामुळे तक्रारदारांनी बिनधिक्कत पुढे येऊन भ्रष्टाचाराची ही कीड थांबवण्यासाठी मदत केली पाहिजे.
नेहमी रोखीच्या स्वरूपातच लाच मागितली जाते असे नाही, तर वस्तूच्या स्वरूपातही लाच मागितली जाते. सोलापूरला झालेल्या कारवाईत एकाने दारूच्या बाटल्या मागितल्याचे, तर एका कारवाईत पंखा मागितल्याचीही उदाहरणे समोर आली आहेत. देशातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आणि भ्रष्टाचारी माणसाला शिक्षा व्हावी,यासाठी लाचलुचपत विभाग कार्यरत आहे.तक्रारी वाढल्या पाहिजेत. आणि भ्रष्टाचार करणार्यांवर शिक्षाही लवकर झाल्या पाहिजेत. यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत, मात्र याला लाचलुचपत विभागातील,न्यायालयातील मनुष्यबळ तोकडे पडत आहे. मनुष्यबळ भरती आणि सुविधा मिळायला हव्या आहेत.
लाचेच्या प्रकरणांमध्ये महिला लोकसेवकांचेही प्रमाण लक्षणीय आहे. सातार्यातील एका प्रकरणामध्ये महिला अधिकार्याला शिक्षा झालेली आहे. गेल्या काही वर्षांत सापळा कारवायांमध्ये महिलांवरही कारवाईचे प्रमाण वाढल्याची आकडेवारी आहे. यासोबतच महिला तक्रारदारांचेही प्रमाण लक्षणीय आहे. ही गोष्ट चांगली आहे. समाज जागृत होत आहे. मात्र यावरच थांबून चालणार नाही. भ्रष्टाचाराची कीड समूळ नष्ट होण्यासाठी संपूर्ण समाज जागृत झाला पाहिजे. आणि विशेष म्हणजे पैसे घेणारा आणि देणारा यांचा एकमेकांशी संपर्कच येणार नाही, अशी कामकाजाची व्यवस्था निर्माण करण्याची आवश्यकता आहे. एकमेकांचे ’इंटरेस्ट प्रोटेक्ट’ करणे थांबविण्याची गरज आहे.
शिक्षेचे प्रमाण वाढण्यासाठी खटले न्यायालयात लवकर निकाली काढणे आवश्यक आहे. अनेक खटले बरीच वर्षे प्रलंबित राहिल्याने सुटतात. जर खटल्यावर एका वर्षाच्या आत न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली, तर त्यामध्ये शिक्षा लगेच होते, असे सर्वेक्षणाने समोर आलेले आहे. पोलीस आणि महसूल विभागात सर्वाधिक सापळा कारवाया होतात. या विभागांचा नागरिकांशी सर्वाधिक संपर्क येत असल्यामुळे तेथे लाचखोरीचे प्रमाण अधिक आहे. यापूर्वी न्यायालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात आलेल्या कारवाईचे खटले प्रलंबित राहत होते. त्यामुळे नागरिकांचा विश्वास कमी होऊ लागला होता. मात्र एसीबीच्या महासंचालकांनी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची भेट घेऊन हे खटले लवकर निकाली काढण्याची विनंती केली होती. उच्च न्यायालयाने 2014मध्ये सर्व विशेष न्यायालयांना सूचना देऊन दरमहिन्याला किमान सहा खटले निकाली काढण्यास सांगितले होते. त्याचा चांगला परिणाम दिसून येत आहे. अलीकडच्या काळात शिक्षेचे प्रमाण वाढू लागले आहे. तसेच, खटल्यांच्या निर्गतीचेही प्रमाण वाढू लागले आहे. एरवी सात ते आठ वर्षांपर्यंत चालणार्या खटल्यांचा कालावधी दोन वर्षांपर्यंत आणण्याची तरतूद नवीन कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. याचा वेग आणखी वाढला पाहिजे. भ्रष्टाचार्याला धाक बसावा, यासाठी शिक्षाही तितकीच कठोर व्हायला पाहिजे. यासाठी कायद्यात सुधारणा होणे आवश्यक आहे.
Saturday, November 26, 2016
मुलींचा सन्मान करणार्या पिपलांत्रीचा आदर्श घ्या
देशातल्या कन्या भ्रूणहत्या रोखण्यासाठी केवळ कायदेशीर कारवाया करून भागणार नाही तर लोकांच्या मानसिकेतही बदल घडविण्याची आवश्यकता आहे. देशातली न्यायालयेदेखील वारंवार हेच सांगत आहेत. समाजाला मुलींचे महत्त्व कळायला हवे. यासाठी जनजागृती महत्त्वाची आहे. एका बाजूला लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित होत असताना दुसर्या बाजूला मुलींची संख्या झपाट्याने कमी होत आहे. हे विदारक चित्र थांबायला हवे. असं घडलं तर देशातल्या मुली सुरक्षित राहतील, अन्यथा समाजात अराजकता माजेल. दिल्लीसह देशातल्या विविध भागात होत असलेले अत्याचार आपल्याला धोक्याची घंटा असल्याचेच सूचित करत आहे. कायद्याने सगळेच प्रश्न सुटतात असे नव्हे तर लोकांमधली जागृती म्हत्त्वाची ठरते. आपल्या देशातल्या काही भागात स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी जरूर प्रयत्न होत आहेत, आणि त्यांचा चांगला रिझल्ट आपल्या हाती येत आहे. असेच एक उदाहरण आहे ते राजस्थानमधल्या पिपलांत्री या छोट्याशा गावातले. हे गाव फक्त मुली वाचवण्याचा प्रयत्न करत नाही तर त्याचबरोबर पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाचे कार्यही करत आहे. विशेष म्हणजे हे सारे सामुदायिक सहयोगातून होत आहे.
राजसमंद जिल्ह्यातल्या पिपलांत्री या गावातले माजी सरपंच श्यामसुंदर पालीवाल यांच्या मुलीच्या मृत्यूनंतर या महत्त्वपूर्ण कार्याला सुरूवात झाली. सरपंचांनी आपल्या मुलीच्या स्मृतीप्रित्यर्थ झाडे लावायला सुरूवात केली. यामुळे लोकांमध्ये स्फुलिंग चढले. गावाने बदलाच्या स्वरुपात पाहात अंगीकार केला. पिपलांत्री गावात एकाद्या घरात मुलगी जन्माला आली तर गावातले लोक तिच्या जन्माचे स्वागत एकशे अकरा झाडे लावून करतात. फक्त झाड लावून ही मंडळी गप बसत नाही तर त्याच्या संरक्षण आणि संरक्षणाची जबाबदारीही स्वीकारतात. या अनोख्या उपायांचे जोरदार स्वागत होत असून साहजिकच गाव हिरवाईने नटून गेले आहे. गावाने चक्क हिरवा शालू पांघरला आहे, असे चित्र गावात गेलेल्या पाहुण्या-नातेवाईकांना किंवा भेट द्यायला गेलेल्या लोकांना वाटल्याशिवाय राहत नाही. या गावात दोन मोठे बदल घडले आहेत. पहिला बदल हा मुलींच्याबाबतीत सामाजिक दृष्टीकोन ठेवून आलेला आहे. दुसरा बदल म्हणजे मोठ्या प्रमाणात फळवृक्षांची लागवड झाल्याने गाव पर्यावरणाच्या दृष्टीने समृद्ध झाले आहे.इतकेच नव्हे तर गावातल्या लोकांना या माध्यमातून रोजगारही उपलब्ध झाला आहे.
गावातल्या एखाद्या घरात मुलगी जन्माला आली तर तिच्या आई-वडिलांना एक शपथपत्र लिहून द्यावे लागते. यात काही अटी आहेत. उदाहरणच द्यायचं झालं तर मुलगी कायद्यानं सज्ञान झाल्याशिवाय तिचा विवाह करायचा नाही. तिची मधेच शाळा सोडायची नाही आणि तिच्या जन्माच्या वेळी लावलेल्या झाडांचे संगोपन करायचे इत्यादी इत्यादी. या सकारात्मक कार्याबरोबरच आणखी एक महत्त्वाचे काम केले जाते, तेम्हणजे मुलीच्या वडिलांकडून दहा हजार रुपये घेतले जातात. त्यात गावाने गोळा केलेल्या वर्गणीतून 21 हजार रुपये मिसळले जातात. ही सर्व रक्क्म मुलीच्या नावाने ती वीस वर्षांची होई तोपर्यंत बँकेत ठेव स्वरुपात ठेवली जाते. हुंडा हा समाजाला लागलेला कलंक आहे. स्त्री भ्रूण हत्येमागे हेही एक कारण आहे. त्यामुळे तिच्या भविष्याच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने ही रक्कम ती जन्मताच तिच्या नावावर ठेवली जाते. वीस वर्षात ही रक्कम दुप्पट-तिप्पट होते.
स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी आपल्या देशात कडक कायदे आहेत. गर्भलिंग तपासणी प्रतिबंध कायदा आहे. इतकेच नव्हे तर स्त्री भ्रूण हत्या करणार्याला आणि करायला लावणार्याला म्हणजे दोघांनाही कायद्यानम शिक्षेची तरतूद आहे. पण तरीही समाजातली ही स्त्री भ्रूण हत्या करण्याची मानसिकता थांबलेली नाही. उलट ती वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. गेल्या तीन दशकात जवळपास सव्वा कोटी स्त्री भ्रूण हत्या झालेल्या आहेत. याचा परिणाम आपल्या समोर असून मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमालीची घटलेली आहे. आजच्या घडीला एक हजार मुलांमागे सरासरी नऊशे चौदा इतकी मुलींची संख्या राहिलेली आहे. पुढच्या काळासाठी हे काही चांगले संकेत नव्हे, हे सांगायला काही भविष्यवेत्त्यांची गरज नाही.
एकिकडे मुलींच्याबाबतीत अशी पशूवत वागणूक चालली असताना आणि मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या चिंताजनक अवस्थेत पोहचली असताना राजस्थानातल्या पिपलांत्रीसारख्या छोट्याशा गावात मुलीचा केवळ सन्मान केला जात नाही तर तिच्याबरोबरच पर्यावरण वाढीचीही जबाबदारी सामुदायिकरित्या उचलली जात आहे. गावाने समाजाला खूप मोठा संदेश दिला आहे. पर्यावरण राहिले नाही तर सजीवसृष्टी धोक्यात आहे. आणि समाजात मुली नसतील तर समाजच उरणार नाही. मुलगी राहिली आणि शिकली तरच समाज पुढे जाणार आहे. हा परस्परांशी सांगड घालणारा संदेश गाव देत आहे. एक छोट्ंस गाव हे करू शकतं तर त्यांच्यापेक्षा किती तरी अधिक शिकलेल्या, आधुनिक आणि विकसित समजल्या जाणार्या शहरांनी करायला काय हरकत आहे? सर्व काही शक्य आहे, पण एका मजबूत अशा इच्छाशक्तीची गरज आहे.
जतच्या मोहिनी चव्हाणला आशियाई स्पर्धेत कास्यपदक
जत तालुक्यातील उमदी येथील सर्वोदय शिक्षण संस्था संचालित महात्मा विद्यामंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी मोहिनी दरेप्पा चव्हाण (वय 17) हिने जपान येथे सुरू असलेल्या युवा आशियाई वेटलिप्टिंग स्पर्धेत भारताला कास्यपदक मिळवून दिले. याअगोदरच्या दोन वेळा युवा आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून दिले आहे. पंधरा दिवसांपूर्वीच मोहिनीने पेनांग (मलेशिया) येथे झालेल्या युथ कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते.
महिन्याभरात आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सलग दोनदा पदके पटकावली आहेत. जतसारख्या दुष्काळी तालुक्यात अगदी सामान्य कुटुंबात जन्मलेल्या मोहिनीने भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवला आहे. आशियाई स्पर्धेत मोहिनीने स्नॅच प्रकारात,68, तर जर्क प्रकारात 85 किलो असे एकूण 153 किलो वजन उचलले आहे. या स्पर्धेत 48 किलो वजनी गटात मोहिनीने भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे.
मोहिनी चव्हाण ही उमदी येथील एम.व्ही. हायस्कूलची विद्यार्थीनी आहे. ती सध्या पतियाळा(पंजाब) येथील भारतीय क्रीडा प्राधिकरण केंद्रात सराव करते आहे. तिथून ती परस्परच जपानला गेली आहे.तिला आंतरराष्त्रीय वेटलिफ्टिंग प्रशिक्षक संजय नांदणीकर मार्गदर्शन करत आहेत. जत तालुक्यातल्या मोहिनीने आपल्या कामगिरीच्या जोरावर या स्पर्धेत सर्वांवर खऱया अर्थाने मोहिनी घातली. यापूर्वी थायलंडमधील आशियाई स्पर्धेत चौथी, दोहा येथील आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक, जानेवारीत पार पडलेल्या जागतिक वेटलिफ्टिंगमध्ये सातवी आलेल्या मोहिनीने या स्पर्धेत कामगिरी उंचावत देशाच्या नावावर पदक नोंदविले.
मोहिनीची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. जत तालुक्यातील उमजी हे तिचे मूळ गाव. तेथील एम. व्ही. हायस्कूल व ज्यु. कॉलेजमध्ये ती अकरावीच्या वर्गात शिकते आहे. तिच्या वडिलांचे सहा महिन्यांपूर्वीच देहावसान झाले असून, आई नर्सिंगचे काम करते. मोहिनी वेटलिफ्टिंग सोडण्याच्या विचारात असतानाच तिला हे पदक मिळाले आहे.
मोहिनीला आर्थिक मदतीची गरज
वेटलिफ्टिंगमध्ये मोहिनीला चांगले भविष्य असले, तरी आर्थिक परिस्थितीअभावी तिच्या कामगिरीवर मर्यादा येत आहेत. या क्षेत्रातील जाणकारांच्या मते आगामी काळात ऑलिंपिकसाठी ती भारताची ओळख ठरू शकते. त्यादृष्टीने तिला सरकारकडून मदत मिळणे आवश्यक आहे. वेटलिफ्टिंग खेळत राहावे अथवा नाही, या सीमारेषेवर असलेल्या मोहिनीला सरकार मदत करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
मोहिनी चव्हाण हिचे वडील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षक होते. वर्षभरापूर्वी त्यांचे आकस्मिक निधन झाले. त्यानंतर प्राचार्य एस. के. होर्तीकर यांनी तिला मदत केली. मोहिनी हिला एक भाऊ, बहीण असून,तिची आई प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सेविका आहे.
सहकारी बँकांची कोंडी फोडा
केंद्र सरकारने जिल्हा सहकारी बँकांना नोटा बदलीची परवानगी दिली नसल्याने शेतकरी व ग्रामीण अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला असून सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. ग्रामीण भागात अनेक शेतकर्यांची केवळ जिल्हा सहकारी बँकांमध्येच खाती आहेत. त्यामुळे लवकरात लवकर या बँकाची कोंडी फोडली पाहिजे. या बँकांवर राजकीय नियंत्रण आहे. काही जिल्हा सहकारी बँकांमध्ये घोटाळे झाले आहेत. असे असले तरी त्याची सर्व बँकांना शिक्षा देणे योग्य नाही. ग्राहक सभासदांना याचा मोठा फटका बसत आहे. सध्या या सहकारी बँकांची मोठी कोंडी झाली आहे. चार दिवस जे पैसे जमा झाले त्याचे काय करायचे?, ते पैसे जमा झाल्यानंतर त्याचे व्याज, त्यावरील विमा खर्च याचे काय करायचे?असा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. सरकारचा सहकाराकडे पाहण्याचा दृष्टीकोन न्यायाचा नाही.त्यामुळे सहकार क्षेत्राबाबतचे धोरण बदलायला हवे, असे म्हटले जात आहे.सहकारी बँकांनीही सहभागी व्हावे, असे सरकारने सांगितल्याने त्यांच्याकडे चार हजार कोटी जमा झाले आहेत. त्यानंतर सरकारने सहकारी बँकांना व्यवहार बंद करण्यास सांगितले.त्यामुळे सरकारने यावर तोडगा काढण्याची आवश्यकता आहे. खरेतर खेड्यातील माणूस मोठया बँकेत जात नाही, त्याच्या गावात सहकारी सोसायटी आहे.या ग्रामीण भागातील लोकांचे हाल होऊ नयेत, इथले व्यवहार सुरळीत होऊ द्यात.
पतंगापासून वीजनिर्मिती
आकाशात उडणारे रंगी-बेरंगी पतंग सगळ्यांनाच लुभावतात.जगभरातल्या मुलांसाठी तो एक खेळ आहे, तर मोठ्यांसाठी पतंग उडवणं ही एक कला आहे.भारतात फक्त पतंग उडवले जात नाही, तर लढवलेदेखील जातात. आम्ही या कलेला स्पर्धात्मक खेळामध्ये रूपांतरित केले आहे. इथे पतंग उडवणं म्हणजे फक्त उडवणं, असा अर्थ होत नाही.इथे पतंगबाजी होते.पहिल्या महायुद्धात पतंगांचा वापर शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी केला गेला. अठराव्या शतकात त्यांचा वापर संशोधनासाठी केला गेला. बेंजामिन फ्रँकलिन, अॅलेक्झांडर विल्सन यांनी हवामानाच्या अभ्यासासाठी त्याचा वापर केला, तर राईटबंधू यांनी त्याचा वापर करून पुढे विमानाचा शोध लावला. विल्यम एडी व लॉरेन हारग्रेव्ह यांनी हवामानाचा अभ्यास त्याच्या मदतीने केला. इतिहासात असे अनेक प्रसंग घडले.भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातला एक दिलचस्प प्रसंग आहे. सायमन कमिशन भारतात आला होता. आपल्या बैठकीच्यानिमित्ताने तो लखनौलादेखील गेला होता.कुठलाही स्वातंत्र्य सैनिक जवळपासदेखील फिरकू शकणार नाही, अशा पद्धतीची खास व्यवस्था करण्यात आली होती. त्यादिवशी अचानक बैठकीच्या ठिकाणी काही पतंग तुटून पडले. त्या सगळ्यांवर लिहिलं होतं-सायमन गो बॅक.
पतंग ही अशी पहिली वस्तू आहे, जिला माणसाने आकाशात उडवू शकला आणि आपल्या इशार्यावर नाचवूही शकला.पतंगाचा उपयोग हवामान जाणून घेण्यासाठी आणि हेरगिरी करण्यासाठीदेखील केला गेला.
आकाशात उडणारे पतंग शास्त्रज्ञांसाठीदेखील आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिले.विविध प्रकारच्या पतंगांनी त्यांना फक्त उडण्याच्या सिद्धांत शिकवला नाही तर त्यांना एकाद्या वस्तूला उडण्यालायक बनवण्यासाठीचे एरो-डॉयानमिक डिझाईनसुद्धा शिकवलं.ढगांनी आच्छादलेल्या एका दुपारी ज्यावेळेला बेंजामिन फ्रँकलिनने रेशमी दोरीने पतंग उडवला, त्यावेळेला त्याला आकाशातल्या विजेचे रहस्य उलगडले.आता शास्त्रज्ञ पतंगाचा आणखी एक उपयोग करण्यासाठी सज्ज झाले आहेत.ते पतंगापासून वीजनिर्मिती करणार आहेत.वास्तविक यादिशेने गेल्या 35 वर्षांपासून प्रयत्न चालू आहेत.पण आता या तंत्रज्ञानाने एक फलस्वरूप प्राप्त केले आहे. स्कॉटलंडमध्ये एक असं विद्युत संयंत्र बसवलं जात आहे, ज्यातून फक्त पतंगापासून वीजनिर्मिती केली जाणार आहे.या संयंत्राद्वारा शास्त्रज्ञ 500 मेगावॉट वीजनिर्मिती करू शकणार आहेत.यासाठी क्रॉसविंड तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. प्रत्येक टर्बाईनला 40 फुटाचे दोन विशालकाय पतंग जोडलेले असतील.पतंग हवेत उडत असतील त्यावेळेला टर्बाईन चालतील आणि वीज तयार होईल. यातील आणखी एक खास गोष्ट अशी की,यापासून वीज निर्माण होताना पर्यावरणाला कोणत्याही प्रकारचा धोका पोहचणार नाही. आणि दुसरे म्हणजे ती सगळ्यात स्वस्त पडणार आहे.असं म्हटलं जात आहे की, सध्या विद्युत निर्मितीसाठी जी गुंतवणूक करावी लागत आहे ,त्यापेक्षा या तंत्रज्ञानाने वीज निर्मितीसाठी फक्त दहा टक्के खर्च येणार आहे. म्हणजे अशा प्रकारे जर वीज उत्पादन सुरू झाले तर सरकारला सबसिडीसुद्धा द्यावी लागणार नाही.
या प्रयोगासाठी स्कॉटलंडची निवड केली आहे, याला आणखी एक कारण आहे. इथे वर्षभर एकाच वेगाने हवा वाहात असते.त्यामुळे भारतासारख्या देशात हवेचा वेग आणि दिशा सतत बदलत असते, अशाठिकाणी हे तंत्रज्ञान कितपत फायद्याचं आहे,याची आपल्याला अजून कल्पना नाही.पण एकदा का हा प्रयोग यशस्वी झाला तर या तंत्रज्ञानात सुधारणा होत राहतील, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.पण आपल्याला दिलासा देण्यालायक गोष्ट अशी की, स्वस्त ऊर्जा आणि पर्यावरण हित जोपासणार्या वैकल्पिक साधनाच्या शोधाची मोहिम यशस्वी होताना दिसत आहे. गेल्या काही वर्षात सौर ऊर्जेवरील खर्च कमी होत आहे. पवन ऊर्जेच्या उत्पादनाचा विस्तार वाढत आहे.दुसरीकडे विद्युत बिल कमी येणाच्यादृष्टीने वापरात येणार्या वस्तू बनविण्यात आपण यशस्वी होत आहोत.त्यामुळे विजेचा वापर कमी होऊ लागला आहे. हा सिलसिला असाच राहिला तर पर्यावरणातील बदल आणि ग्लोबल वार्मिंगचे आव्हान आपण सहजगत्या पेलू शकू. यापूर्वी वीज निर्मितीत रंगीबेरंगी पतंगदेखील आपली भूमिका वटवतील, याचा विचारदेखील कोणी केला नव्हता.
पतंग ही अशी पहिली वस्तू आहे, जिला माणसाने आकाशात उडवू शकला आणि आपल्या इशार्यावर नाचवूही शकला.पतंगाचा उपयोग हवामान जाणून घेण्यासाठी आणि हेरगिरी करण्यासाठीदेखील केला गेला.
आकाशात उडणारे पतंग शास्त्रज्ञांसाठीदेखील आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिले.विविध प्रकारच्या पतंगांनी त्यांना फक्त उडण्याच्या सिद्धांत शिकवला नाही तर त्यांना एकाद्या वस्तूला उडण्यालायक बनवण्यासाठीचे एरो-डॉयानमिक डिझाईनसुद्धा शिकवलं.ढगांनी आच्छादलेल्या एका दुपारी ज्यावेळेला बेंजामिन फ्रँकलिनने रेशमी दोरीने पतंग उडवला, त्यावेळेला त्याला आकाशातल्या विजेचे रहस्य उलगडले.आता शास्त्रज्ञ पतंगाचा आणखी एक उपयोग करण्यासाठी सज्ज झाले आहेत.ते पतंगापासून वीजनिर्मिती करणार आहेत.वास्तविक यादिशेने गेल्या 35 वर्षांपासून प्रयत्न चालू आहेत.पण आता या तंत्रज्ञानाने एक फलस्वरूप प्राप्त केले आहे. स्कॉटलंडमध्ये एक असं विद्युत संयंत्र बसवलं जात आहे, ज्यातून फक्त पतंगापासून वीजनिर्मिती केली जाणार आहे.या संयंत्राद्वारा शास्त्रज्ञ 500 मेगावॉट वीजनिर्मिती करू शकणार आहेत.यासाठी क्रॉसविंड तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. प्रत्येक टर्बाईनला 40 फुटाचे दोन विशालकाय पतंग जोडलेले असतील.पतंग हवेत उडत असतील त्यावेळेला टर्बाईन चालतील आणि वीज तयार होईल. यातील आणखी एक खास गोष्ट अशी की,यापासून वीज निर्माण होताना पर्यावरणाला कोणत्याही प्रकारचा धोका पोहचणार नाही. आणि दुसरे म्हणजे ती सगळ्यात स्वस्त पडणार आहे.असं म्हटलं जात आहे की, सध्या विद्युत निर्मितीसाठी जी गुंतवणूक करावी लागत आहे ,त्यापेक्षा या तंत्रज्ञानाने वीज निर्मितीसाठी फक्त दहा टक्के खर्च येणार आहे. म्हणजे अशा प्रकारे जर वीज उत्पादन सुरू झाले तर सरकारला सबसिडीसुद्धा द्यावी लागणार नाही.
या प्रयोगासाठी स्कॉटलंडची निवड केली आहे, याला आणखी एक कारण आहे. इथे वर्षभर एकाच वेगाने हवा वाहात असते.त्यामुळे भारतासारख्या देशात हवेचा वेग आणि दिशा सतत बदलत असते, अशाठिकाणी हे तंत्रज्ञान कितपत फायद्याचं आहे,याची आपल्याला अजून कल्पना नाही.पण एकदा का हा प्रयोग यशस्वी झाला तर या तंत्रज्ञानात सुधारणा होत राहतील, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.पण आपल्याला दिलासा देण्यालायक गोष्ट अशी की, स्वस्त ऊर्जा आणि पर्यावरण हित जोपासणार्या वैकल्पिक साधनाच्या शोधाची मोहिम यशस्वी होताना दिसत आहे. गेल्या काही वर्षात सौर ऊर्जेवरील खर्च कमी होत आहे. पवन ऊर्जेच्या उत्पादनाचा विस्तार वाढत आहे.दुसरीकडे विद्युत बिल कमी येणाच्यादृष्टीने वापरात येणार्या वस्तू बनविण्यात आपण यशस्वी होत आहोत.त्यामुळे विजेचा वापर कमी होऊ लागला आहे. हा सिलसिला असाच राहिला तर पर्यावरणातील बदल आणि ग्लोबल वार्मिंगचे आव्हान आपण सहजगत्या पेलू शकू. यापूर्वी वीज निर्मितीत रंगीबेरंगी पतंगदेखील आपली भूमिका वटवतील, याचा विचारदेखील कोणी केला नव्हता.
काही करायचं राहून गेलं: चॅकी चान
हाँगकाँगमध्ये जन्मलेल्या चॅकी चान यांना बालपणीच मार्शल आर्ट ट्रेनिंग स्कूलमध्ये दाखल केलं होतं.त्यांचे वडील चार्ल्स फ्रान्सीसी दूतावासात स्वयंपाक्याचे काम करत. त्यांच्या आई लिलीदेखील त्याच दूतावासात सफाई कामगार म्हणून कामाला होत्या.बालपण त्यांच्यासाठी सुखाचं नव्हतं.शाळेला जायला लागून नुकतंच वर्ष झालं होतं. वडिलांनी मुलाला अभ्यासात रस नाही, असे वाटल्याने त्यांना प्राथमिक शाळेतून काढून ड्रामा अॅकॅडमीत घातलं. चान सात वर्षाचे असतील, वडिलांना ऑस्ट्रेलियाच्या दूतावासात निकरी मिळाली. मुलाच्या ट्रेनिंगला कसली बाधा येऊ नये म्हणून त्याला तिथेच होस्टेलला घातले आणि दोघे आई-वडील परदेशात निघून गेले.
चान मार्शल आर्टसोबतच गायन आणि अभिनयाचेही धडे गिरवत होते. कष्ट करावे लागत होते. चान सांगतात, मी पहाटे पाचला उठायचो. रात्री उशिरापर्यंत एकामागून एक क्लास सुरूच असायचे.चुकलो की, मार खायला लागायचा.रोजच्या खर्चा-पाण्यासाठी छोट्या-मोठ्या कार्यक्रमात स्टंट करावे लागायचे. आई-वडील परदेशात, त्यामुळे गोष्टी शेअर करायला जवळ कोणी नव्हतं. माझ्याजवळ पैसे नसायचे. मग एका एका पाऊंडसाठी खतरनाक स्ट्ंट करायला लागायचे.
कळत्या वयात त्यांना त्यांच्या आई-वडीलांविषयी अशी काही माहिती मिळाली की, ती ऐकून ते दंगच झाले. त्यांचे वडील जासूस असल्याचे कळले. पहिल्या लग्नापासून त्यांच्या वडिलांना दोन मुलं होती. त्यांच्या आईलाही दोन मुली होत्या.दोघेही आपापल्या मुलांना चीनमध्ये सोडून 1949 साली हाँगकाँगला आले. चान म्हणतात,माझे वडील कूक आहेत, एवढंच मला माहित होतं. मात्र ते जासूस आहेत, कळल्यावर मला फार मोठा धक्का बसला.
मार्शल आर्ट शिकल्याने त्यांनी अॅक्शनमध्ये प्राविण्य मिळवले. त्यामुळे त्यांना शाळेत असल्यापासूनच चित्रपटांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका मिळत गेल्या. 1971 मध्ये त्यांना पदवी मिळाली. तेव्हा ते अवघे 17 वर्षांचे होते. या दरम्यानच्या काळात त्यांनी खतरनाक स्ट्ंट दृश्यांमधले बारकावे शिकून घेतले. त्यांना काही मार्शल आर्ट चित्रपटांमध्ये काम मिळाले, मात्र ते प्रेक्षकांमध्ये आपली ओळख निर्माण करू शकले नाहीत. त्यामुळे ते आपल्या कामात खूश नव्हते. शेवटी त्यांनी हाँगकाँगला रामराम ठोकला आणि आई-वडिलांकडे ऑस्ट्रेलियाला निघून गेले.तिथे त्यांनी काही काळ कंस्ट्रक्शन क्षेत्रात काम केले.पण त्यातही त्यांचे मन रमले नाही. या दरम्यान 1976 मध्ये त्यांची नवख्या प्रतिभांना हेरून प्रोत्साहित करणार्या प्रमोटर विली चान यांच्याशी ओळख झाली. विली चान यांनीच त्यांच्याशी संपर्क साधला होता. त्यांना अॅक्शन चित्रपटात एका चांगल्या मार्शल आर्टिस्टची गरज होती.त्यांच्या बोलावण्याने ते पुन्हा हाँगकाँगला परतले.त्यांनी शायोलिन चेंबर ऑफ डेथ आणि फिस्ट ऑफ डेथ या चित्रपटांमध्ये काम केले.या चित्रपटांना म्हणावं असं मिळालं नसलं तरी त्यांच्या कामाचं कौतुक झालं.प्रेक्षक त्यांना ओळखू लागले. याच दरम्यान त्यांनी काही चित्रपटांमध्ये गाणीही गायिली. ती सुपरहिट ठरली.
चान यांच्या लक्षात आलं की, मोठं यश मिळवायचं असेल तर फक्त मार्शल आर्ट असून चालणार नाही. मग त्यांनी आपला मोर्चा कॉमेडीकडे वळवला.1978 साली त्यांनी ड्रंकन मास्टर नावाचा चित्रपट केला.यात त्यांनी एका महाविद्यालयीन तरुणाची भूमिका साकारली होती. त्यात त्यांनी अॅक्शनबरोबरच आपल्या शानदार अभिनयाने प्रेक्षकांना दणदणून हसवलं.त्यांच्या कामाचं कौतुक तर झालंच. पण चित्रपटही हिट ठरला.संपूर्ण आशिया आणि अमेरिकेतल्या प्रेक्षकांनी त्यांना डोक्यावर घेतले.चान एका रात्रीत स्टार बनले. आता त्यांना हॉलीवूड चित्रपटांच्याही ऑफर येऊ लागल्या.1980 मध्ये द बिग ब्रॉल आणि 1985 मध्ये द प्रोटेक्टर या चित्रपटांमध्ये त्यांना महत्त्वपूर्ण अशा भूमिका साकारायला मिळाल्या. अमेरिकेतल्या प्रेक्षकांनीही त्यांना डोक्यावर घेतलं. 1985 मध्ये पोलिस स्टोरी या चित्रपटातल्या एका स्टंट सीन दरम्यान त्यांच्या पाठीच्या कणाच्या हाडाला गंभीर दुखापत झाली.बातमी पसरली की, आता जॅकी चानची कारकीर्द संपली. ते कधीच स्टंट सीन करू शकणार नाहीत.पण पाच वर्षांनतर त्यांनी मनाचा थरकाप उडवणार्या अशा काही स्टंट सीनने चित्रसृष्टीत जोरदार पुनरागमन केले,की बोलायची सोयच उरली नाही. ऑपरेशन कंडोर चित्रपटात त्यांनी नदीकाठावर मोटरसायकलच्या हवेतल्या उड्डाणाचा असा खतरनाक स्टंट सीन केला की, उपस्थितांनी अक्षरश: तोंडात बोटे घातली.
आता त्यांची ख्याती फक्त चीन आणि हाँगकाँगपुरतीच सिमित राहिली नव्हती.ते सार्या आशिया खंडातल्या प्रेक्षकांचे चहेते बनले.1982 साली त्यांनी तैवानची अभिनेत्री लिन फेंग हिच्याशी विवाह केला. पण हा विवाह त्यांनी सगळ्यांपासून लपवून ठेवला.1998 मध्ये मात्र त्यांनी हे गुपित आपल्या आत्मचरित्राद्वारे उघड केले. आय एम जॅकी चान हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.त्यांना एक मुलगा आहे.त्याचं नाव आहे जेंसी. 1998 साली रश आवर आणि 2000 मध्ये शंघाई नून चित्रपटांनी अमेरिकेत धूम माजवून टाकली. अमेरिकेतल्या लोकप्रियतेची त्यांची इच्छाही पूर्ण झाली. तिथल्या प्रेक्षकांनी त्यांना आपलंस करून टाकलं.पण पुढे वाढत्या वयामुळं अॅक्शन चित्रपटांत काम करताना आवघड होतं गेलं.याविषयी चान म्हणतात, तरुण होतो, त्यावेळी जखमा लवकर बर्या होत होत्या, मात्र वय वाढत जातं, तसं जखम बरी व्हायला वेळ लागते.नंतर मग ते चित्रपट प्रोडक्शन क्षेत्रात उतरले.युनिसेफ अॅम्बेसडर म्हणून त्यांनी अनेक शाळा उघडल्या. ते म्हणतात, शिक्षण महत्त्वाचं आहे. खरच! मलादेखील शाळा शिकून डॉक्टर,इंजिनिअर किंवा वकील बनायला हवं होतं. काही गोष्टी राहून गेल्या याची त्यांना खंत जरूर आहे.
नुकतेच त्यांना अभिनय क्षेत्रातल्या योगदानाबद्दल ऑस्कर अॅवार्डने सन्मानित करण्यात आले. याबद्दल चान म्हणतात, मी चित्रसृष्टीला माझी 56 वर्षे दिली आहेत. जवळपास दोनशेएक चित्रपट केले आहेत.काही फाईट सीनमध्ये आपली हाडं मोडून घेतली आहेत. मात्र ऑस्कर मिळाल्यानंतर आता माझी खात्री झाली आहे की, खरेच मी एक चांगला अभिनेता आहे.
सामाजिक सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी करा
कागद-काच-पत्रावेचक, धुणीभांडी करणार्या महिला, महिला-पुरुष बांधकाम मजूर यांच्या न्याय्य हक्कांसाठी दिला जाणारा लढा तोकडा ठरू लागला आहे. कायदा असूनही ठेकेदारांकडून त्यांचे शोषण होते. कायदा केवळ कागदावरच आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने तो कुचकामी ठरू लागला आहे. बांधकामाच्या साइटवर पुरुषांच्या बरोबरीने काम करणार्या महिलांना मात्र अत्यंत कमी वेतन दिले जाते. समान काम, समान वेतन नाही. पुरुषांनाही तुटपुंज्या रोजंदारीवर राबवून घेतले जाते. असंघटित कामगार आहेत. त्यामध्ये कचरावेचक, बांधकाम मजूर, दुकान, गॅरेज, हॉटेल अशा आस्थापनांत काम करणारे कामगार, धुणीभांडी करणार्या महिला अशा स्वरूपाचे काम करणार्या कामगारांचा समावेश होतो. सामाजिक सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी केल्यास उपेक्षित घटकातील कष्टकरी वर्गाच्या न्याय्य हक्कांचे संरक्षण होईल. सामाजिक सुरक्षा कायद्यामुळे उपेक्षित वर्गातील घटकात काम करणार्या मजुरांना किमान वेतन मिळेल. त्यांचा सामाजिक स्तर उंचावण्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न होतील. शासनातर्फे त्यांच्याकरिता विविध कल्याणकारी योजना आखून त्याचा लाभ मिळवून देणे शक्य होईल. परंतु सामाजिक सुरक्षा कायद्याचे कोणी पालन करीत नाही. बांधकाम मजुरांची नोंदणी होत नाही. कंत्राटी पद्धतीने काम करणार्या कामगारांना सुरक्षा कायद्यातील तरतुदीचा लाभ मिळत नाही. निवडणुका आल्या, की राजकारणी मंडळी मतांसाठी घरोघरी फिरतात. निवडून आल्यानंतर मात्र पाठ फिरवतात. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांचा त्यांना विसर पडतो. सामान्य नागरिक, कष्टकरी यांच्यासाठी काम करण्याचे त्यांना भान राहत नाही, असा अनुभव आहे.
घरेलु कामगार कायदा २00७ मध्ये अमलात आला. त्या वेळी सन्मानधन देण्याची घोषणा झाली. परंतु प्रत्यक्षात कोणालाही सन्मानधन मिळाले नाही. सामाजिक सुरक्षा कायदा, आरोग्य विमा आणि अपघात विमा योजना जाहीर झाल्या. २00९ मध्ये कामगार कल्याण मंडळ स्थापन झाले. कामगार कल्याण मंडळाकडे कामगारांची नोंदणी करणे बंधनकारक होते. परंतु अनेक ठेकेदार या कामगारांची नोंदणी करीत नाहीत. त्यांचे आर्थिक शोषण केले जाते. हे शोषण अद्यापही सुरू आहे. असंघटित कामगार म्हणून काम करणार्या घटकातील अनेकांचा दारिद्रय़रेषेखालील यादीत समावेश नसतो. त्यात अनेक बोगस नावे समाविष्ट करून खर्या लाभार्थींना वंचित ठेवले जात आहे.
केंद्र शासन, राज्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या माध्यमातून राबविण्यात येणार्या विविध कल्याणकारी योजना समाजातील उपेक्षित घटकापर्यंत पोहोचत नाहीत. त्यांच्यासाठी शासनाची आरोग्य योजना, विमा योजना आहे. या योजनांची खरी गरज आहे, त्यांच्यापैकी काहींच्याच पदरात लाभ पडतो. इतरांना मात्र योजनेच्या लाभासाठी प्रसंगी शासन स्तरावर संघर्ष करण्याची वेळ येते. झगडावे लागते. हा संघर्ष संपणार कधी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
केंद्र शासन, राज्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या माध्यमातून राबविण्यात येणार्या विविध कल्याणकारी योजना समाजातील उपेक्षित घटकापर्यंत पोहोचत नाहीत. त्यांच्यासाठी शासनाची आरोग्य योजना, विमा योजना आहे. या योजनांची खरी गरज आहे, त्यांच्यापैकी काहींच्याच पदरात लाभ पडतो. इतरांना मात्र योजनेच्या लाभासाठी प्रसंगी शासन स्तरावर संघर्ष करण्याची वेळ येते. झगडावे लागते. हा संघर्ष संपणार कधी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बँकांनी ग्राहकांना कॅशलेस व्यवहाराचे प्रशिक्षण द्यावे
कॅशलेस व्यवहाराची आज गरज आहे. कॅशलेस व्यवहार ग्राहकांसाठी पूर्णपणे सुरक्षित आहे. हा निर्णय स्वागतार्ह आहे. बँकेच्या विविध पर्यायांद्वारे सर्वसामान्य नागरिक कोणतीही रोख रक्कम न देता जीवनावश्यक वस्तू खरेदी करू शकतात. त्यामुळे ग्राहकांच्या व्यवहारांची स्वतंत्र नोंद ठेवण्याची गरज भासणार नाही. शिवाय, त्यातून कर चुकवेगिरीला पूर्णपणे आळा बसेल. विशेषत: ग्रामीण भागात याची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे.यासाठी बँकांनी आपल्या ग्राहकांना प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. वीजबिल भरणा, खरेदी, मोबाईल, डिश रीचार्ज करण्यासाठी रोख पैशांची आवश्यकता नाही. मोबाईलद्वारे हे व्यवहार करण्यासाठी अँप असणे आवश्यक आहे. अॅपद्वारे आर्थिक व्यवहार घरबसल्या करता येतात. इन्स्टंट मनी ट्रान्सफरद्वारे मोबाईल नंबर आणि पिनकोडचा वापर करून इतरांना पैसे पाठविता येणार आहेत. या व्यवहारात पैसे स्वीकारणार्या व्यक्तीला विशिष्ट पिन क्रमांक पाठविला जात आहे. त्यामुळे कोणत्याही एटीएम मशिनमधून कार्डशिवाय पैसे काढणे शक्य झाले आहे. यासाठी ’आयएमटी’चा पर्याय ग्राहकांना निवडावा लागेल. याशिवाय, ग्राहकांना मोबाईल अँपद्वारे जागेवर बसून बँकेच्या रांगेत नंबर लावणे शक्य आहे. त्यासाठी रांगेत उभे राहण्याची आवश्यकता नाही. बँकेच्या वतीने कॅशलेश व्यवहारासाठी ग्राहकांना विविध पर्याय उपलब्ध केले आहेत. त्यामध्ये ग्राहक नेटबँकिंगद्वारे प्रतिदिन 1 लाख रुपयांचा व्यवहार करू शकतात. तसेच, अँपद्वारे मोबाईल प्री-पेड, पोस्पेड रिचार्ज, डीटीएच रिचार्ज करू शकतात. तसेच, 10 हजार रुपयांपर्यंत आर्थिक व्यवहार करणे शक्य आहे. मात्र या गोष्टी करताना काळजी घेण्याची आवश्यकता आहे.यात इतरांची मदत घेताना फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बँकांनी आपल्या ग्राहकांना आर्थिक व्यवहाराचे प्रशिक्षण द्यावे व त्यांना अर्थसाक्षर करावे.
संत शिरोमणी: संत ज्ञानेश्वर
संत ज्ञानेश्वर हे १३ व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत आणि कवी. भागवत संप्रदायाचे प्रवर्तक. योगी व तत्त्वज्ञ होते. भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी), अमृतानुभाव,चांगदेवपासष्टी व हरिपाठाचे अभंग ही त्यांची काव्यरचना. अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाविषयक विचार मराठीतूनही व्यक्त करता येतात असा विश्वास संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ग्रंथकर्तृत्वातून निर्माण केला. त्यामुळे समाजातील सर्व थरांतील लोकांना आध्यात्मिक लोकशाहीची प्रेरणा मिळाली.
ज्ञानेश्वरांचा जन्म आपेगाव येथे तेराव्या शतकात, मध्यरात्री श्रावण कृष्ण अष्टमी, शके ११९७ (इ.स. १२७५) रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी व त्यांच्या आई रुक्मिणीबाई या होत. गोविंदपंत व मीराबाई हे त्यांचे आजोबा-आजी होत. नवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू. नवृत्ती, सोपान व मुक्ताबाई या त्यांच्या भावंडांचा जन्म अनुक्रमे शके ११९५, ११९९ व १२0१ मध्ये झाला. (काही अभ्यासकांच्या मते निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई या सर्व भावंडांचा जन्म आळंदी येथेच अनुक्रमे शके ११९0, ११९३, ११९६ व ११९९ मध्ये झाला.)
आपेगाव हे औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणजवळ गोदावरी नदीच्या काठावर वसलेले छोटे गाव आहे. ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत हे मुळात विरक्त संन्यासी होते. विवाहित असतानाच त्यांनी संन्यास घेतला व ते काशीला गेले. गुरूंना ते विवाहित असल्याचे समजल्यावर गुऊंनी त्यांना परत पाठवले. त्यांच्या आदेशानुसार पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर विठ्ठलपंतांना चार अपत्ये झाली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई अशी त्यांची नावे होत.
विठ्ठलपंत तीर्थयात्रा करत करत आळंदी मुक्कामी येऊन स्थायिक झाले. त्या काळी संन्यासाची मुले म्हणून सर्व समाज या चौघा भावंडांची हेटाळणी करीत असे. गावाने त्यांना व त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकले. परित्यक्त ब्राह्मण म्हणून त्यांना काळ कंठावा लागला. ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांची मुंज करण्याचे आळंदीच्या ब्राह्मणांनी नाकारले. त्यावर विठ्ठलपंतांनी उपाय काय असे धर्मशास्त्रींना विचारले. त्यावर केवळ देहदंडाचीच शिक्षा आहे असे ब्राह्मणांनी सांगितले. मुले संस्कारांपासून वंचित राहू नये व त्यांचे भविष्यात भले व्हावे यासाठी विठ्ठलपंतानी व रुक्मिणीबाई यांनी आत्महत्या करून देहान्त प्रायश्चित्त घेतले.
आई-वडिलांच्या मृत्यूनंतर ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांना लोकांकडून फार त्रास दिला गेला. त्यांना अन्न आणि पाणी यासारख्या मूलभूत गोष्टी नाकारण्यात आल्या. पुढे ही भावंडे पैठणला गेली आणि तेथे ज्ञानेश्वरांनी आपली विद्वत्ता सिद्ध केली.
संत ज्ञानेश्वरांनी अत्यंत रसाळ भाषेत शब्दरचना केली. नवृत्तीनाथ हेच ज्ञानेश्वरांचे सद्गुरू होते. नेवासा क्षेत्रात आपल्या गुरूंच्या कृपाशीवार्दाने गीतेवर त्यांनी प्रख्यात टीका लिहिली. खरे पाहता ज्ञानेश्वरांनी ही टीका सांगितली व सच्चिदानंद बाबा यांनी लिहिली. या ग्रंथास 'ज्ञानेश्वरी' किंवा 'भावार्थदीपिका' असे म्हणतात. हे मराठी वायाचे देशीकार लेणे झाले. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संस्कृत भाषेतील 'ज्ञान', श्री संत ज्ञानेश्वरांनी प्राकृत भाषेत आणले.
माझा मराठाचि बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।। (ज्ञाने - ६.१४)
असे म्हणत त्यांनी मराठी भाषेविषयीचा अभिमान, मराठीची महती व्यक्त केली आहे. कर्मयोग, ज्ञानयोग व भक्तियोग सांगणार्या ज्ञानेश्वरीत सुमारे ९000ओव्या आहेत. हा ग्रंथ इ.स. १२९0 मध्ये लिहिला गेल्याचे मानले जाते. त्यांचा दुसरा ग्रंथ 'अनुभवामृत' किंवा 'अमृतानुभव' होय. सुमारे ८00 ओव्या (दहा प्रकरणे) या ग्रंथात आहेत. तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने हा श्रेष्ठ ग्रंथ आहे.
'चांगदेव पासष्टी' या ग्रंथाद्वारे त्यांनी चांगदेवांचे गर्वहरण करून त्यांना उपदेश केला. चांगदेव हे महान योगी १४00 वर्षे जगले असे मानले जाते. पण त्यांचा अहंकार गेला नव्हता. यासाठी संत ज्ञानेश्वरांनी उपदेशपर लिहिलेले ६५ ओव्यांचे पत्र म्हणजे चांगदेव पासष्टी हा ग्रंथ होय. संत ज्ञानेश्वरांचा 'हरिपाठ' (अभंगात्मक,२८ अभंग) हा नामपाठ आहे. यात हरिनामाचे महत्त्व सांगितले आहे.
संतवर्य ज्ञानदेवांनी वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी, आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या काठी संजीवन समाधी घेतली (कार्तिक वद्य त्रयोदशी, शके १२१८,दुर्मुखनाम संवत्सर, इ.स.१२९६, गुरुवार). हा 'ज्ञानसूर्य' मावळल्यानंतर अवघ्या वर्षभरात निवृत्ती, सोपान व मुक्ताबाई या त्यांच्या भावंडांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली.
आपेगाव हे औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणजवळ गोदावरी नदीच्या काठावर वसलेले छोटे गाव आहे. ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत हे मुळात विरक्त संन्यासी होते. विवाहित असतानाच त्यांनी संन्यास घेतला व ते काशीला गेले. गुरूंना ते विवाहित असल्याचे समजल्यावर गुऊंनी त्यांना परत पाठवले. त्यांच्या आदेशानुसार पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर विठ्ठलपंतांना चार अपत्ये झाली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई अशी त्यांची नावे होत.
विठ्ठलपंत तीर्थयात्रा करत करत आळंदी मुक्कामी येऊन स्थायिक झाले. त्या काळी संन्यासाची मुले म्हणून सर्व समाज या चौघा भावंडांची हेटाळणी करीत असे. गावाने त्यांना व त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकले. परित्यक्त ब्राह्मण म्हणून त्यांना काळ कंठावा लागला. ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांची मुंज करण्याचे आळंदीच्या ब्राह्मणांनी नाकारले. त्यावर विठ्ठलपंतांनी उपाय काय असे धर्मशास्त्रींना विचारले. त्यावर केवळ देहदंडाचीच शिक्षा आहे असे ब्राह्मणांनी सांगितले. मुले संस्कारांपासून वंचित राहू नये व त्यांचे भविष्यात भले व्हावे यासाठी विठ्ठलपंतानी व रुक्मिणीबाई यांनी आत्महत्या करून देहान्त प्रायश्चित्त घेतले.
आई-वडिलांच्या मृत्यूनंतर ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांना लोकांकडून फार त्रास दिला गेला. त्यांना अन्न आणि पाणी यासारख्या मूलभूत गोष्टी नाकारण्यात आल्या. पुढे ही भावंडे पैठणला गेली आणि तेथे ज्ञानेश्वरांनी आपली विद्वत्ता सिद्ध केली.
संत ज्ञानेश्वरांनी अत्यंत रसाळ भाषेत शब्दरचना केली. नवृत्तीनाथ हेच ज्ञानेश्वरांचे सद्गुरू होते. नेवासा क्षेत्रात आपल्या गुरूंच्या कृपाशीवार्दाने गीतेवर त्यांनी प्रख्यात टीका लिहिली. खरे पाहता ज्ञानेश्वरांनी ही टीका सांगितली व सच्चिदानंद बाबा यांनी लिहिली. या ग्रंथास 'ज्ञानेश्वरी' किंवा 'भावार्थदीपिका' असे म्हणतात. हे मराठी वायाचे देशीकार लेणे झाले. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संस्कृत भाषेतील 'ज्ञान', श्री संत ज्ञानेश्वरांनी प्राकृत भाषेत आणले.
माझा मराठाचि बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।। (ज्ञाने - ६.१४)
असे म्हणत त्यांनी मराठी भाषेविषयीचा अभिमान, मराठीची महती व्यक्त केली आहे. कर्मयोग, ज्ञानयोग व भक्तियोग सांगणार्या ज्ञानेश्वरीत सुमारे ९000ओव्या आहेत. हा ग्रंथ इ.स. १२९0 मध्ये लिहिला गेल्याचे मानले जाते. त्यांचा दुसरा ग्रंथ 'अनुभवामृत' किंवा 'अमृतानुभव' होय. सुमारे ८00 ओव्या (दहा प्रकरणे) या ग्रंथात आहेत. तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने हा श्रेष्ठ ग्रंथ आहे.
'चांगदेव पासष्टी' या ग्रंथाद्वारे त्यांनी चांगदेवांचे गर्वहरण करून त्यांना उपदेश केला. चांगदेव हे महान योगी १४00 वर्षे जगले असे मानले जाते. पण त्यांचा अहंकार गेला नव्हता. यासाठी संत ज्ञानेश्वरांनी उपदेशपर लिहिलेले ६५ ओव्यांचे पत्र म्हणजे चांगदेव पासष्टी हा ग्रंथ होय. संत ज्ञानेश्वरांचा 'हरिपाठ' (अभंगात्मक,२८ अभंग) हा नामपाठ आहे. यात हरिनामाचे महत्त्व सांगितले आहे.
संतवर्य ज्ञानदेवांनी वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी, आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या काठी संजीवन समाधी घेतली (कार्तिक वद्य त्रयोदशी, शके १२१८,दुर्मुखनाम संवत्सर, इ.स.१२९६, गुरुवार). हा 'ज्ञानसूर्य' मावळल्यानंतर अवघ्या वर्षभरात निवृत्ती, सोपान व मुक्ताबाई या त्यांच्या भावंडांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली.
Sunday, November 20, 2016
टीव्ही: इडियट नव्हे,जिवलग मित्र
दूरचित्रवाणीची खिल्ली उडविण्यासाठी त्याच्या संचाला इडियट बॉक्स म्हटलं जातंय, हे खरंय. पण ती खिल्ली कामधाम सोडून टीव्हीपुढे बसून राहणार्या रिकामटेकड्या लोकांची असते. दूरचित्रवाणी संच आता इडियट बॉक्स राहिला नाही; तर आपली मतं बनविण्याचं आणि त्यावरून निर्णय घेण्याचं प्रभावी माध्यम झालंय. वस्तूत: हे निरीक्षण नोंदविण्यासाठी कुठल्या तज्ज्ञाची गरज नाही. आपणच आपल्या दैनंदिन व्यवहाराचे अवलोकन केले असता टीव्ही पाहून आपण कितीतरी मतं बनविली आणि निर्णय घेतल्याचे ध्यानात येते.
टीव्हीने सर्वांसाठीच आपली उपयुक्तता सिध्द केली आहे. भारतातील रिकामा माणूस दिवसभर स्वत:ची करमणूक करू शकतो. महिला वर्गांसाठी ’सास बहू’वाल्या मालिकांचा तर भडिमार आहेच. मुलं कार्टून शो पाहून घरात गडबड गोंधळ न करता शांतता ठेवू शकतात. ज्ञानलालसा असलेल्या व्यक्तींना टीव्हीतून ज्ञानही मिळतं. शिवाय त्यातून माहितीचा तर खजिनाच बाहेर पडत असतो. भारतात हल्ली राजकीय मतंही टीव्ही पाहून व्यक्त होतात. एखादं प्रॉडक्ट जाहिरातीच्या प्रभावाखाली येऊन खरेदी केलं जातं. माणसाच्या जीवनाला टीव्हीने व्यापून टाकले आहे.
दूरचित्रवाणीचा शोध 19 व्या शतकाच्या अखेरीस लागला असला तरी भारतात टीव्हीचे प्रसारण सुरू व्हायला1959 साल उजाडले. दिल्लीत प्रायोगिक तत्त्वावर सुरू झालेले प्रसारण 1965 पासून दररोज आणि नियमित होऊ लागले. 1972 मध्ये मुंबई आणि अमृतसरपर्यंत या प्रसारणाची कक्षा रुंदावली. 1975 पर्यंत तर देशातील केवळ सात शहरांतच टीव्ही दिसत होता. त्यानंतर मात्र टप्प्याटप्प्याने देशभर आणि प्रादेशिक भाषांमध्ये प्रसारण सुरू झाले.. खासगी वाहिन्या आल्या, केबल टीव्ही सुरू झाले अन् मानवी जीवनावरील टीव्हीचा प्रभाव वाढतच गेला.
संयुक्त राष्ट्रसंघाने हा प्रभाव ओळखून17 डिसेंबर 1996 साली एक ठराव पारित करून 21 नोव्हेंबर हा दिवस जागतिक दूरचित्रवाणी दिन म्हणून जाहीर केला. दूरचित्रवाणीवरून प्रसारित होणार्या कार्यक्रमांमधून जागतिक शांतता, सुरक्षा, आर्थिक आणि सामाजिक विकासावर दृष्टिक्षेप टाकणारे असतात. त्यामुळे सध्या टीव्हीचे महत्त्व वाढलेले आहे, हे संयुक्त राष्ट्रसंघाने मान्य केले. समकालीन जगात संपर्क आणि जागतिकीकरणाचे दूरचित्रवाणी हे एक प्रतीक असल्याचेही’युनो’ने नमूद केले आहे. पूर्वीच्या काळी'दूरदर्शन' ही एकमेव वाहिनी दर्शकांसाठी उपलब्ध होती आणि तीही दिवसातून ठराविक काळासाठीच हे ऐकले तर नवल वाटले. परंतु हे खरे आहे. संध्याकाळी दूरदर्शनचे कार्यक्रम सुरू होण्याअगोदर दूरदर्शन संचावर असलेल्या मुंग्या पाहणे नशिबी असे. कार्यक्रमाची वेळ होताच ती प्रसिद्ध धून चालू होऊन धुरकट वर्तुळातून दूरदर्शनचे बोधचिन्ह आकारास येत असे आणि नंतर कार्यक्रम सुरू होत असत. सुरूवातीला चढ्या किंमतींमुळे मोजक्याच लोकांकडे दूरदर्शनवरचे कार्यक्रम पाहायला धावपळ करावी लागे. सामान्य लोक टीव्हीच्या शोरूमपुढे घोळक्याने उभारून दूरचित्रवाणी संच पाहण्याचा आनंद घेत असत. पंतप्रधान इंदिरा गांधींची31 ऑक्टोबर 1984 रोजी हत्या झाली. शहरवासीयांना मोठा धक्का बसला. दूरचित्रवाणीचे प्रसारण नुकतेच सुरू झाल्यामुळे इंदिराजींची अंतिमयात्रा पाहून त्यांना आदरांजली वाहिली. त्यावेळी चौक, गल्लीबोळात टीव्हीचा संच लावून इंदिराजींचा अंतिम प्रवास पाहण्याची सोय करण्यात आली होती.
1991 पासून खासगी दूरचित्रवाहिन्यांना प्रारंभ झाला. स्टार टीव्हीने पाया रचला. आज एक हजाराहून अधिक टीव्ही वाहिन्या आहेत. 1990 चे आखाती युद्ध जगभरात दिसले. 1984 साली केबल टीव्हीचा प्रसार झाला. संगीत, चित्रपट, वृत्त, निसर्ग, अँक्शन, धार्मिक, मुलांसाठी, विनोदी, फॅशन, खाद्यपदार्थ, पर्यटन अशा कित्येक क्षेत्रासाठी स्वतंत्र वाहिन्या आहेत. केबलचालकांच्या अडथळ्याविना आपल्याला हव्या त्या वाहिन्या पाहण्यासाठी डीटीएच सेवा सुरू झाली. आता मोठया शहरातील प्रत्येक घरात टीव्हीसाठी ’सेट टॉप बॉक्स’ बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे. सध्या आपल्या मोबाईलवरदेखील लाइव टीव्ही पाहण्याची सोय झाली आहे.कुठे प्रवासात,बाहेरगावी असलात तरी आपल्याला आपल्या आवडीचा कार्यक्रम पाहता येतो.नव्या तंत्रज्ञान युगात टीव्ही आपल्या आणखी जवळ आला आहे. आपला झाला आहे.तो आता इडियट बॉक्स राहिला नाही तर आपला जिवलग मित्र झाला आहे.
शाही विवाहाचा लेखा-जोखा बाहेर यायला हवा
देशातील सर्वसामान्य जनता दोन-चार हजार रुपयांसाठी बँकांच्या दारात ताटकळत उभी असताना कर्नाटकाच्या माजी मंत्री गाली जनार्दन रेड्डी यांची मुलीचा विवाह मात्र परवा बेंगळूर येथील पॅलेस ग्राऊंडवर मोठ्या शाही थाटात पार पडला.हैद्राबाद येथील उद्योजक राजीव रेड्डी यांच्याबरोबर ब्राम्हणीचा विवाह झाला. या शाही विवाहाची सध्या देशभरात जोरदार चर्चा सुरू असली तरी यामुळे सर्वसामान्यांचा आ वासला आहे. इतका मोठा शाही विवाह सध्याच्या ताईट वातावरणात होतोच कसा, असा सवाल जिकडेतिकडे उपस्थित केला जात आहे. याची चौकशी होण्याची गरज आहे. आणि या विवाहाची पारदर्शिकता सर्वांपुढे येण्याची आवश्यकता आहे. या विवाहामुळे देशातले वातावरण संशयास्पद आणि गढूळ होऊ लागले आहे.
या विवाहाची राज्यसभेनेही दखल घेतली आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा बाहेर काढण्यासाठी 1000 व 500 च्या नोटांवर बंदी घातली आहे. पंतप्रधानांच्या या निर्णयाचे सुरुवातीला स्वागत झाले. आता आपल्याच खात्यातील दोन हजार रु. काढण्यासाठी सामान्य माणसाला चार-चार तासाहून अधिक काळ बँकांसमोर रांगेत उभे रहावे लागत आहे. काळा पैसा बाहेर काढण्यासाठी हे कठोर पाऊल उचलले गेले असले तरी याचा मोठा फटका सामान्यांनाच बसला आहे. सेलिब्रिटी,पुढारी,उद्योजक,व्यापारी यांच्यावर कुठलाच परिणाम जाणवला नाही. ही मंडळी कुठेच रांगेत उभारल्याचे दिसले नाही. त्यातच नोटाबंदी करून दहा दिवस उलटून गेले तरी परिस्थिती बदलायचे नाव घेत नाही. अशा परिस्थितीत इतका मोठा शाही विवाह होतोच कसा, असा सवाल उपस्थित होणे, साहजिकच आहे. सुट्या,लहान नोटांची चणचण या विवाहात भासलीच नाही का, का अशा नोटांची तजवीज अगोदरच करण्यात आली होती, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. या विवाहामुळे लोकांच्या मनात असंख्य प्रश्नांचा मोहोळ उठला आहे, त्या प्रश्नांची उत्तरे त्यांना मिळायला हवीत. आणि हा त्यांचा हक्क आहे. जनार्दन रेड्डी यांच्या कन्येच्या विवाहासाठी 500 कोटी खर्च झाले आहेत. ही बातमी साऱयांनाच अस्वस्थ करणारी ठरली आहे. नाही तर समाजात चुकीचा संदेश जाण्याची शक्यता आहे.
लग्न हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असलातरी लग्नासाठी किती पैशाचा चुराडा करावा याचा विचार सध्याच्या नोटांच्या आणीबाणीच्या परिस्थितीत होऊ लागला आहे. देशातील सध्याची परिस्थिती पाहता हा विवाह पुढे टाळण्याची आवश्यकता होती. अर्थात हा ज्याचा त्याचा प्रश्न असला तरी हा श्रीमंती थाट मात्र सामान्य लोकांना अस्वस्थ करून सोडत आहे. लोकांमध्ये संताप खदखदत आहे. त्यामुळे या विवाहाची चौकशी हो ऊन सत्य बाहेर येण्याची गरज आहे.
आपल्या श्रीमंतीचा थाट दाखविण्यासाठी जनार्दन रेड्डी यांनी पॅलेस मैदानावर 200 कोटी खर्चून जणू देवलोकच उभारला होता, अशी चर्चा होत आहे. या शाही मंडपात विजयनगर साम्राज्य, बळ्ळारी शहराचा काही भाग, ऐतिहासिक हंपी आणि तिरुमला मंदिरांची प्रतिकृती साकारण्यात आली होती म्हणे. या शाही विवाहाची देशातीलच नव्हे तर विदेशातील माध्यमांनीही दखल घेतली. जनार्दन रेड्डी हे भाजपचे नेते आहेत. बी.एस. येडियुरप्पा सरकारमध्ये मंत्रीपदावर असताना बेकायदा खाण घोटाळयासंबंधी त्यांना अटक झाली होती. बळ्ळारी ही त्यांची राजधानी असल्याचे बोलले जाते. इथे त्यांनी कित्येक वर्षे राज्य केले आहे. बळ्ळारी आणि शेजारच्या आंध्र प्रदेशात खाण व्यवसायातून मिळालेली माया आणि त्यानंतर त्याच्या जोरावर मिळवलेली सत्ता इथे मोठा चर्चेचा विषय आहे.
शाही विवाहांवर कायद्याचा चाप लावण्यासाठी कर्नाटकात गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. देवराज अरस आणि एस. एम. कृष्णा यांच्या राजवटीत खाजगी विधेयक आणण्याचे प्रयत्न झाले. यासाठी सिद्धरामय्या सरकारचेही गेल्या दोन वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. लग्न समारंभाच्या निमित्ताने होणारी अन्नाची नासाडी आणि पैशाचा चुराडा रोखण्यासाठी कायदा करण्याची मागणी जुनीच आहे. काही माणसांना संपत्तीचे प्रदर्शन घडविण्याचा रोग असतो. जनार्दन रेड्डींनाही तो रोग आधीपासूनच आहे.कर्नाटक-आंध्र प्रदेशमधील नैसर्गिक संपत्तीची लूट करून गडगंज माया गोळा करणाऱया जनार्दन रेड्डी यांची चौकशी अद्याप पूर्ण झाली नाही. विविध न्यायालयात त्यांच्यावर खटले सुरू आहेत. तपास यंत्रणांनी त्यांची बँक खाती गोठवलेली असताना लग्नासाठी 500 कोटीचा खर्च ते कसे करू शकले असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. या शाही विवाहाला मोठमोठी असामी उपस्थित होती. लग्न कसे आणि कुठे करायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न असलातरी दुष्काळात असा घाट हवा होता का? राजकारण आणि समाजकारणात असणाऱयांनी तर किमान याचा विचार करायला नको का असा प्रश्न सर्व सामान्यांसमोर पडला आहे. कर्नाटकात दुष्काळाचे भीषण सावट आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. अशा विपरीत परिस्थितीत केंद्र सरकारच्या नोटा बंदीच्या निर्णयामुळे आपल्याच खात्यातील दोन हजार रु. काढण्यासाठी बँकांसमोर तास न् तास ताटकळत उभे रहावे लागत आहे. सुरुवातीला देशहिताचा विचार करून या निर्णयाचे स्वागत करणारेच आता त्रासामुळे सरकारला खडे बोल सुनावत आहेत. लोकांमधून आता संताप व्यक्त हो ऊ लागला आहे. काळया पैशाच्या मुद्यावर देशभरात चर्चा सुरू असतानाच भाजपच्या या माजी मंत्र्याने कन्येच्या विवाहासाठी केलेला खर्च आता लोकांच्या डोळ्यांसमोर येऊ लागला आहे. हा विवाह सोहळा अलीकडेच झालेल्या म्हैसूर राजघराण्याच्या युवराजाच्या विवाह सोहळयापेक्षाही दिमाखदार होता, असे सांगतले जात आहे. त्यामुळे या विवाहाची चौकशी व्हायलाच हवी, आणि नोटाबंदीमुळे भरडला जात असलेल्या लोकांना या विवाहाचा पारदर्शीपणा दिसायला हवा. नाही तर समाजात चुकीचा संदेश जाईल. या विवाहाचा शाही थाटमाट सरकारला,भाजपला आणि देशाला धोकादायक ठरू नये, याची खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.
Monday, November 14, 2016
बालकथा अंधश्रद्धाळू आकाश
संध्याकाळी बाबा ऑफिसमधून घरी आल्या आल्या आकाशानं विचारलं, ‘बाबा, माझा पेन आणलात?’
‘हो, आणलाय,’ असे म्हणत त्यांनी आपल्या बॅगेतून एक पेन काढला आणि आकाशच्या हातात टेकवला.
पेन पाहताच आकाशचा चेहरा उतरला.तो म्हणाला, ‘ हे काय हो बाबा, मी तुम्हाला निळ्या रंगाचा पेन आणायला सांगितला होता, तुम्ही हिरव्या रंगाचा आणलात. निळा रंग यश देतो, माहित नाही का तुम्हाला?’
‘हे कुणी सांगितलं तुला?’ बाबांनी चकित हो ऊन विचारलं.
‘नितीन म्हणाला असं!’ आकाश म्हणाला.
‘कोण नितीन?’ बाबा
‘माझ्या वर्गात आहे तो!’आकाश
‘असं काही नसतं! परीक्षेची तयारी कर.’बाबा म्हणाले.
‘नाही बाबा, हिरव्या रंगाच्या पेनने परीक्षा दिली तर चांगले मार्क पडत नाहीत.’ आकाश म्हणाला.
‘आकाश, या सगळ्या फालतू गोष्टी आहेत.हिरव्या-निळ्या रंगानं काही घडत नसतं. तू परीक्षेची चांगली तयारी केली असशील तर चांगले मार्क मिळतीलच.’ बाबांनी समजावलं.
पण आकाश ऐकायला तयार नव्हताच. तो बाबांकडे निळ्या रंगासाठी हट्ट धरून बसला. तेव्हा बाबा म्हणाले,
‘आता सगळी दुकानं बंद झाली असतील.आता कोठून निळ्या रंगाचा पेन आणणार?’
पेन शोधता शोधता बरीच रात्र झाली. शेवटी एकदाचा निळ्या रंगाचा पेन मिळाला. अजून त्याला परीक्षेची तयारी करायची होती. पण त्याला झोप येऊ लागली. त्यामुळे त्याने आईला पहाटे पाच वाजता उठवायला सांगून झोपी गेला.
पहाटे आईने त्याला उठवले. तो बेडवरून खाली उतरत होता, तोच आईला शिंक आली. तो पुन्हा बेडवर जाऊन पडला.
आईने तो परत फिरून झोपल्याचे पाहून त्याला उठायला सांगून ती आपल्या कामाला निघून गेली. बाबांना तर त्याचा रागच आला. ते आकाशला म्हणाले, आकाश, काल तू निळ्या पेनच्या भानगडीत अभ्यास केला नाहीस. आता उठतोस की नाही? साडेसहापर्यंतच तुला वेळ आहे.’
तेव्हा आकाश म्हणाला, ‘बाबा, नितीनने सांगितलंय की, कुठलंही काम सुरू करण्यापूर्वी कुणी शिंकलं तर लगेच कामाला सुरूवात करायची नाही.’
बाबा म्हणाले, ‘अरे व्वा! आमचा आकाश तर चक्क अंधश्रद्धाळू बनला आहे. पण याच्याने तुझं नुकसानच होणार आहे.’ तरीही आकाश टाळत राहिला. दहा मिनिटांनंतरच तो अंथरुणातून उठला.
परीक्षेच्या तयारीसाठी त्याच्याकडे फक्त साडेसहापर्यंतच वेळ होता.सातला तर त्याची स्कूलबस यायची. काल रात्री निळ्या पेनच्या शोधात आणि आज सकाळी शिंकेच्या भानगडीत त्याची परीक्षेची तयारी काही म्हणावी अशी झाली नाही. त्यामुळे त्याला शालेला जाण्यासाठी तयार व्हायलाही वेळ झाला. बाबा आणि आकाश रस्त्यावर येताच त्यांना एक मांजर आडवं गेलं. आकाशने बाबांना थांबवले. एक मोटरसायकल पुढे गेल्यावर मग तो निघाला. स्कूलबस कॉलनीच्या मुख्य रस्त्यावर येऊन थांबायची. पण तिथे गाडी होती ना मुलं! म्हणजे स्कूलबस निघून गेली होती. आकाशला शाळेत पोहचणं आवश्यक होतं, कारण आज परीक्षा होती.
एक रिक्षा आली. बाबांनी त्याला हाक दिली. दोघेही रिक्षात बसायला पुढे निघाले, तोच आकाश जागच्या जागी थांबला. बाबांनी विचारल्यावर आकाश म्हणाला, ‘बाबा, गाडीचा नंबर 1301 आहे. तेरा हा अंक अशुभ असतो. या रिक्षाने गेलो तर परीक्षा चांगली जाणार नाही. आपण दुसर्या रिक्षाने जाऊ.’
आकाशची गोष्ट ऐकून बाबांना भलताच राग आला. ते म्हणाले, ‘तुझे डोके-बिके फिरलेय का काय? कुठल्या अंधश्रद्धेच्या बाता मारतोयस तू? या घडीला तुला शाळेत पोहचणं, महत्त्वाचं आहे. चल, रिक्षात बस बघू.आधीच उशीर झाला आहे.’
पण आकाश आपल्या गोष्टीवर अडून राहिला. रिक्षावाल्याला दुसरे भाडे मिळाले. तो निघून गेला. बर्याच उशीराने एक रिक्षा आली.
दोघे शाळेत पोहचले. परीक्षा सुरू होऊन अर्धा तास झाला होता. आकाश वर्गात गेला. त्याचे बाबा घरी आले. दुसरा शनिवार असल्याने ऑफिसला सुट्टी होती.
दुपारी आकाश शाळेतून घरी आला. त्याचा चेहरा उतरलेला होता. आई-बाबांनी त्याला विचारल्यावर त्याने पेपर खूपच कठीण गेल्याचे सांगितले. तेव्हा बाबा म्हणाले, ‘बघितलसं,अंधश्रद्धेच्या आहारी गेलं की काय होतं ते! मी तुला अगोदरच सांगितलं होतं, असल्या गोष्टीवर विश्वास ठेवू नकोस म्हणून!’
बहुतेक ही गोष्ट आकाशच्या लक्षात आली असावी.त्याने हो म्हणत मान हलवली होती.तेवढ्यात आई म्हणाली, ‘असू दे, आता हात-पाय धुवून घे. काही तरी खा. आणि पुढच्या पेपरच्या तयारीला लाग.’
आईची गोष्ट ऐकून आकाश हात-पाय धुवायला उठणार तोच, बाबांना शिंक आली. बाबा म्हणाले, ‘आकाश, मला शिंक आली. आता तू दहा मिनिटे असाच बसणार का? हात-पाय धुवायला जाणार नाहीस काय?’
‘नाही बाबा, आता या भानगडीत पडणार नाही. मला सगळं काही समजून चुकलं आहे. या सगळ्या गोष्टी बेकार आहेत.’ असे म्हणून आकाश हात-पाय धुवायला बाथरुममध्ये गेला.
किशोर कथा ड्रायव्हर
भाडं त्याच्या घरापर्यंत पोहचवून रतनने टॅक्सी आपल्या घराच्या दिशेने वळवली आणि टॅक्सीला वेग दिला. रात्रीचा एक वाजला होता. दिवसभराच्या कामानं तो पार शिणून गेला होता. कधी एकदा घरी जावं आणि अंथरुणात अंग टाकावं, असं त्याला झालं होतं. चोहोबाजूला नीरव शांतता होती. कुठे चिटपाखरूही दिसत नव्हते. पुलावर पोहचताच त्याला काचक्कन ब्रेक मारावा लागला. गाडीच्या प्रकाशात रतनला एक माणूस दिसला, जो एकदम त्याच्या गाडीच्या आडवा आला होता. त्यानं जर ब्रेक लावला नसता, तर माणूस टॅक्सीखाली आला असता.
रतन टॅक्सी थांबवून पटकन बाहेर आला. त्याला धरलं. आणि रस्त्याच्या बाजूला नेऊ लागला. अचानक त्याचं लक्ष त्या माणसाच्या चेहर्याकडे गेलं. चेहरा पाहून तो चकीतच झाला. कारण तो तर गोपाळ. त्याचा बालमित्र.बरीच वर्षे दोघांची गाठ-भेट नव्हती. रतन मेहनत करून पोट भरत होता, तर गोपाळ वामार्गाला लागला होता. वाट चुकला होता. चोरांच्या, गुन्हेगारांच्या टोळीत सामिल झाला होता. त्यामुळे रतनने त्याच्याशी बोलणे टाकले होते. भेटणेदेखील टाळले होते. पण त्याला मनापासून वाटत होतं की, त्याचा बालमित्र सुधारावा, सन्मार्गाला लागावा. त्यानं इतर चारजणांप्रमाणे चांगलं जीवन जगावं.
पुलावरून त्याला असा असावधपणे, काहीसा भेंडकाळत एकट्यानं चालताना पाहून रतनला त्याची दया आली. त्याचे मन पिघळले. तो गोपाळला सावरत म्हणाला, ‘ मित्रा, असल्या स्मशान रात्री असा एकटा कुठे निघाला आहेस?’
रतनला पाहून गोपाळ चमकला. म्हणाला, ‘ अरे व्वा,तू तर फार दिवसांतून भेटलास. पण साल्या, ते सन्मार्गाचे लेक्चर तेवढं देऊ नकोस.’
गोपाळच्या तोंडाचा वेगळाच दर्प येत होता. रतन म्हणाला, ‘ अरे बाबा, तसा माझा काही इरादा नाही. मी घरी चाललो होतो ... चल, मी घरी सोडतो तुला.’
गोपाळ तयार झाला. रतनने त्याला मागच्या सीटवर बसवले. आता त्याने टॅक्सीची दिशा बदलली. काही अंतरावर गोपाळने गाडी थांबवली आणि उतरून काळोखात गडप झाला.
रस्त्यात टॅक्सी चालवताना रतन आपल्या मित्राचाच विचार करत होता. एवढ्या रात्री रस्त्यात चिटपाखरूही नसताना तो काय करत होता, याचा त्याला उलगडा होत नव्हता. अन अचानक त्याची गाडी थांबली. त्याने स्टार्ट करण्याचा बराच प्रयत्न केला, पण तिने चालू व्हायचे काही नाव घेतले नाही.
बहुतेक आजची रात्र आपल्याला इथेच रस्त्यात काढावी लागते की काय, असे त्याला वाटले. तसाच काही तरी बडबडत तो बाहेर आला. मॅकेनिकचा कानोसा घेण्यासाठी त्याने इकडे-तिकडे पाहिले.आपण कुठे थांबलो आहे, याचा त्याला अंदाज आला. पुलाजवळ एक वर्कशॉप होतं, ते त्याला ठाऊक होतं. मिस्त्री तिथेच पतर्याच्या टपरी वजा खोक्यात झोपला होता. त्याला उठवून आपल्यासोबत न्यायला त्याला बरीच खटपट करावी लागली आणि उशीरही झाला!
रतन मिस्त्रीसोबत गाडीजवळ पोहचला, आणि त्याला धक्काच बसला. दोन पोलिस शिपाई टॉर्चच्या उजेडात टॅक्सीत काही तरी शोधत होते.
रतन आल्यावर त्यातला एकटा गाडीच्या बॅनेटवर काठी मारून दरडावत म्हणाला, ‘ ही रक्ताची काय भानगड आहे?’
रतनच्या अंगावर सर्रकन काटा उभा राहिला. काहीसा थरथरत ओरडला, ‘रक्त, कसलं रक्त?’
‘ये शहाणपट्टी शिकवू नको. बर्या बोलानं बोल, ही रक्ताची काय भानगडाय. कोठून आलं हे रक्त?’
रतनचं तर डोकंच चक्रम झालं. टॅक्सीच्या मागच्या सीटवर रक्ताचे डाग कोठून आले? हेच त्याला कळेना. तो विचार करू लागला.- रक्ताच्या या डागाचा गोपाळशी तर काही संबंध नाही? कारण शेवटच्यावेळी तोच मागच्या सीटवर बसला होता. म्हणजे गाडीत बसताना गोपाळ जखमी होता. त्याच्या जखमेतून रक्त वाहत असले पाहिजे. परंतु, रस्त्यावर तर तो एकटाच दिसला. आपण जखमी असल्याचेही तो काही बोलला नाही. तेवढ्यात पोलिस शिपायाने त्याच्या खांद्याला धरून जोरानं हलवलं, ‘ अरे ये,कुठल्या तंद्रीत गडप झालास? चल, आमच्याबरोबर ठाण्याला!’
‘ मला तर जाऊ द्या साहेब,’ मिस्त्री गयावया करत म्हणाला. शिपाई त्याला निरखून पाहत म्हणाला, ‘ नाही, तुलाही पोलिस ठाण्यात यावं लागेल.तुला असा मोकळा सोडणार नाही.’
रतन आणि मिस्त्रीला शिपायांसोबत पोलिस ठाण्यात जावे लागले. पुढील तपासासाठी टॅक्सीही पोलिस ठाण्यात आणण्याची व्यवस्था केली गेली.
वाटेत रतन विचारात गढून गेला होता. त्याची अवस्था मोठी विचित्र झाली होती. काय करावे, समजेनासे झाले होते. शेवटी तो पोलिसांना काय सांगणार होता? एकदा त्याचं मन म्हणत होतं, जे काही घडलं ते खरं खरं सांगावं. यामुळे गोपाळ संशयाच्या भोवर्यात सापडला असता. सापडला तर सापडला, आपण तर सुटू. गाडीच्या मागच्या सीटवर बसताना त्याने आपण जखमी आहोत, असे का बरं सांगितलं नाही? नक्कीच तो कुठल्या तरी भानगडीत अडकला असला पाहिजे, नाही तर रस्त्यात असा एकटा चालला नसता.मग त्याला जुनी मैत्री आठवली. त्याला अशाप्रकारे अडकवणे योग्य नाही, असे त्याला वाटू लागले. शेवटी त्याने निश्चय केला, गोपाळचा पोलिसांसमोर अजिबात विषय काढायचा नाही.
ठाण्यात जाबजवाबादरम्यान रतनने खोटीच कहानी रचून सांगितली. ‘शेवटचे भाडे सोड्ून आपण घरी निघालो होतो तेवढ्यात दोघांनी हाताच्या इशार्याने गाडी थांबवली. आणि ते दोघे पिस्तूल दाखवून गाडीत घुसले. आणि जिथे गाडी बंद पडली होती,तिथंपर्यंत घेऊन आले होते. मी त्या गुंडांना म्हटलं की, गाडी आता गाडी सुरू होणं अशक्य आहे, तेव्हा ते उतरून जंगलाच्या दिशेने निघून गेले.’
‘पुढे काय झालं?’ इन्स्पेक्टर म्हणाला
‘झालं, मी मिस्त्रीला बोलवायला गेलो, परत आलो तेव्हा हे दोन साहेब तिथे होते.’
‘मग रक्त कसे लागले सीटला?’
‘ साहेब, मला काहीच माहित नाही. बहुतेक दोघा गुंडांपैकी कोणी तरी एकटा जखमी असावा.हा डाग त्याच्याच रक्ताचा असला पाहिजे.’
रतनने तर सांगितलं, पण पोलिसांना तो खोटं सांगतो आहे, असं वाटत होतं. तो आणि मिस्त्री कुठल्या तरी गुन्ह्यात सामिल असले पाहिजेत, असा पोलिसांचा संशय होता. रतन आणि मॅकेनिकला अटक करण्यात आली. रतनने बायकोला फोन केला, कारण ती नवरा घरी न आल्याने काळजीत होती.
दुसर्या दिवशीच्या वर्तमानपत्रात रतन आणि मॅकेनिकचा फोटो छापून आला. रात्रीच्या घटनेचा सगळा तपशील बातमीत दिला होता. इकडे पोलिस त्याला वारंवार विचारत होते, पण तो दोन गुंडांच्या कहानीवरच ठाम होता.
दुपारी बारा वाजता पोलिस ठाण्यात एक फोन आला. बोलणार्याने आपले नाव आणि पत्ता सांगितला आणि म्हटले, ङ्ग या रात्रीच्या केसची वस्तुस्थिती जाणून घ्यायची असेल तर मी सांगितलेल्या पत्त्यावर या. ङ्घ
फोन गोपाळने केला होता. पोलिसांचे पथक त्याच्या घरी पोहचले. तो अंथरुणावर पडला होता. हाताला पट्टी बांधली होती. तो म्हणाला, ‘ पेपरमधली बातमी वाचली. त्यात जे काही छापलं आहे, ते सगळं खोट आहे.’
‘मग खरं काय आहे?’ इन्स्पेक्टर म्हणाला
यावर गोपाळने रात्री जे काही घडलं,ते सगळं सविस्तर सांगितलं. तो म्हणाला, ‘मी आणि रतन लहानपणापासूनचे मित्र आहोत. त्याला ठाऊक आहे, मी गुन्हेगारी क्षेत्रात आहे ते! काल रात्री मी आमच्या साथीदारांसोबत एका बंगल्यात चोरी करायला शिरलो होतो. पण तिथे आमच्या हाती काही लागलं नाही. परताना मी जखमी झालो. तेवढ्यात रतनने मला रस्त्यात पाहिले आणि टॅक्सी थांबवली. आम्ही दोघे खूप वर्षांतून भेटलो होतो. त्याने मला गाडीत बसवले. त्यावेळी माझ्या जखमेतून वाहणारे रक्त त्याच्या गाडीच्या सीटला लागले. मी त्याला काहीही सांगितलं नव्हतं. पण आज पेपरमध्ये वाचलं, तेव्हा लक्षात आलं की, त्याने पोलिसांना खरा प्रकार सांगितलाच नाही. मला वाचवण्यासाठी तो स्वत: गोत्यात यायला तयार झाला. मग अशावेळेला मी कसा गप्प बसू शकतो?’ बोलताना गोपाळला दम लागला.
‘पण याची काय गॅरंटी की तू खरे बोलतो आहेस ते?’ इन्स्पेक्टर म्हणाला. तेव्हा गोपाळ हसून म्हणाला, ‘ इतक्या दिवसांपासून खोट्याचं खरं करत आलो आहे, आणि आज खरं सांगण्याचा प्रयत्न करतो आहे तर ते तुम्हाला खोटं वाटतं आहे. कमाल आहे!’
गोपाळ पोलिसांबरोबर ठाण्यात आला. रतनला भेटला. म्हणाला, ‘ मित्रा, माझ्यासाठी तू तुझे स्वत: चे आयुष्य गोत्यात घालायला निघाला आहेस? पोलिसांना खरे काय , ते सारे मी सांगितले आहे. माझा अपराध आपल्या शिरावर का घेतो आहेस?’...
रतन गोपाळचे फक्त ऐकत राहिला.नंतर गोपाळने बरीच विनंती केल्यावर रतनने खरा प्रकार पोलिसांसमोर कथन केला. आपल्या खोट्या कहानीबद्दल माफी मागितली. गोपाळला अटक करण्यात आली. व रतन आणि मिस्त्री यांची सुटका झाली.
जाताना रतन म्हणाला, ‘पण मित्रा, हे सत्य तुला महागात पडेल. पोलिस तुला सोडणार नाहीत.’
‘मित्रा, मला वाचवण्यासाठी तू अडचणीत यावास, हे मला कसे रुचेल बरं? आणि असे मी कदापि घडू देणार नाही. तू मैत्रीचे कर्तव्य पार पाडलेस, पण मग ते मी कसा विसरू? अरे, माझ्या खर्या बोलण्यानं कदाचित माझं पुढचं आयुष्य तरी तुझ्या इच्छेप्रमाणं बदलून जाईल.’ असे म्हणत गोपाळ हसला. आणि पटकन रतनच्या डोळ्यांत पाणी आलं.
Subscribe to:
Posts (Atom)