बालकथा
महाराज कृष्णदेवरायाचा दरबार भरला होता. उंची भरजरी पोशाख घातलेला एक व्यापारी दरबारात हजर झाला.त्याचासोबत एक मोठी संदूक होती.व्यापारी हात जोडून महाराजांना म्हणाला,महाराज,मी तीर्थयात्रेला निघालो आहे.या संदुकीमध्ये माझ्या पूर्वजांचा ठेवा आहे.हा ठेवा सुरक्षित ठिकाणी ठेवावा. परतल्यावर घेऊन जाईन.
राजाने संदुकीचे वजन केले.व्यापार्याला त्याची पावती दिली गेली. ती संदूक तेनालीरामकडे सुपूर्द करण्यात आली.काही महिने उलटल्यानंतर व्यापारी परत आला. त्याने आपली संदूक मागितली. संदूक घेण्यासाठी तो तेनालीरामच्या घरी गेला.पण तिथे तो अस्वस्थ झाला. कारण संदूक फारच हलकी वाटत होती. तिचे वजन करण्यात आले. तिचे वजन पहिल्यापेक्षा पाव भागच भरले.तेनालीराम समजून चुकला की, व्यापार्याने चलाखी केली आहे.
तेनालीरामने संदूक अगदी बारकाईने निरखली.तो घाबरला.तसाच दरबारात पोहचला.महाराजांना हात जोडून म्हणाला,अन्नदाता,या व्यापार्यांचे पूर्वज माझ्या घरात घुसले आहेत.संदूक इकडे आणू देत नाहीत.
व्यापारी ओरडून म्हणाला,हा खोटारडा आहे, महाराज.माझी संदूक तो हडपू पाहात आहे.
दरबारातील काही मंडळी व्यापार्याच्या बाजूने झाले.राजा म्हणाला,तेनालीराम, आपण सगळे तुझ्या घरी जाऊ.पण लक्षात ठेव, तू खोटा निघालास तर तुला मोठ्या शिक्षेला सामोरे जावे लागेल.
दरबारी मंडळींसोबत राजा कृष्णदेवराय तेनालीरामच्या घरी आले.तेनालीरामने त्या सगळ्यांना संदूक ज्या खोलीत ठेवली होती,तिथे नेले.राजाने पाहिले, संदूकीला चारी बाजूंनी मुंग्या लागल्या आहेत.त्या आत-बाहेर करत आहेत.राजाने संदूक खोलण्याचा आदेश दिला. त्यात साखर भरली होती. ती निम्म्यापेक्षा जास्त मुंग्यांनी फस्त केली होती.
दरबारीमंडळींच्या चेहर्यावरचा रंगच उडाला.राजाने व्यापार्याला कैद करण्याचा हुकूम सोडला. त्यावर तो चपापला. घाबरला. त्याने दरबार्यांचे बिंग फोडले. काही दरबार्यांनी त्या ठकाला बोलावून तेनालीरामच्या विरोधात षडयंत्र रचले होते. तेनालीरामला बक्षीस मिळाले.आणि दरबार्यांना शिक्षा मिळाली.
No comments:
Post a Comment