Monday, November 14, 2016

पाई संखुमी यांच्या चाळीस वर्षांच्या लढ्याला यश



पाई संखुमी या मिझोराममध्ये महिला अत्याचाराच्या विरोधात लढत आहेत.त्यांच्या प्रयत्नांमुळेआंदोलनांमुळे पित्तृसत्ताक राज्यातल्या महिलांच्या बाजूने अनेक कायदे झाले आहेतआज तिथल्या महिलांना ताठ मानेने जगण्याची संधी त्यांच्यामुळे मिळाली आहेसध्या पाई संखुमी या त्यांनी स्थापन केलेल्या एमएचआयपी संस्थेच्या माजी अध्यक्ष आहेत तर  मिझोराम लोकसेवा आयोगाच्या सदस्याही आहेत.त्यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा.
पूर्वोत्तरमधील दुसर्या राज्याप्रमाणेच मिझोराममधील महिलादेखील खूप कर्मठ आहेतत्यांना जन्मापासूनच भेदभाव झेलावा लागतो.कुटुंबात मुलगा झाला तर घरातली बुजुर्ग माणसं खूश होऊन म्हणतआपल्या घराण्यात साहसी योद्धा जन्माला आला आहेजो हत्तीलादेखील मारून टाकेल.पण मुलगी जन्माला आल्यावर लोक चिंतीत होऊन म्हणत,हिचा सांभाळ करायचा म्हणजे मिथून (वळूपाळण्यासारखं खर्चिक आहे.मिझोराम राज्यात मिथूनला अपशकूनदेखील मानलं जातं.वास्तविक मिझो समाज पूर्णपणे पितृसत्ताक मानला जातो.इथे महिलांना कुठल्याही चल-अचल संपत्तीमध्ये कसलाही अधिकार मिळत नव्हताइथे माहेर किंवा सासरकडून तिला कुठल्याही प्रकारची भेटवस्तू देण्याची परंपरा नाहीतिचा नवरा कधीही तिला तलाक देऊन घरातून हाकलून लावू शकत होताअशातनवर्याने सोडलेल्या बाईला जगण्यासाठी कुठला भत्ता-बित्ता देण्याची योजना नव्हतीहे सगळं पाहून पाई संखुमी यांना फार वाईट वाटायचं.
ग्रॅज्यूएशननंतर शिक्षिकेची नोकरी करताना पाई संखुमी यांनी स्त्री शिक्षण आणि स्त्री सशक्तिकरणाच्या दिशेने काम करायला सुरुवात केली.1974 मध्ये महिलांच्या हिताच्यादृष्टीने त्यांनी एमएचआयपी(मिझो मॅछे इन्सुइख्वाम पाउल)नावाची संस्था स्थापन केलीमहिलांच्या हितांसाठी काम करणार्या इतर संस्थाही या संस्थेशी जोडल्या गेल्या.या संस्थांच्या प्रयत्नांमुळे तीन वर्षांपूर्वी राज्य विधी आयोगाने मिझो मॅरेज बील,मिझो इनहेरिटेंस बील आणि मिझो डिवोर्स बील यांमध्ये संशोधन करून त्यात महिलांच्या हितांच्या मुद्द्यांचा आंतर्भाव करण्यात आलाआता त्याचे कायद्यातही रुपांतर झाले आहे.मिझो महिलांच्या बाजूने कायदा बनायला जवळ जवळ चाळीस वर्षे उलटलीइतकी वर्षे त्यासाठी संघर्ष करावा लागलाआता मिझो महिलांना विवाह,वारसदार आणि तलाक आदी प्रकरणांमध्ये आपला हक्क मिळू लागला आहे..
बालपणीच्या तीन घटनांमुळे त्यांच्या विचारात परिवर्तन झालेएक म्हणजे1959 मध्ये भयंकर दुष्काळ पडला होतात्यावेळी भुकेने माणसंमरायची.त्याच दरम्यान मिझो नॅशनल फ्रंटने आपले आंदोलन सुरू केले होतेत्यांचे वडिल फ्रंटचे एक मोठे नेते होते.त्या आंदोलनाच्या दरम्यानच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झालात्यांच्या मृत्यूनंतर त्या एकट्या पडल्या होत्यावडिलांच्या पश्चात घरची आर्थिक परिस्थिती फारच नाजूक बनली होतीया दरम्यान उच्चशिक्षणासाठी शेजारील राज्य मेघालयची राजधानी शिलाँंग गेल्या होत्यात्यांना स्कॉलरशीप मिळत नसती तरत्यांचे शिक्षणदेखील पूर्ण झाले नसते.त्यांच्या स्वत:च्या समस्या तर होत्याच,पण अन्य महिलांची दुर्दशा पाहून त्यांचे हृदय पिळवटून जायचंलहानपणीच्या ज्या तिसर्या घटनेमुळे त्यांना निश्चेष्ट बनवलं होतंती घटना म्हणजे सैनिकांनी दोन स्थानिक महिलांवर केलेला बलात्कार.त्यावेळेला त्या दहा-बारा वर्षांच्या होत्यानोव्हेंबर 1966 च्या एका रात्री सैनिकांनी एका स्थानिक नेत्याच्या घराला वेढा घालून त्याच्या दोन्ही मुलींवर बलात्कार केला.त्या घटनेने त्या दोन्ही बहिणींना मानसिकदृष्टीने उद्वस्त करून टाकलंघटनेच्या दशकानंतर केंद्राने त्यांना भरपाई म्हणून पाच-पाच लाख रुपये पाठवलेआता त्या ब्राइड प्राइस म्हणजेच नवरींच्या खरेदीच्या विरोधात आवाज उठवत आहेत.याशिवाय कौटुंबिक हिंसा,बलात्कार आणि महिलांवर होणार्या दुसर्या अन्यायाविरोधातदेखील काम करत आहेतराज्यात महिलांना 33 टक्के आरक्षण देण्यासाठीही त्या आवाज उठवत आहेत

No comments:

Post a Comment