Monday, November 14, 2016

मुबलक आणि शुद्ध पाणीपुरवठा शक्य आहे का?


      महाराष्ट्रात शहरात होणारा किंवा गावाला होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहेत्याला काळवेळ तर राहिलाच नाहीपण तो पुरेसाही होत नाही.शुद्धतेबाबत तर ठणाणा आहेचसाहजिकच जाईल तिकडे पाण्याच्या नावाने शंख मारल्याचे आपल्याला ऐकू येतेका पाण्याचा प्रवास दिवसेंदिवस बिकट होत चालला असून पुढच्या काळात नागरिकांच्या पुढ्यात काय वाढून ठेवले आहेयाचा विचार करता सगळा अंध:कार दिसतो आहे.पाण्याचा मुबलक पुरवठा होण्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न होण्याची गरज आहेराज्यकर्त्यांनी हा प्रश्न फार गांभिर्याने घ्यायची गरज आहे.
     गेल्या पंधरा-वीस वर्षातल्या कालावधीतला आढावा घेतला तर आपल्या चिंताजनक वाटणारं भविष्य लक्षात येणार आहेसरकारने यात काहीच केलं नाहीहे मोठं दुर्दैव आहे.पूर्वी  ज्या गावाची लोकसंख्या कमी होती व जिथे नळयोजना होत्यात्या गावात पूर्वी दोन वेळा पाणी यायचेपरंतु लोकसंख्या वाढेल तसे हळूहळू दिवसातून एक वेळानंतर एका दिवसाआड असे पाणीपुरवठ्याचे प्रमाण वरचेवर कमी कमी होत गेलेले आहेशहरात तर पाणीपुरवठयाची ही समस्या गंभीर बनलीदररोज पाणीपुरवठा होणेहे ब-याच गावांसाठी चैनीची गोष्ट झाली आहेकारण महाराष्ट्रातील बहुतेक मोठ्या शहरांमध्ये चार दिवसाआडपाच दिवसाआड पाणीपुरवठा होत आहेगेल्या उन्हाळ्यात लातूरसारख्या शहराला तर मिरजेतून रेल्वेने पाणी पुरवठा करण्यात आलाउन्हाळ्याच्या काळात बहुतांश गावांना टँकरने पाणी पुरवठा हा त्यांच्यासाठी पाचवीलाच पुजला आहे.दरवर्षी राजकर्त्यांकडून कायमस्वरुपी पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिले जातेपण ते शेवटी आश्वासनच ठरते.
     आपण एक बाब लक्षात घेऊ या.शहरांनागावांना होणारा पाणीपुरवठा पुढे पुढे कमी कमी होत आला आहेअसं झालं का पहाचार-पाच वर्षे उलटली आहेत आणि आठवड्यातून दोन वेळा होनारा पाणीपुरवठा चार-पाचवर आला आहेअसं कुठल्याच गावात किंवा शहरात घडलेलं नाहीउलट आठवड्यातून दोन वेळा होणारा पाणी पुरवठा एकवर आला आहेत्यामुळे आगामी काळात या शहरांच काय होणारअसा प्रश्न पडतोतेव्हा भीती व्हायला होतंआज ग्रामपंचायतनगरपरिषरनगरपालिका किंवा महापालिका आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा का होईना नाममात्र फी आकारून पाणी पुरवठा करतंमात्र त्याच गावात रोज पाणी विकत घेण्याची संख्या मोठी आहेतीन ते पाच रुपये घागर असे पाणी विकत घेतलं जातंका धंदा मोठा तेजीत चालला आहेनागरिकांचा आमदनीतला बराच पैसा नुसता पाण्यावर चालला आहेहा खर्च होतोय तो शुद्ध पाण्यासाठीग्रा.पं.किंवा नगरपालिका पाणीपुरवठा करताततो शुद्ध स्वरुपाचा आहेअसे कुठेच म्हटले जात नाहीआणि माणसाला जे काही आजार होतातत्यातले बहुतांश आजार पाण्यामुळे होतातयामुळे ही भीती लोकांमध्ये बसल्याने माणसे शुद्ध पाण्यासाठी पाण्याचासारखा पैसा खर्च करून स्वत:चीच फसवणूक करून घेत आहेत.
     एक लीट्ररपासून वीस लीटरपन्नास लीटरपर्यंतचे शुद्ध पाण्याचे जार बाजारात उपलब्ध आहेतलोक त्याची खरेदी करत आहेतपण ते पाणी शुद्ध असतेयाची त्यांना गॅरंटी आहेअसा सवाल उपस्थित होतोकाही सामाजिक संस्थांनी अशा पाण्याच्या चाचण्या केल्या आहेत,त्यावरून पॅकबंद मिळणारे पाणी शुद्ध आहेअशा म्हणण्याला तडा गेल्याचे जाणवले आहेशासकीय पातळीवर लोकांची ही जी फसवणूक होत आहेत्याबाबतीत उदासिनताच आहेत्यामुळे शुद्ध पाण्याबाबत खूप मोठा प्रश्न निर्माण झाला आहेयावर सरकारी नियंत्रण असण्याची गरज आहे.
ठिकठिकाणच्या ग्रामपंचायतीनगरपालिका किंवा महापालिकांकडून भरपूर पाणीपुरवठा तर केला जात नाहीचपण जे पाणी पुरवले जाते ते निदान शुद्ध तरी असावेअशी माफक अपेक्षा लोकांची आहेपण तीही पूर्ण होत नाहीअर्थात अशावेळी नगरपालिकांना सगळे पाणी शुद्ध करता येत नाही ही वस्तुस्थिती आहेमात्र तसे करता येत नसेलतर दोन प्रकारचा पाणीपुरवठा केला जावाअशी एक कल्पना अनेक तज्ज्ञ वरचेवर मांडत असतातधुण्या-भांड्यांसाठीआंघोळीसाठी जे पाणी दिले जाते ते पाणी शुद्ध करण्याची तशी गरज नाहीपण जनतेला पिण्याचे शुद्ध पाणी मिळायला हवेचयाबाबत दुमत असण्याचे कारण नाहीकर्नाटकातील काही खेड्यांमधून फक्त पिण्याचे पाणी अधिक शुद्ध स्वरूपात देण्याची एक योजना राबवली जात आहेही योजना त्यांनी अगदी खेड्यापाड्यात पोहचवली आहेतिला यशही मिळालेत्या योजनेमध्ये गावामध्ये मोठे फिल्टर बसवले जातात आणि नागरिकांना पिण्याचे फिल्टर्ड पाणी जे बाजारात 15 रुपयांना एक बाटली या दरात मिळतेते दोन रुपयांना 20 लिटर या दराने पुरवले जात आहेसकाळी उठल्याबरोबर लोक दोन रुपयांचे नाणे या यंत्रात टाकतात आणि त्यांना 20 लिटर पाणी मिळतेअशा प्रकारच्या योजना महाराष्ट्रातही राबवल्या गेल्या पाहिजेतत्यामुळे शुद्ध पाण्यासाठी लोकांना जो मोठा खर्च करावा लागत आहेतो वाचतोचशिवाय पाण्यामुळे होणार्या आजारांनाही पायबंद घातला जातेमहाराष्ट्रातल्या इचलकरंजीसारख्या शहरांमध्ये सामाजिक संस्थांच्या माध्यमातूनस्थानिक स्वराज्य संस्थांकडून अशा शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहेयेत आहेपण यासाठी अधिक प्रंमाणात स्थानिक स्वराज्य संस्थाशासन यांनी जबाबदारी उचलली पाहिजे.अशक्य असे काहीच नाहीफक्त इच्छशक्तीची आवश्यकता आहे.

No comments:

Post a Comment