Friday, January 31, 2020

महागाईचा विस्फोट

घराचं बजेट कोलमडले  आहे. घरखर्च वाढला आहे,पण इकडे उत्पन्न मात्र जैसे थे आहे. त्यामुळे लोकांना घरखर्च चालवताना नाकीनऊ येऊ लागलं आहे. याला पुष्ठी देणारा एक सर्व्हे नुकताच पुढे आला आहे. हा सर्व्हे देशाच्या सुस्तावलेल्या अर्थव्यवस्थेच्या पार्श्‍वभूमीवर चिंतेत टाकणारा आहे. सध्या सामान्य माणसावर महागाई आणि आर्थिक मंदीचा डबल मारा होत आहे. आयएएनएस सी वोटरच्या सर्वेक्षणानुसार, एकूण ६५.८ टक्के लोकांचे म्हणणे आहे की त्यांना रोजचा खर्च करणंही कठिण होत आहे. सर्वेक्षणानुसार, अर्थसंकल्पाच्या आधी केलेल्या या सर्वेक्षणात सध्याची लोकांची आर्थिक स्थिती, रोजच्या खचार्चा ताळमेळ बसवताना होणारी तारांबळ समोर आली आहे. पगार वाढत नाही, मात्र खाद्यपदार्थांपासून सर्व गरजेच्या वस्तूंच्या किंमतीत गेल्या काही महिन्यात वाढ झाली आहे.

Sunday, January 26, 2020

काळजी कशाची करता...?

आपण एकाद्या नदीवर बांधलेल्या पुलाखालून वाहणारे पाणी कधी पाहिले आहे का? या वाहत्या पाण्याकडून चिंतेपासून दूर राहण्याचे दर्शन आपल्याला पाहायला मिळते. म्हटलं जातं की, पुलाखालून जे पाणी एकदा वाहून जातं, ते पाणी पुन्हा कधी परतून येत नाही. पुलाखालून वाहणार पाणी नवीन होऊन जातं. तसंच आपणही आयुष्यातल्या दुःखद आठवणी पुलाखालून वाहणाऱ्या पाण्यासारखं कायमच विसरून गेलं पाहिजे.

Saturday, January 25, 2020

भ्रष्टाचाराला आवर घालणं कठीण

आपल्या देशात भ्रष्टाचार हा जणू रोजच्या जगण्याचाच भाग झाला आहे. सरकारी कामे करण्यासाठी 'हात ओले' करण्याचा अनुभव अनेकांना नेहमीच येत असेल. कारण लाच घेतल्याशिवाय टेबलावरचे 'पान'ही हालत नाही. भ्रष्टाचारात भारताचे पाय आणखी खोलात जात असल्याचे एका आकडेवारीवरून शिक्कामोर्तब होत आहे. 'ट्रान्सपरन्सी इंटरनेशनल' या संस्थेने जाहीर केलेल्या भ्रष्टाचार निर्देशांक यादीत (करप्शन परसेप्शन इंडेक्स-सीपीआय) भारत 180 देशांच्या यादीत 80 व्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत भारताची दोन स्थानावर घसरण झाली आहे. गेल्यावर्षी भारत 78 व्या स्थानावर होता.

Friday, January 24, 2020

शेट्टीच्या वाट्याला संवाद नव्हतेच


कर्नाटकातील एका शेतकर्याला वाटलं की, आपल्या नऊ वर्षाच्या मुलाला- मुड्डूला शिक्षणात अजिबात रस नाही. मग त्याने त्याचे कान पकडून एका सोबत मुंबईला जाणार्या बसमध्ये बसवले. आणि त्याला तिथे जाऊन कामधंदा बघ, असं सांगितलं. मुड्डूने तसं केलंही. मुंबईतल्या लेमिंग्टन रोडवरील एका पंजाबी ढाब्यावर 12 रुपये महिना पगारावर काम करू लागला. नंतर टाटा ऑइल मिलच्या कँटीनमध्ये काम मिळालं. तिथे सायंकाळी बॉक्सिंग खेळले जाई. तो बॉक्सिंग शिकू लागला. तिथे तो चॅम्पिअन बनला. त्याचा पगार महिन्याला 75 रुपये झाला. तो मुंबईचा आठ वर्षे चॅम्पिअन राहिला. एक दिवस चित्रपटांचा हिरो बाबूराव पैलवान यांनी त्याला पाहिलं. एका चित्रपटात त्याला हाणामारीच्या स्टंटसाठी उभं केलं. संध्याकाळी 200 रुपये मिळाल्यावर मुड्डूने ठरवलं की, आता बस! हेच काम करायचं.

Sunday, January 19, 2020

यश मानण्यावर आहे


सर्वसामान्यपणे यशाची व्याख्या ही नाव, कीर्ती,पैसा कमावणं अशी केली जाते. आजच्या युवकाची ही यशाची सर्वसाधारण कल्पना आहे. दहा वाय दहाच्या खोलीत राहून एखादा माणूस कोट्यधीश झाला वगैरे स्वरुपाच्या गोष्टी ऐकायला सर्वांनाच आवडतात. पण 130 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात असं प्रत्येकाच्या बाबतीत घडणं अशक्य आहे. मात्र कीर्ती आणि नशीब ही फक्त काही थोड्या लोकांची मक्तेदारी असावी आणि तुमच्या-माझ्यासारख्या लोकांनी फक्त त्यांच्या यशोगाथा ऐकाव्यात ,पण स्वत: कधीच यशस्वी बनू नये, असं नाही. आपणही यशस्वी होणार नाही, असं नाही. आपल्या प्रत्येकाकडे यशस्वी होण्याची शक्ती आणि क्षमता आहे. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने यशस्वी होऊ शकतो. यात अजिबात शंका नाही. मात्र आपल्या आवडीनिवडीनुसार आपल्या यशाची व्याख्या बदलते, ते आपण समजून घेतली पाहिजे. मानसन्मान, पैसा हीच यशाची व्याख्या आहे, अशी मनाशी खूणगाठ बांधून घेतली असल्यास मात्र तुमच्या पदरी निराशा ही येणारच. आयुष्यात यश मिळवायचे असेल तर आपल्या यशाची व्याख्या शोधता आली पाहिजे.

Saturday, January 18, 2020

तुमच्या लाइफची इकिगाई काय आहे?


इकिगाई जपानचा आत्मविकासाचा आवडीचा कॉन्सेप्ट आहे. प्रत्येकाचा एक इकिगाई असायला हवा. आपल्या इकिगाईमध्ये चार गोष्टी असणं आवश्यक आहे. 1) ते काम ज्यावर तुमचं प्रेम आहे. 2) ते काम ज्याची जगाला गरज आहे. 3)ते काम जे करण्यासाठी तुम्ही मास्टर आहात 4) ते काम ज्याच्याने तुम्ही पैसा कमवू शकता. जर एकादे काम या चार अटी पूर्ण करत असेल तर ते तुमच्या लाइफची इकिगाई होऊ शकेल. एकदा का तुम्ही तुमच्या जीवनाची इकिगाई शोधलात की, मग आयुष्यात शांतताही प्राप्त होऊ शकते.तुम्ही तुमचं आयुष्यात आरामात, आनंदात जगू शकाल.  आता तुम्ही म्हणाल ही इकिगाई काय भानगड आहे. तर हा शब्द जपानी आहे. याचा जपानी भाषेत अर्थ होतो- सकाळी लवकर उठण्याचे कारण किंवा जीवनाचा उद्देश. आपल्यालाही आपल्या जीवनाचा इकिगाई शोधायला हवा. एकदा का तुम्हाला तुमचा इकिगाई सापडला की, मग तुमचे लाइफ बनलेच म्हणून समजा. चला, या चार गोष्टींबाबत अधिक विस्ताराने पाहू.

Friday, January 17, 2020

रिजेक्ट झालेले डफलीवाले...गाणे सुपहिट ठरले


दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते तेलगु फिल्मकार काशीनाथुनी विश्वनाथ ( के. विश्वनाथ) आणि त्यांच्या सिरी सिरी मुव्वा या तेलगु चित्रपटाची नायिका जयाप्रदा हिने 1979 मध्ये प्रदर्शित झालेल्या सरगम चित्रपटाद्वारा हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला होता. हा तेलगु चित्रपट निर्माता एन. एन. सिप्पी हिंदीमध्ये बनवत होते. सिप्पी आणि विश्वनाथ यांनी याच्या संगीताची जबाबदारी लक्ष्मीकांत-प्यारेलाल आणि गाणी रचण्याची जबाबदारी आनंद बक्षी यांच्यावर सोपवली होतीलक्ष्मी-प्यारे आणि आनंद बक्षी यांच्यासाठी सरगम हा चित्रपट एक आव्हानच होते. एक तर तेलगू चित्रपटांचा डंका वाजत होता. आणि त्यात मानवी मनाचे तरंग अचूक टिपणार्या विश्वनाथ यांचं समाधान करणं सोपं नव्हतं. मूळ चित्रपट पाहून बक्षी यांनी सात गाणी लिहिली. लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी एक एक करत त्यांच्या धून बनवत आणि विश्वनाथ यांना ऐकवत.

आणि ती लीला मावशी बनली


भारतात सिनेमा 1931 मध्ये बोलायला लागला. रामलीला, नाटक, नौटंकीमध्ये काम करणार्या कलाकारांनासुद्धा वाटू लागलं की आपणही एक दिवस सिनेमात काम करू. उत्तर प्रदेशमधील जायस (जिथे पद्मावतचे रचनाकार मलिक मोहम्मद जायसी यांचा जन्म झाला होता.) मध्ये रामप्रसाद मिश्रा नावाचा असाच एक कलाकार होता. जमीनदार कुटुंबातील रामप्रसाद यांचा विवाह एका बारा वर्षाच्या लीला नावाच्या मुलीशी झाला होता. नवर्याने आपल्या बायकोलाही आपल्या रंगात रंगवून टाकलं होतं. ते तिला सिनेमाचे रीळ दाखवून आपल्याला यात काम करायचे आहे, असे सांगायचे. लीलाला कळायचं नाही की, या छोट्याशा रीळमध्ये तिचे शरीर कसे सामावेल?

Tuesday, January 14, 2020

कर्जमाफी ठरतेय डोकेदुखी


शेतकर्यांची कर्जमाफी देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी डोकेदुखी ठरत आहे. गेल्या दशकभरात शेतकर्यांचे जवळपास पावणेपाच लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले आहे. यातील दोन लाख कोटी रुपये तर गेल्या दोन वर्षातच माफ करण्यात आले आहे. हा विषय मोठा गंभीर असून शेतकर्यांचे कर्ज माफ करण्यात येत असले तरी त्यांच्या परिस्थितीत मात्र कसलीच सुधारणा झाली नसल्याचे दिसत आहे. कर्ज देण्याचे आणि माफ करण्याचे चक्र असेच चालू राहिले तर शेतकरी सुस्तावत जाईल आणि इकडे देशाची अर्थ व्यवस्था बिघडत जाईल. मतासाठी हे चक्र चालू राहण्याचीच शक्यताच अधिक दिसत असल्याने, याचा सर्वपातळीवर विचार होण्याची आवश्यकता आहे. नुकतेच जाहीर करण्यात आलेले शेतकर्यांच्या कर्जमाफीसंदर्भातील एसबीआय रिसर्चचे आकडे धक्कादायक म्हटले पाहिजेतयात म्हटले आहे की, गेल्या दशकभरात जितकी रक्कम शेतकर्यांना कर्जमाफीच्या स्वरुपात देण्यात आली आहे, ती देशातल्या उद्योग जगतात अडकलेल्या कर्जाच्या म्हणजेच एनपीएच्या 32 टक्के आहे. आणखी काही वर्षे अशीच शेतकर्यांना कर्जमाफी देत राहिल्यास देशासमोर एनपीएचा एक मोठा डोंगर उभा राहील.

Sunday, January 12, 2020

बेरोजगारांच्या आत्महत्या वाढल्या


कर्जाला कंटाळून आत्महत्या करत असलेल्या शेतकर्यांमुळे देशाची प्रतिमा आधीच मलिन झाली असताना देशापुढे आणखी एक संकट आ वासून उभे राहिले आहे. हाताला काम नाही म्हणून बेरोजगारदेखील मोठ्या प्रमाणात स्वत:ला संपवत आहेत. देशापुढील बेरोजगारी ही एक मोठी समस्या आहे. नोकर्या देतो म्हणून सत्तेवर आलेल्या राजकीय पक्षांनी नोकर्या तर दिल्या नाहीतच पण अशा मुलभूत प्रश्नांवरचे लोकांचे लक्ष हटवण्यासाठी दुसरेच मुद्दे देशापुढे आणून सगळा सावळा गोंधळ मांडून ठेवला आहे. बेरोजगारीने बेजार झालेल्या युवकांनी आत्महत्या करण्यात आता शेतकर्यांनाही मागे टाकले आहे. नॅशनल क्राइम रिकॉर्डस ब्युरो (एनसीआरबी) च्या ताज्या आकडेवारीनुसार भारतात 2018 मध्ये प्रत्येक दोन तासाला तिघा बेरोजगारांनी आत्महत्या केली आहे. म्हणजेच रोज सरासरी 36 टक्के बेरोजगार आत्महत्या करत आहेत. ही संख्या शेतकरी आत्महत्येपेक्षा अधिक आहे. भारत देश हा युवकांचा देश असून इथे युवकच मानसिकदृष्ट्या खचलेला असून या देशाचे पुढे काय होणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

5 जी ट्रायलवरून वादविवाद


भारतासह अनेक देशांना 5जी तंत्रज्ञानाचे वेध लागले आहेत. येत्या दोन तीन वर्षात भारतात 5जी मोबाईल तंत्रज्ञान उपलब्ध होण्याची शक्यता आहे. डिजिटल सेलुलर नेटवर्कसाठी आडवान्स वायरलेस तंत्रज्ञान म्हणजे 5जी. वेगवान डेटा स्पीडसाठी सेलुलर नेटवर्क इंडस्ट्रीमध्ये सातत्याने प्रगती होत राहिली आहे. अलिकडच्या वर्षात मोबाइल तंत्रज्ञान 2जी ते 3जी आणि 4जीच्या दिशेने अग्रेसर राहिले आहे. प्रत्येकवेळा डेटा स्पीड आणि गुणवत्ता वाढत गेली. आता मोबाईल नेटवर्क 5जी सहाय्याने आणखी वेगवान करण्याचा प्रयत्न सुरू आहे. 5जी खूपच आडवान्स टेक्नॉलॉजी आहे.

कोणताच चित्रपट लहान-मोठा नसतो


एकाद्या नव्यख्या कलाकाराला एकाद्या निर्मात्यानं आपल्या चित्रपटात काम द्यावं. काही दिवसांनी तोच कलाकार चित्रपट निर्मात्याला म्हणतो, मला एका मोठ्या फिल्म निर्मात्याचा मोठा चित्रपट मिळणार आहे. त्यामुळे मला तुमच्या चित्रपटातून मुक्त करा. नवा कलाकार चित्रपट सोडून देतो, पण आठवड्याभरातच पुन्हा येतो आणि म्हणतो, त्या मोठ्या चित्रपट निर्मात्याने दुसर्यालाच हिरो म्हणून घेतलं आहे. आता मला पुन्हा तुमच्या चित्रपटात घ्या. अशा परिस्थितीत तो निर्माता काय करेल? त्या नवख्या कलाकाराला हकलूनच देईल ना! पण उदार मनाचा निर्माता नवख्या कलाकाराला माफ करतो आणि आपल्या चित्रपटात घेतो. नंतर त्यांचे संबंध इतके घनिष्ठ बनले की, त्यांनी एकत्र तब्बल अर्धा डझन चित्रपटांमध्ये काम केले. हा नवखा कलाकार होता जितेंद्र आणि त्यांना संधी दिली होती निर्माता, दिग्दर्शक, आभिनेता आणि छायाचित्रकार एल.व्ही.प्रसाद यांनी.

Saturday, January 11, 2020

(तात्पर्य) सुखी कोण?


खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एकदा भगवान बुद्ध पाटलीपुत्रमध्ये प्रवचन देत होते. प्रवचनापूर्वी बुद्ध ध्यानावस्थेमध्ये बसले होते. तेवढ्यात स्वामी आनंद यांनी त्यांना जिज्ञासापूर्वक विचारलं,"महाराज आपल्या समोर बसलेल्या लोकांमधील सर्वात सुखी कोण आहे?" तथागत जनसमुदयाच्या सर्वात मागे पाहात म्हणाले,"सर्वात मागे जो साधा सरळ गरीब माणूस  डोळे मिटून बसला आहे,तो सर्वात सुखी आहे." हे ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. लोक म्हणू लागले,"पण महाराज, काहीच जाणून न घेता तुम्ही कसं  काय सांगू शकता?"

किसको क्या मिला, ये मुकद्दर की बात है


रफी आणि महेंद्र कपूर या दोघांनी एकत्र फक्त एकच गाणे गायले आहे. 1968 मध्ये आलेल्या आदमी चित्रपटात. या गाण्याचे बोल होते, कैसी हसीन आज बहारों की रात है, एक चांद आसमां पे है एक मेरे साथ है... ओ देने वाले तुने तो कोई कमी न की , अब किसको क्या मिला ये मुकद्दर की बात है.. रफी महेंद्र कपूर यांना आपला लहान भाऊ मानत होते. रफी यांचे इलाही कोई तमन्ना नहीं... हे गैरफिल्मी गाणे गाऊन महेंद्र कपूर यांनी मरफी रेडिओ संगीत स्पर्धा जिंकली जिंकली होती आणि त्यातून ते चित्रपटांमध्ये आले होते. महेंद्र कपूर नेहमी रफी यांच्या कार्यक्रमात तनपुरा वाजवायचे. या दोघांनी निश्चय केला होता की, दोघांनी एकत्रच कधीच गायचे नाही. कारण दोघांमध्ये विनाकारण तुलना व्हायला नको. महेंद्र कपूर यांनाही वाटत होतं की, ज्या रफींना आपण गुरू मानतो, त्यांच्यासोबत कधीच द्वंद्व गीत गाण्याची नौबत यायला नको.

Thursday, January 9, 2020

(बोधकथा) लालसेचे भूत


दोघे मित्र पैसा कमावण्यासाठी शहराकडे निघाले होते.वाटेत त्यांना एक म्हातारा त्यांच्याकडेच धावत येताना दिसला.तो जवळ आल्यावर म्हणाला,'या वाटेने जाऊ नका,वाटेत भूत आहे."असे म्हणून तो पुढे धावत गेला. दोघांनी विचार केला की, म्हाताऱ्याने काहीतरी भयंकर वस्तू पाहिली आहे. ते तसेच पुढे निघाले. काही अंतर चालत गेल्यावर त्यांना वाटत एक थैली पडलेली दिसली. थैली उघडून पाहिली तर त्यात सोन्याची बिस्किटे होती. आता दोघांनाही विचार केला,आपले काम झाले. शहरात जायची गरज नाही. दोघांनी माघारी जायचा निश्चय केला. तेवढ्यात त्यातला एक मित्र दुसऱ्या मित्राला  म्हणाला,"मला खूप भूक लागली आहे. शेजारच्या गावातून जेवण घेऊन ये. जेवण करून आपण आपल्या गावी जाऊ."

Sunday, January 5, 2020

अजय देवगणच्या चित्रपटांची सेन्च्युरी


अभिनेता अजय देवगणला हिंदी चित्रपट सृष्टीत पाऊल ठेवून आज तीस वर्षे उलटून गेली आहेत. तानाजी: द अनसंग वॉरियर हा अजयच्या कारकिर्दीतला शंभरावा चित्रपट आहे. आपल्या फूल और कांटे या चित्रपटाद्वारा  दोन मोटारसायकलवरून रोमान्स आणि फुल्ल अॅक्शन दाखवणार्या अजयने सिनेसृष्टीत एक दीर्घ टप्पा पूर्ण केला आहे.फूल और कांटे हा त्याचा पहिला चित्रपट नोव्हेंबर 1991 मध्ये प्रदर्शित झाला होता. वास्तविक या चित्रपटासाठी अक्षय कुमारला साइन करण्यात आले होते.पण काही कारणाने अक्षयने हा चित्रपट करण्यास नकार दिला. अजयचे वडील वीरू देवगण बॉलीवूडमधील प्रसिद्ध अॅक्शन डायरेक्टर होते. त्यांनी आपल्या मुलाला विचारले की, तू हा चित्रपट करतोस का? अजयने होकार दिला. या चित्रपटात दोन मोटारसायकलवर पाय ठेवून अजयने एंट्री केली होती. नंतर हे दृश्य एक आयकॉनिक सीन सिद्ध झाले. या चित्रपटाचे अॅक्शन डायरेक्टर खुद्द अजयचे वडीलच होते.

Wednesday, January 1, 2020

(तात्पर्य 5) आयुष्य जगा

एका नगरात एक श्रीमंत माणूस राहत होतातो मोठा विलासी प्रवृत्तीचा होताएके दिवशी योगायोगाने त्याची एका संताशी भेट झाली.आपल्या भविष्याविषयी जिज्ञासा असल्याने त्याने संत महात्म्याजवळ आपल्या भविष्याविषयी सांगण्याचा आग्रह धरलासंताने त्याचा हात पाहून सांगितले कीतुझ्याजवळ वेळ फार कमी आहेआजपासून बरोबर एका महिन्याने तुझा मृत्यू होणार आहेजे काही चांगलं करायचं आहेते करून घे.

(तात्पर्य 4) जिंकण्याचा मार्ग

दोन मित्र होते. अमित आणि सुमित एकत्रच वाढले-शिकले होते. पण दोघांच्या स्वभावात खूप मोठा फरक होता. अमितला कुणी विनाकारण वाद घातलेलं किंवा भांडण केलेलं आवडत नसे. तो अशा लोकांना धडा शिकवल्याशिवाय राहत नसे.पण सुमितचा स्वभाव त्याच्या विपरित होता. तो त्याच्याशी भांडलेल्या, वाद घातलेल्या लोकांशीही बोलत असे. त्यांना अद्दल घडवण्याचे तर त्याच्या स्वभावातच नव्हते. अमितला सुमितची ही वर्तणूक आवडत नसे. त्याचं म्हणणं होतं की,सुमित भित्रा आहे. त्यामुळेच तो त्याच्याशी भांडण केलेल्या लोकांशीही बोलतो. असे वागून त्याने आपला पराभव स्वीकारला आहे.

(तात्पर्य 3) नदी आणि मित्र

एका गावात दोन मित्र राहत होतेएकदा त्यांनी शहरात जाऊन काही तरी कामधंदा करण्याचा निर्णय घेतलाते शहराच्या दिशेने निघाले.गावाच्या सीमेवर एक गोठलेली नदी होतीत्यांना ती नदी ओलांडावी लागणार होतीतिथे कसला पूलही नव्हताअशातच त्यातला एक मित्र म्हणाला कीनदी पार करणं धोकादायक आहे.त्यामुळे आपल्यासाठी गावातच राहणं योग्य आहेपण दुसरा मित्र मात्र दुसराच काही तरी विचार करत होतात्याने मनात निश्चय केला होता कीकसल्याही परिस्थितीत शहरात जायचंचआपल्या दृढनिश्चयासोबत तो नदी पार करण्यासाठी पुढे जाऊ लागला.

(तात्पर्य 2) यशाचे रहस्य

एकदा एक मुलगा सुट्टी घालवण्यासाठी आपल्या आजोबांकडे गावी गेलातिथे त्याने एकदा आपल्या आजोबांना विचारले कीयशाचे रहस्य काययावर आजोबा त्याला शेजारच्या एका नर्सरीत घेऊन गेलेतिथून त्यांनी दोन रोपटी खरेदी करून आणलीएक रोपटे त्यांनी घरातल्या कुंडीत लावलेदुसरे घराबाहेर अंगणात लावलेआजोबांनी आपल्या नातवाला विचारले,तुला काय वाटतंया रोपट्यांपैकी कोणते रोपटे अधिक यशस्वी होईलमुलाने उत्तर दिलेघरातले रोपटे अधिक यशस्वी होईल,कारण ते सर्वदृष्टीने सुरक्षित आहेबाहेरच्या रोपट्याला मात्र अनेक गोष्टींपासून धोका आहे.त्याला अनेक गोष्टींशी सामना करावा लागणार आहे.

सायबर हल्ल्याच्या कचाट्यात भारत


देशातल्या 61 टक्के संस्था आणि उद्योगधंद्यांच्या विकासावर सायबर हल्ल्याचा परिणाम झाला आहे. यामुळे या संस्थांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे. हा खुलासा एका आयटी विश्लेषक कंपनीने केला आहे. आपल्या देशातले 95 टक्के उद्योगधंदे आणि इतर संस्था डिजिटलीकरणच्या वाटेवर चालले आहेत. ही महत्त्वाची बाब असताना  सायबर हल्ल्याशी सामना करण्यासाठी पुरेशी सुरक्षा यंत्रणा मात्र आपण अद्याप विकसित करू शकलो नाही. आकडे सांगतात की, गेल्या दोन वर्षात 46 टक्के संघटनांनी सायबर हल्ले झेलले आहेत. आर्थिकसारखी महत्त्वाची बाब असतानादेखील 20 टक्के संस्थांनी तर गेल्या वर्षात कधीही सायबर हल्ल्यापासून वाचण्याबाबतचे मूल्यांकन केलेले नाही.फक्त अठरा टक्के कंपन्यानीच डिझिटलीकरणच्या सुरुवातीच्या टप्प्यात सायबर सुरक्षेची व्यवस्था केली