खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एकदा भगवान बुद्ध पाटलीपुत्रमध्ये प्रवचन देत होते. प्रवचनापूर्वी बुद्ध ध्यानावस्थेमध्ये बसले होते. तेवढ्यात स्वामी आनंद यांनी त्यांना जिज्ञासापूर्वक विचारलं,"महाराज आपल्या समोर बसलेल्या लोकांमधील सर्वात सुखी कोण आहे?" तथागत जनसमुदयाच्या सर्वात मागे पाहात म्हणाले,"सर्वात मागे जो साधा सरळ गरीब माणूस डोळे मिटून बसला आहे,तो सर्वात सुखी आहे." हे ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. लोक म्हणू लागले,"पण महाराज, काहीच जाणून न घेता तुम्ही कसं काय सांगू शकता?"
भगवान म्हणाले,"चला,माझ्याबरोबर. मी तुम्हाला याचे प्रमाण देतो." ते सगळे गर्दीच्या सगळ्यात मागे गेले. बुद्धांनी तिथे बसलेल्या सर्वांना विचारायला सुरुवात केली-तुम्हाला जीवनात काय हवंय? काहीजण संपत्ती हवी म्हणाले तर काहींनी प्रसिद्धी. सगळ्यांनी आपापल्या अपेक्षा सांगितल्या. त्यांनी सर्वात शेवटी सगळ्यात शेवटी बसलेल्या गरीब व्यक्तीला विचारलं,"दादा,तुमची काय इच्छा आहे? तुम्हाला काय हवंय?" ती व्यक्ती प्रसन्नपणे हात जोडून म्हणाली, "महाराज,आपण मला विचारलंत हेच माझ्यासाठी पुष्कळ आहे. मला काहीच नको. फक्त तुमचे आशीर्वाद हवेत. मला त्यातच आनंद आहे. स्वामी आनंद यांना त्यांचे उत्तर मिळाले होते.
तात्पर्य-शांततेच सर्वात मोठं माध्यम समाधान आहे. आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत 7038121012
No comments:
Post a Comment