Wednesday, January 1, 2020

(तात्पर्य 5) आयुष्य जगा

एका नगरात एक श्रीमंत माणूस राहत होतातो मोठा विलासी प्रवृत्तीचा होताएके दिवशी योगायोगाने त्याची एका संताशी भेट झाली.आपल्या भविष्याविषयी जिज्ञासा असल्याने त्याने संत महात्म्याजवळ आपल्या भविष्याविषयी सांगण्याचा आग्रह धरलासंताने त्याचा हात पाहून सांगितले कीतुझ्याजवळ वेळ फार कमी आहेआजपासून बरोबर एका महिन्याने तुझा मृत्यू होणार आहेजे काही चांगलं करायचं आहेते करून घे.

तो भोगी माणूस काळजीने सगळ्यांशी चांगला वागू लागलाजेव्हा शेवटचा एक दिवस राहिला तेव्हा त्याने विचार केला की चलाएकदा शेवटचे संतांचे दर्शन घेऊन येऊमग आपल्याला शांततेने डोळे मिटता येतीलसंताने त्याला आल्यावर विचारले,तू खूप शांत दिसतो आहेस.काय कारण आहे?
तो श्रीमंत माणूस म्हणाला-आता अंतीम क्षणी मृत्यू जवळ आला असताना भोग विलास कसला?म्हणूनच मी शांत आहे.
संत हसले आणि म्हणाले-वत्सा,काळजी करू नकोसभोग विलासापासून दूर राहण्याचा एकमात्र उपाय आहेतो म्हणजे मृत्यू सतत लक्षात ठेवणेमृत्यू निश्चित आहेहा विचार सदैव सन्मुख ठेवायचा आणि त्यानुसार प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करायचाप्रत्येक क्षण आनंदाने जगला पाहिजे.
आता त्या माणसाला संतांच्या सांगण्याचा अर्थ कळला.
तात्पर्यमृत्यू अटळ आहेहे कायम लक्षात ठेवायला हवे.-मच्छिंद्र ऐनापुरे,जत7038121012

No comments:

Post a Comment