Wednesday, January 1, 2020

(तात्पर्य 3) नदी आणि मित्र

एका गावात दोन मित्र राहत होतेएकदा त्यांनी शहरात जाऊन काही तरी कामधंदा करण्याचा निर्णय घेतलाते शहराच्या दिशेने निघाले.गावाच्या सीमेवर एक गोठलेली नदी होतीत्यांना ती नदी ओलांडावी लागणार होतीतिथे कसला पूलही नव्हताअशातच त्यातला एक मित्र म्हणाला कीनदी पार करणं धोकादायक आहे.त्यामुळे आपल्यासाठी गावातच राहणं योग्य आहेपण दुसरा मित्र मात्र दुसराच काही तरी विचार करत होतात्याने मनात निश्चय केला होता कीकसल्याही परिस्थितीत शहरात जायचंचआपल्या दृढनिश्चयासोबत तो नदी पार करण्यासाठी पुढे जाऊ लागला.

त्याचा मित्र नदीकाठाला उभा राहून त्याला रोखू पाहात होतातो ओरडत होता कीतू पडशील.काही पावलं चालल्यावर तो मुलगा गोठलेल्या नदीवर घसरलानदीकाठी असलेल्या मित्राने त्याला परत येण्याचा सल्ला दिलापण तो पुन्हा उभा राहिला आणि पुढे चालू लागलाहळूहळू सावधपणे चालत त्याने शेवटी नदी पार केली.पुढे शहराकडे निघून गेलात्याच्या मित्राने नदी पार करण्याचा प्रयत्नही केला नाहीत्यामुळे तो तिथेच राहिला.
तात्पर्यजर तुम्ही काही निश्चय केला असाल तर ते तुम्ही मिळवालच.-मच्छिंद्र ऐनापुरेजत7038121012

No comments:

Post a Comment