Thursday, January 9, 2020

(बोधकथा) लालसेचे भूत


दोघे मित्र पैसा कमावण्यासाठी शहराकडे निघाले होते.वाटेत त्यांना एक म्हातारा त्यांच्याकडेच धावत येताना दिसला.तो जवळ आल्यावर म्हणाला,'या वाटेने जाऊ नका,वाटेत भूत आहे."असे म्हणून तो पुढे धावत गेला. दोघांनी विचार केला की, म्हाताऱ्याने काहीतरी भयंकर वस्तू पाहिली आहे. ते तसेच पुढे निघाले. काही अंतर चालत गेल्यावर त्यांना वाटत एक थैली पडलेली दिसली. थैली उघडून पाहिली तर त्यात सोन्याची बिस्किटे होती. आता दोघांनाही विचार केला,आपले काम झाले. शहरात जायची गरज नाही. दोघांनी माघारी जायचा निश्चय केला. तेवढ्यात त्यातला एक मित्र दुसऱ्या मित्राला  म्हणाला,"मला खूप भूक लागली आहे. शेजारच्या गावातून जेवण घेऊन ये. जेवण करून आपण आपल्या गावी जाऊ."

दुसरा जेवणाची व्यवस्था करायला निघून गेला. वाटेत  तो विचार करू लागला. या सोन्याच्या बिस्किटांच्या दोन अर्ध्या अर्ध्या वाटण्या होणार.  ती सगळी बिस्किटे मलाच मिळायला हवीत. त्याने विचार केला,मित्राला जेवणात विष घालून मारून टाकू. मग ती सगळी सोन्याची बिस्किटे आपली होतील. त्याने वाटेत येताना जेवणात विष मिसळले.
इकडे दुसरा मित्रदेखील असाच काहीतरी विचार करत होता. पहिला मित्र बेसावध असताना पहिल्या मित्राने त्याच्या डोक्यात दगड घालून मरून टाकले. खूप भूक लागली आहे,आपण पहिल्यांदा जेवण करू आणि मग गावी निघू, असा विचार करून त्याने विषयुक्त जेवण केले. आणि थोड्या वेळाने तोही मरून गेला.
तात्पर्य: लालसेचे भूत कुणालाही मोकळं सोडत नाही.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत 7038121012

No comments:

Post a Comment