Wednesday, January 1, 2020

(तात्पर्य 4) जिंकण्याचा मार्ग

दोन मित्र होते. अमित आणि सुमित एकत्रच वाढले-शिकले होते. पण दोघांच्या स्वभावात खूप मोठा फरक होता. अमितला कुणी विनाकारण वाद घातलेलं किंवा भांडण केलेलं आवडत नसे. तो अशा लोकांना धडा शिकवल्याशिवाय राहत नसे.पण सुमितचा स्वभाव त्याच्या विपरित होता. तो त्याच्याशी भांडलेल्या, वाद घातलेल्या लोकांशीही बोलत असे. त्यांना अद्दल घडवण्याचे तर त्याच्या स्वभावातच नव्हते. अमितला सुमितची ही वर्तणूक आवडत नसे. त्याचं म्हणणं होतं की,सुमित भित्रा आहे. त्यामुळेच तो त्याच्याशी भांडण केलेल्या लोकांशीही बोलतो. असे वागून त्याने आपला पराभव स्वीकारला आहे.

एके दिवशी अमितचे एका माणसाशी खूप भांडण झालेभांडण हातघाईवर आलेसुमित मधे पडला आणि अमितला बाजूला नेवू लागला.न भांडण्याविषयी सांगू लागलातेव्हा अमित संतापाने सुमितला म्हणालातू मला अडवू नकोसतू भित्री भागूबाई आहेसतुझ्यात कुणाशी शत्रुत्व निभावण्याची हिंमतदेखील नाही.म्हणूनच तू तुझे वाईट चिंतणार्या लोकांशीही बोलत असतोसतू स्वत:च हार पत्करतोस तर मग तुला कोण घाबरणारयावर सुमित म्हणालाइथे गोष्ट घाबरण्याची नाहीतसेच माझ्या पराभवच म्हणत असशील तर तुला एक गोष्ट सांगतो,  शत्रूशी मैत्री करूनही त्याचा पराभव करता येतो हे लक्षात ठेव.
तात्पर्य-शत्रूत्व वाढवण्यात अर्थ नाही.-
मच्छिंद्र ऐनापुरे,जत 7038121012

No comments:

Post a Comment