इकिगाई जपानचा आत्मविकासाचा आवडीचा कॉन्सेप्ट
आहे. प्रत्येकाचा एक इकिगाई असायला हवा. आपल्या इकिगाईमध्ये चार गोष्टी असणं आवश्यक आहे. 1) ते
काम ज्यावर तुमचं प्रेम आहे. 2) ते काम ज्याची जगाला गरज आहे.
3)ते काम जे करण्यासाठी तुम्ही मास्टर आहात 4) ते काम ज्याच्याने तुम्ही पैसा कमवू शकता. जर एकादे काम
या चार अटी पूर्ण करत असेल तर ते तुमच्या लाइफची इकिगाई होऊ शकेल. एकदा का तुम्ही तुमच्या जीवनाची इकिगाई शोधलात की, मग
आयुष्यात शांतताही प्राप्त होऊ शकते.तुम्ही तुमचं आयुष्यात आरामात,
आनंदात जगू शकाल. आता तुम्ही म्हणाल ही इकिगाई काय भानगड
आहे. तर हा शब्द जपानी आहे. याचा जपानी
भाषेत अर्थ होतो- सकाळी लवकर उठण्याचे कारण किंवा जीवनाचा उद्देश.
आपल्यालाही आपल्या जीवनाचा इकिगाई शोधायला हवा. एकदा का तुम्हाला तुमचा इकिगाई सापडला की, मग तुमचे लाइफ
बनलेच म्हणून समजा. चला, या चार गोष्टींबाबत
अधिक विस्ताराने पाहू.
1) ते काम ज्यावर तुमचं प्रेम आहे-
जर आयुष्यात आनंदी राहायचं असेल तर असे काम शोधा जे केल्याने तुम्हाला
सर्वाधिक आनंद वाटेल. असे काम शोधणं तसं कठीण आहे बरं का!
तुम्हाला ते काम शोधण्यासाठी सतत प्रयत्न करायला हवा. सतत ते तुमच्या डोक्यात ठेवायला हवे. तुम्ही ज्या कामावर
जास्त प्रेम करता, त्याला तुम्ही कधीच विसरू शकत नाही.
त्या कामाने आपल्या आयुष्यात परिवर्तन घडतेच पण, त्यातून आपल्या राष्ट्रामध्ये आणि जगामध्येही परिवर्तन आणण्याचा प्रयत्न केला
पाहिजे. ज्याच्यावर प्रेम करता ते काम शोधण्यात यशस्वी झाला असाल,
तुम्ही संपूर्ण आयुष्य ते काम करत आरामात, आनंदात
घालवू शकता आणि टॉपवर पोहचू शकता.
2) ते काम ज्याची जगाला गरज आहे-
तुम्हा अशा गोष्टीचा तपास करावा लागणार आहे, ज्या
गोष्टीमुळे तुम्ही या जगाला आणखी सुंदर बनवू शकता. ते काम अशाप्रकारे
पूर्ण करायला हवे की, त्यामुळे तुम्ही या जगात परिवर्तन घडवू
शकाल. तुम्ही अन्य लोकांसाठीही एकादा मार्ग शोधू शकता.
दुसर्याला काम देऊ शकत असाल तर तुम्हाला मग ग्रेटच
म्हटले पाहिजे. त्यामुळे
त्यांचेही लाइफ बनवू शकते. फक्त आपल्यापुरताच विचार न करता संपूर्ण
जगाचा विचार तुमच्या डोक्यात आला पाहिजे. तुमचे काम अशाप्रकारचे
असायला हवे की, त्यामुळे संपूर्ण जगाला त्यातून काही तरी शिकता
आले पाहिजे. छोटी छोटी कामे चांगल्या प्रकारे पूर्ण कराल तर नकीच
परिवर्तन घडेल.
3) ते काम जे करण्यासाठी तुम्ही मास्टर
आहात- प्रत्येक माणसामध्ये कोणती ना कोणती कला किंवा कौशल्य असते.
तुमच्यामध्येही कोणती तरी खास कला नक्कीच आहे. त्याचा शोध घ्यायला हवा. शोध लागल्यावर ती कला डेवलप
करायला हवी आणि सध्याच्या घडीला त्याचा कसा उपयोग होईल त्यासाठी प्रयत्न करायला हवा.
कला विकसित करणं सोपं काम नाही. त्यासाठी सातत्याने
कामाला लागलं पाहिजे. जर तुम्हाला एकाद्या कामात मास्टरी मिळाली
असेल किंवा ती मास्टरी तुम्ही मिळवली असेल तर तुम्ही त्या फिल्डमध्ये सहज यश मिळवू
शकता. कोणत्याही कामात मास्टरकी एका दिवसात मिळत नाही,
याची कल्पना असायला हवी. मेहनत, जिद्द,चिकाटी महत्त्वाची आहे. काम सातत्याने करत राहिल्याने त्यातली
मास्टरकी मिळून जाते.
4) ते काम ज्याच्याने तुम्ही पैसा कमवू
शकाल- जर तुमच्यात कौशल्य असेल तर तुम्हाला हेही माहित असायला
हवे की, त्याच्या साहाय्याने पैसेही कमावता येतात. बहुतांश लोकांना वाटतं की, पैशाच्यामागे धावणं वाईट आहे.
पण जीवन शांततेत जगण्यासाठी आपल्याकडे पर्याप्त धन असणं आवश्यक आहे.
पैशाची इच्छा राखणं ही काही शरमे, लज्जेची गोष्ट
नव्हे. जगण्यासाठी पैसा हा लागतोच. पण असं
काम करायला हवं की, ज्यामुळे जीवनात धनाचा प्रवाह वाहत राहायला
पाहिजे.-मच्छिंद्र ऐनापुरे,जत
Best idea of japnies
ReplyDeleteI like this
very nice motivational
ReplyDelete