Friday, May 31, 2019

शहरे प्रदूषणमुक्त करण्याचा जाहीरनामा


देशात हवा प्रदूषण वाढत असून त्याचे दुष्परिणामही जाणवत आहेत.पण अजूनही राजकीय पक्ष ,प्रशासन याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. देशातील 15 लाख लोक दरवर्षी हवेच्या प्रदूषणा मुळे मृत्यूमुखी पडत आहेत. त्यामुळे आता राजकीय पक्षांनी निवडणूक लढवताना शहरे प्रदूषण मुक्त करण्याचा जाहीरनामा लोकांसमोर ठेवायला हवा.लोकांनीही आता जागृत होण्याची गरज आहे. अन्यथा प्रदूषणाचा विळखा शहरी लोकांना गिळंकृत केल्याशिवाय राहणार नाही.

Tuesday, May 28, 2019

प्लास्टिक कचऱ्यावर उपाय


सांगली जिल्ह्यातल्या विटे नगरपालिकेने प्लास्टिक कचऱ्यापासून पेव्हर ब्लॉक बनवून त्याचा व्यवासायिक उपयोग करायला सुरुवात केली असून यामुळे पालिकेच्या उत्पन्नात भर पडत आहे. प्लास्टिक कचऱ्यापासून पेव्हर ब्लॉक बनवण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम बनवणारी विटे नगरपालिका 'स्वच्छ शहर सर्व्हेक्षण 2019' स्पर्धेतही यश मिळवून आहे.विटे शहर हे पश्चिम भारतात सर्वाधिक स्वच्छ शहरांमध्ये अव्वल ठरले आहे. या नगरपालिकेने असे अनेक पूरक प्रकल्प उभे केले आहेत. त्यामुळेच या नगरपालिकेचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.

आता नजरा टीम इंडियावर


पाच वर्षांतून एकदा होणारा राजकीय महाकुंभ मेळा आता समाप्तीच्या वाटेवर आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर देश भरातल्या लोकांमधला राजकीय ज्वर उतरेल,पण लगेचच देशभरात क्रिकेटचा ज्वर चढायला सुरुवात होईल.आपल्या देशात इतर खेळापेक्षा क्रिकेटला अधिक महत्त्व दिलं जातं, हे काही वेगळं सांगायची गरज नाही. या काळात युवावर्ग तर टीव्हीला चिकटून असतोच,पण क्रिकेटवेडे सरकारी बाबूसुद्धा कामाला सुट्टी देऊन क्रिकेटचा आनंद लुटत असतात आणि हे फक्त आपल्याच देशात घडू शकतं.

Monday, May 27, 2019

गुन्हेगार लोकप्रतिनिधी आणि आम्ही


सतराव्या लोकसभेत निवडून आलेल्या जवळपास निम्म्या खासदारांवर विविध प्रकारचे गुन्हे नोंद आहेत. 'असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स' म्हणजेच 'एडीआर' या संस्थेने ही आकडेवारी नुकतीच जाहीर केली आहे. या संस्थेच्या पाहणी अहवालानुसार 539 पैकी 233 खासदारांवर गुन्हे नोंद आहेत.  यातल्या चाळीस टक्के खासदारांवर तर गंभीर प्रकारचे गुन्हे आहेत. तीस टक्के खासदारांवर बलात्कार,खून,खुनाचा प्रयत्न,महिला विरोधात गुन्हे नोंद आहेत. आणखी एक महत्त्वाचे म्हणजे 2014 च्या तुलनेत 2019 मध्ये गुन्हे नोंद असलेल्या खासदारांचे प्रमाण 26 टक्क्यांनी वाढले आहे. याचा सरळ अर्थ असा की, आणखी काही वर्षांनी शंभर टक्के खासदारांवर गुन्हे नोंद असतील. आता ही बातमी वाचल्यावर कुणालाच चीड किंवा संताप आला नाही.कारण आता ते गृहीत धरले गेले आहे.

अरे, कुणी तरी कृत्रिम पावसाचं मनावर घ्या


राज्यातल्या दुष्काळी तालुक्यातील जनतेचे पाण्याविना होणारे हाल बघवत नाहीत. माणसांचे जिथे पाण्याविना हाल सुरू आहेत,तिथे जनावरांचे काय घेऊन बसलात! ओला चारा तर कुठेच नाही. कडबासुद्धा आता कुठे मिळेनाशी झाली आहे. चारा नाही,पाणी नाही,अशा बिकट परिस्थितीत जनावरांना बाजाराचा रस्ता दाखवला जात आहे. दूध व्यवसाय करून कसे तरी पोट भरणाऱ्या दुष्काळी जनतेचा हक्काचा घासदेखील आता हिरावून घेतला जात आहे. राज्यातल्या दुष्काळी भागात  चारा छावण्या उभारल्या जात असल्या तरी जनावरांसह अख्खे कुटुंबच या छावण्यांच्या आश्रयाला आल्याचे विदारक चित्र दिसत आहे. कामधंदा सोडून जनावरांच्या पोषणासाठी लोक छावण्यांमध्ये तळ टाकून आहेत. 

Friday, May 17, 2019

छोटे बीज आणि त्याचा वटवृक्ष


तामिळनाडू राज्यातल्या घनदाट जंगलात वसलेलं गाव म्हणजे पुल्लूचेरी. देशातल्या सर्वदूर पसरलेल्या गाव, वाड्यावस्त्यांप्रमाणेच पुल्लूचेरीपर्यंत पोहचण्यापूर्वी विकासाचे रस्ते खत्म झालेले होते. मदुराईपासून जवळपास 15 किलोमीटर अंतरावर वसलेल्या या गावात राहतात चिन्ना पिल्लई. चिन्ना फक्त 12 वर्षांची होती, तेव्हा तिचं लग्न लावून देण्यात आलं होतं. लग्न झाल्यावर काही दिवसांतच तिला जवळच असलेल्या अलागार कोविल गावातल्या शेतात मजुरीनं जावं लागलं. तिथल्या शेतात काम करणारे मजूर आजूबाजूच्या वाड्यावस्त्यांवरचे होते. यात चिन्नाच्या गावाचाही समावेश होता.

Thursday, May 16, 2019

(यशाच्या गोष्टी) जीवनाचे सार

एकदा एका शिष्याने संत कबीरांना विचारलं,"विवाह चांगलं की संन्याशी जीवन?" कबीर म्हणाले,"दोघांपैकी काहीही असो दे,पण ते उच्चकोटीचे असायला हवे." "महाराज , मी समजलो नाही?"शिष्य म्हणाला.

Tuesday, May 14, 2019

(यशाच्या गोष्टी-4) आयुष्याची शिकवण


खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. खुसरो (पहिला) या नावाने इराणचा शासक होण्यापूर्वी खुसरो एका गुरुकूलमध्ये राहायचा. या काळात तो खूप मेहनत करायचा. तो सर्व शास्त्र आणि विद्यांमध्ये पारंगत होण्यासाठी धडपडत होता. एके दिवशी त्यांच्या गुरुने त्यांना विनाकारण कठोर शारीरिक शिक्षा केली. खुसरोने आपल्या गुरुला याबाबत कसलाच चकार शब्द काढला नाही. गपगुमान दंडाचा स्वीकार केला. काही वर्षांनी ज्यावेळेला खुसरो राजगादीवर बसला. त्यावेळेला सर्वात अगोदर त्याने आपल्या गुरुला दरबारात बोलावले. खुसरोच्या डोक्यात अजून ती शिक्षेची जखम ठसठसत होती. त्यामुळे तो ती अजिबात विसरला नव्हता.

(यशाच्या गोष्टी-3)संघर्षातील मजा


एक वयोवृद्ध शेतकरी देवाजवळ गेला आणि म्हणाला, “ देवा, तू देव आहेस,पण तुला सगळं काही माहित नाही. या सृष्टीचा निर्माण करता आहेस,पण इथे सगळं काही व्यवस्थित चाललेलं नाही. ही सृष्टी आणि तिची काम करण्याची पद्धत खूपच विचित्र आहे. म्हणजे वाईट आहे. मला एक वर्षाची संधी दे आणि सर्व गोष्टी माझ्या म्हणण्याप्रमाणे होऊ दे. म्हणजे बघ मी काय करतो ते!ङ्घ
देवाने तथास्तू म्हटले.

Monday, May 13, 2019

व्यायाम नकोय,तर शारीरिक हालचाली वाढवा


बैठे काम करणार्यांनी नियमित व्यायाम करायलाच हवा. कॅलरी खर्च होणं महत्त्वाचं आहे. बदलत्या लाइफस्टाइलमुळे आजार वाढताहेत. डॉक्टर आठवड्यातून किमान 150 मिनिटं एक्सरसाइज करण्याचा सल्ला देतात. भारतातसुद्धा तंदुरुस्तीबाबतची सर्वात मोठी चिंता हीच आहे. तंदुरुस्त राहण्यासाठी जिममध्ये जा किंवा जुन्या काळातल्या सल्ल्याप्रमाणे पायी चालणे आणि घरगुती कामं करणे यांचा स्वीकार करायला हवा. कारण आपल्या शारीरिक हालचाली होणं महत्त्वाचं आहे. डॅफने मिलर या फॅमिली फिजिशियन आणि फार्माकॉलॉजी असलेल्या शिवाय जंगल इफेक्टच्या लेखिका सांगतात की, मी एकादा लेख लिहायला बसले तरी मधल्या काळात अनेकदा उठते. चहा बनवते. डॉगीला खायला घालते. माझे अंथरुण टाकते. खुर्चीजवळ शरीराची स्ट्रॅचिंग आणि पायांचे एक्सरसाइज करते. संशोधन किंवा एक्सपर्ट लोकांच्या म्हणण्यानुसार आपल्या शरीराच्या सातत्याने हालचाली व्हायला हव्यात. बाहेर जाऊन व्यायाम करता नाही आले तरी घरात कामाच्या निमित्ताने शरीराच्या हालचाली व्हायलाच हव्यात.

Sunday, May 12, 2019

(यशाच्या गोष्टी-2) खास सल्ला


एका अतिश्रीमंत कारखानदाराच्या मुलाला आपल्या संपत्तीचा मोठा गर्व होता. या संपत्तीच्या जोरावर तो लोकांशी कसाही वागत होता. या कारखानदाराने आपल्या शेवट्या काळात आपल्या मुलाला जवळ बोलावून सांगितलं. “ बाळा, तू काहीच करू नकोस.फक्त माझ्या मृतदेहाच्या पायांत फाटलेले मोजे तेवढे घाल.”

(यशाच्या गोष्टी-1 ) चांगले-वाईट


एका शहरात दोघे भाऊ राहत होते. त्यातला सर्वात मोठा भाऊ मोठा बिझनेसमन होता. तर धाकटा निरुद्योगी आणि दारुडा होता. लोकांना मोठं आश्चर्य वाटायचं. एकाच घरातील ही दोन मुलं अशी दोन टोकाची कशी? यांच्यात इतकं जमीन-अस्मानाचं अंतर कसं? काही लोकांनी याचा शोध घेण्याचं ठरवलं.एके दिवशी संध्याकाळी ही मंडळी त्या भावांच्या घरी गेले. आत प्रवेश करताच त्यांना नशेत असलेला धाकटा भाऊ दिसला. तो खूप दारू प्यायला होता आणि त्याला स्वता:ला नीट सावरताही येत नव्हतं. त्याला त्यांनी विचारलं, “ तू असा कसा बरं? विनाकारण लोकांशी का भांडतोस? आणि तुला असं का करावंस वाटतं?

बदलासाठी नेहमी तयार राहा

आपण लहानपणापासून टोपीविक्या माणसाची गोष्ट ऐकत आलो आहे. त्याच्या टोप्या माकडं घेऊन जातात. माकडं माणसांची नक्कल करतात. त्यांच्या या कमकुवतपणाचा लाभ उठवत तो माणूस आपल्या टोप्या परत मिळवतो. आता तेच अनुभव तो माणूस आपल्या मुलाशी शेअर करतो. मुलगा टोप्यांचे गाठोडे घेऊन दुसर्याला गावाला जाण्यासाठी बाहेर पडतो. वाटेत दाट झाडांच्या सावलीत त्याला थोडी विश्रांती घ्यावीशी वाटते. तिथे लवंडतो. त्याला झोप लागते. तो झोपेतून उठल्यावर पाहतो तर गाठोड्यात टोप्या नाहीत. वर झाडावर बघतो तर झाडावरच्या माकडांनी त्या टोप्या आपल्या डोक्यावर घातलेल्या असतात. त्याला वडिलांनी सांगितलेला अनुभव आठवतो. तो लगेच आपल्या डोक्यावरची टोपी काढतो आणि खाली जमिनीवर आपटतो. पण नवलाची गोष्ट अशी की, एकाही माकडाने आपल्या डोक्यावरची टोपी काढून फेकली नाही. कुणीच त्याची नक्कल केली नाही. तेवढ्यात जवळच्या झुडपातून एक माकड येते आणि खाली पडलेली टोपी उचलून पळून जाऊ लागते. त्या माकडाला सांगायचं असतं की, आम्ही आमच्या चुकांमधून शिकलो आहोत. आमचा सिल्याबस आम्ही बदलला आहे. आता आम्ही माणसांची नक्कल करत नाही. याचा अर्थ साफ आहे, काळानुसार बदलण्यासाठी आपण तयार असलं पाहिजे.