Sunday, May 12, 2019

(यशाच्या गोष्टी-2) खास सल्ला


एका अतिश्रीमंत कारखानदाराच्या मुलाला आपल्या संपत्तीचा मोठा गर्व होता. या संपत्तीच्या जोरावर तो लोकांशी कसाही वागत होता. या कारखानदाराने आपल्या शेवट्या काळात आपल्या मुलाला जवळ बोलावून सांगितलं. “ बाळा, तू काहीच करू नकोस.फक्त माझ्या मृतदेहाच्या पायांत फाटलेले मोजे तेवढे घाल.”

सावकाराच्या मृत्यूनंतर त्याने आपल्या वडिलांची शेवटी इच्छा ब्राम्हणाला सांगितली. ब्राम्हण आणि अन्य ज्येष्ठ माणसांनी त्याला समजावून सांगितलं की, आपल्या धर्मात काहीच घालण्याची परवानगी नाही. पण मुलाचा आग्रह होता की, वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण व्हावी.ही चर्चा इतकी वाढली की, शेवटी यासाठी शहरातील ब्राम्हणांना पाचारण करण्यात आले. काय करायचं यावर चर्चा सुरू होती,इतक्यात तिथे एक व्यक्ती आली आणि त्याने त्या मुलाच्या हातात त्याच्या वडिलांनी लिहिलेले पत्र सोपवले. यात वडिलांनी सल्ला लिहिला होता. “  माझ्या प्रिय मुला, पाहतोयस ना...? धनसंपत्ती, बंगला, गाडी आणि मोठमोठे कारखाने तसेच फर्म हाऊस असूनही मी जाताना साधे फाटलेले मोजेसुद्धा घेऊन जाऊ शकत नाही. तू मात्र या सगळ्यांमध्ये जीव गुंतवून बसला आहेस. एके दिवशी तुलाही मृत्यू येईल,तुलादेखील पांढर्या कापडातच इथंवर आणलं जाईल. पैशांसाठी म्हणून कुणाला नाराज करू नकोस. दुखवू नकोस. पैशाचा धर्माच्या कार्यासाठीच वापर कर. ” आता मुलगा समजून चुकला की, वडिलांना त्याला वास्तवात कोणती शिकवण द्यायची होती.
मंत्र: जीवनात पैसाच सुखाचा आधार नाही, लोकांच्या मदतीसाठी अभियान चालवा. 

No comments:

Post a Comment