Tuesday, May 14, 2019

(यशाच्या गोष्टी-3)संघर्षातील मजा


एक वयोवृद्ध शेतकरी देवाजवळ गेला आणि म्हणाला, “ देवा, तू देव आहेस,पण तुला सगळं काही माहित नाही. या सृष्टीचा निर्माण करता आहेस,पण इथे सगळं काही व्यवस्थित चाललेलं नाही. ही सृष्टी आणि तिची काम करण्याची पद्धत खूपच विचित्र आहे. म्हणजे वाईट आहे. मला एक वर्षाची संधी दे आणि सर्व गोष्टी माझ्या म्हणण्याप्रमाणे होऊ दे. म्हणजे बघ मी काय करतो ते!ङ्घ
देवाने तथास्तू म्हटले.

आता सर्व काही शेतकर्याच्या मर्जीनुसार होत होते. त्याने वादळांना, जोराच्या वार्यांना थोपवलं. इतकंच नव्हे तर पिकाचं नुकसान करणार्या सर्वच गोष्टींचा बंदोबस्त केला. शेतकरी आता खूप खूप खूश होता.पीकही चांगलं जोमानं आलं होतं. यापूर्वी कधीच इतकं उंच न गेलेलं गव्हाचं पीक पाहून त्याला खात्री पटली की, आता धान्य उत्पादन जबरदस्त होईल. तो देवाला ज्या ज्या वेळी भेटायचा, त्या त्यावेळी म्हणायचा, “ देवा, यंदा दहा वर्षे बसून खातील इतकं जोमानं पिकाचं उत्पादन होईल. आणि लोकांची सर्व ती दैना दूर होईल.ङ्घ
पण प्रत्यक्षात पिकाची कापणी सुरू झाली तेव्हा कळलं की, गव्हाच्या लोंब्यांमध्ये दाणे नव्हतेच. शेतकर्याला मोठा धक्काच बसला. त्याने कपाळाला हात मारून घेतला. त्याला असं का झालं कळलंच नाही. तो वेड्यासारखा करत राहिला. शेवटी त्याने देवाला विचारले, “असं कसं झालं? काय चुकलं? ” देव म्हणाला,“ अरे, तुला कळायला हवं होतं. जिथे कसलेच आव्हान नाही. कसल्याच अडचणी नाहीत, कधी कुठे कसलीच समस्या नाही. द्विधावस्था नाही. संकट नाही. तिथं दुसरं काय होणार? अरे, जिथे कसलाच संघर्ष नाही, तिथे दुसरं काय होणार? संघर्षाच्या आभावामुळे गव्हाची रोपे नपुसक बनली.”
मंत्र: जर आयुष्यात आनंद हवा असेल तर पहिल्यांदा दु:ख झेलण्याची तयारी ठेवा.

No comments:

Post a Comment