एका शहरात दोघे भाऊ राहत होते. त्यातला सर्वात मोठा भाऊ मोठा बिझनेसमन होता.
तर धाकटा निरुद्योगी आणि दारुडा होता. लोकांना
मोठं आश्चर्य वाटायचं. एकाच घरातील ही
दोन मुलं अशी दोन टोकाची कशी? यांच्यात इतकं जमीन-अस्मानाचं अंतर कसं? काही लोकांनी याचा शोध घेण्याचं
ठरवलं.एके दिवशी संध्याकाळी ही मंडळी त्या भावांच्या घरी गेले.
आत प्रवेश करताच त्यांना नशेत असलेला धाकटा भाऊ दिसला. तो खूप दारू प्यायला होता आणि त्याला स्वता:ला नीट सावरताही
येत नव्हतं. त्याला त्यांनी विचारलं, “
तू असा कसा बरं? विनाकारण लोकांशी का भांडतोस? आणि तुला असं का करावंस वाटतं? ”
“ माझ्या वडिलांमुळं!” धाकट्या भावाने उत्तर दिलं. तो कसा तरी पुढे सांगू लागला.ङ्घ माझे वडील दारुडे होते.
ते नेहमी दारू पिऊन आईला आणि आम्हां दोघा भावंडाना मारायचे. मीही असाच आहे. अशा परिस्थितीत तुम्ही माझ्याकडून काय
अपेक्षा करू शकता? दारुड्याचा मुलगा दारुडाच निघणार ना?
मीदेखील असाच आहे. ”
मग ते लोक थोरल्या मुलाकडे गेले. त्यालाही त्याने हाच प्रश्न केला. “तुम्ही इतके यशस्वी बिझनेसमन आहात, याचं कारण काय? ”
“माझे वडील!ङ्घ त्या मुलाने उत्तर दिलं.लोकांनी
त्याला आश्चर्यानं विचारलं, ” असं कसं? ”
तो म्हणाला, “ माझे वडील दारुडे होते. खूप दारू
प्यायचे. आणि आम्हा भावंडांना आणि आमच्या आईला खूप मारायचे.
मी निश्चय केला की, मला
असं बनायचं नाही”
जीवनात ज्या काही घटना घडत असतात, त्याला दोन कारणं असतात.ते म्हणजे
चांगलं आणि वाईट! मात्र खरी गरज आहे ती, आपण चांगल्या गोष्टींवर ध्यान देण्याची आणि तेथूनच प्रेरणा घेण्याचा प्रयत्न
करण्याची!-मच्छिंद्र ऐनापुरे,जत
No comments:
Post a Comment