Tuesday, May 14, 2019

(यशाच्या गोष्टी-4) आयुष्याची शिकवण


खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. खुसरो (पहिला) या नावाने इराणचा शासक होण्यापूर्वी खुसरो एका गुरुकूलमध्ये राहायचा. या काळात तो खूप मेहनत करायचा. तो सर्व शास्त्र आणि विद्यांमध्ये पारंगत होण्यासाठी धडपडत होता. एके दिवशी त्यांच्या गुरुने त्यांना विनाकारण कठोर शारीरिक शिक्षा केली. खुसरोने आपल्या गुरुला याबाबत कसलाच चकार शब्द काढला नाही. गपगुमान दंडाचा स्वीकार केला. काही वर्षांनी ज्यावेळेला खुसरो राजगादीवर बसला. त्यावेळेला सर्वात अगोदर त्याने आपल्या गुरुला दरबारात बोलावले. खुसरोच्या डोक्यात अजून ती शिक्षेची जखम ठसठसत होती. त्यामुळे तो ती अजिबात विसरला नव्हता.

गुरू दरबारात आल्यावर त्याने सगळ्यात अगोदर प्रश्न केला,ङ्घ तुम्ही त्यावेळी कोणत्या कारणासाठी मला कठोर शिक्षा केली होती?ङ्घ  यावर गुरू म्हणाले,ङ्घ ज्यावेळी मी तुझी बुद्धिमत्ता पाहिली, तेव्हाच मी ओळखलं होतं की, तू एक ना एक दिवस तू तुझ्या वडिलांच्या साम्राज्याचा उत्तराधिकारी होशील. त्याच वेळेला मी निर्णय घेतला की, तुला या गोष्टीची जाण असायला हवी की, एकाद्या व्यक्तीवर केलेला अन्याय त्याच्या हृदयावर कायम कोरला जातो. मला आशा आहे की, तू कुठल्याही निर्दोष व्यक्तीला शिक्षा करणार नाहीस.ङ्घ
मंत्र: आपण कधी अन्याय सहन करू नये आणि कधी कुणावर करू नये.

No comments:

Post a Comment