Monday, May 13, 2019

व्यायाम नकोय,तर शारीरिक हालचाली वाढवा


बैठे काम करणार्यांनी नियमित व्यायाम करायलाच हवा. कॅलरी खर्च होणं महत्त्वाचं आहे. बदलत्या लाइफस्टाइलमुळे आजार वाढताहेत. डॉक्टर आठवड्यातून किमान 150 मिनिटं एक्सरसाइज करण्याचा सल्ला देतात. भारतातसुद्धा तंदुरुस्तीबाबतची सर्वात मोठी चिंता हीच आहे. तंदुरुस्त राहण्यासाठी जिममध्ये जा किंवा जुन्या काळातल्या सल्ल्याप्रमाणे पायी चालणे आणि घरगुती कामं करणे यांचा स्वीकार करायला हवा. कारण आपल्या शारीरिक हालचाली होणं महत्त्वाचं आहे. डॅफने मिलर या फॅमिली फिजिशियन आणि फार्माकॉलॉजी असलेल्या शिवाय जंगल इफेक्टच्या लेखिका सांगतात की, मी एकादा लेख लिहायला बसले तरी मधल्या काळात अनेकदा उठते. चहा बनवते. डॉगीला खायला घालते. माझे अंथरुण टाकते. खुर्चीजवळ शरीराची स्ट्रॅचिंग आणि पायांचे एक्सरसाइज करते. संशोधन किंवा एक्सपर्ट लोकांच्या म्हणण्यानुसार आपल्या शरीराच्या सातत्याने हालचाली व्हायला हव्यात. बाहेर जाऊन व्यायाम करता नाही आले तरी घरात कामाच्या निमित्ताने शरीराच्या हालचाली व्हायलाच हव्यात.

घरातील कामं आवरताना एकादे नवीन काम हाती घ्यावे. पुरुषांनी  स्त्रियांना घरकामात हातभार लावावा. वस्तू नीट ठेवण्यास मदत करावी. महिलांनीदेखील फार दिवस रेंगाळलेळी कामं हाती घ्यावीत. कित्येकांना जिमला जाण्यापेक्षा घरातल्या घरात हालचाली वाढवायला आवडतं.कामं ती काम होतातच, शिवाय शरीराला व्यायामदेखील मिळतो. अमेरिकन हार्ट असोशिएशनचं म्हणणं असं की, तंदुरुस्त राहण्यासाठी प्रत्येकाने आठवड्याभरात कमीत कमी 150 मिनिटे हार्ट पपिंग आणि मसल्सच्या मजबुतीसाठी व्यायाम करायला हवा. बहुतांश लोक असं करू शकत नाहीत. यातल्या अनेकांचं म्हणणं असं की, त्यांच्याजवळ वेळ नाही किंवा आवड नाही. पण त्यांना माहित असतं की, असं केल्यानं कॅन्सर, हार्ट डिजीज, तणाव आणि इतर अन्य समस्यांची शक्यता कमी होते. शारीरिक हालचालींवर अभ्यास करणार्या उटाह यूनिवर्सिटीच्या बार्बरा ब्राऊन सांगतात, व्यायाम तुम्ही तेव्हा करता,जेव्हा तुम्हाला वेगळ्या प्रकारचे कपडे घालायचे असतात. लोक जिममध्ये एक तास घाम गाळतात. काहींना हे आवडतं, काहींना आवडत नाही.
बार्बरा ब्राऊन सांगतात, ज्यांना जिमला जायला आवडत नाही, त्यांनी अॅक्टिव्ह लाइफवर फोकस करायला हवे. लेखिका डॅफने यांनी लोकांच्या व्यायामाविषयीच्या आवडी-निवडी जाणून घेतल्यानंतर शारीरिक हालचाली वाढवण्यासाठी नीट (नॉन एक्सरसाइज एक्टिव्हिटी थ्रमोजेनेसिस) फार्म्युला वापरला. याचा अर्थ झोपणे, खाणे, आराम करणे किंवा एक्सरसाइज करण्याशिवाय कोणत्या ना कोणत्या शारीरिक हालचालींच्या रुपात एनर्जी खर्च करण्याचा होतो.
सर्वात अगोदर खुर्चीत बसून काम करण्यापासून स्वत:ला दूर ठेवा. शारीरिक हालचालींवर अभ्यास करणारे हार्वर्डचे डॉ. मिन ली यांचे म्हणणे असे की, आपल्याजवळ जवळपास दिवसभरातले काम करण्यासाठी 16 तास असतात. यात खूप काही करता येण्यासारखे आहे. ते सांगतात, पायर्या चढायला-उतरायला हव्यात.बसून मिटिंग करण्यापेक्षा उभे राहून बोलता येतं. काही ठिकाणी उभे राहून काम करण्याचेही कल्चर आहे. आणि ते योग्यच आहे.स्वत:ची कामं स्वत: करा. जर खुर्चीत बसून काम करत असाल तर थोड्या थोड्या वेळाने त्याला ब्रेक द्या. याशिवाय किराणा माल आणणे, जिना चढून वर घेऊन जाणे, कपडे धुणे, भाजीपाला बाजारातून आणणे, घराची साफसफाई करणे आणि बागकामसारख्या हालचाली केल्यानेसुद्धा कॅलरी बर्न करता येते. फ्लोरिडा विश्वविद्यालयात इंड्स्टीट्यूट ऑफ एजिंगच्या एका संशोधनात असं आढळून आलं आहे की, जी वयोवृद्ध माणसे दिवसांत आपले अंथरुण चार-पाच वेळा ठिकठाक करतात, ते जवळपास 20 मिनिटे वेगाने चालल्याने जेवढी कॅलरी बर्न होते, तेवढे ते करू शकतात. संशोधनामध्ये असेही सांगण्यात आले की,हे काम 20 वर्ष वयाच्या तरुणाची कॅलरी बर्न करू शकत नसले तरी 90 वर्षाच्या वृद्धामध्ये मेटाबोलिक बदलामुळे हे शक्य आहे.
नीटचा फार्म्युला शोधणार्या मोयो क्लिनिकशी जोडले गेलेले हार्मोन रोग विशेषतज्ज्ञ जेम्स लेविन यांचं म्हणणं असं की, कोणतीही व्यक्ती नीट लाइफ स्टाइल स्वीकारू शकतो. हे अजमावून पाहण्यासाठी समान वजनाच्या दोन लोकांना घेण्यात आले. यातल्या एकाने आयुष्य सोपे करणार्या उपकरणांपासून फारकत घेतली. आणि त्याने अधिक शारीरिक हालचाली करून रोज 350 कॅलरीज खर्च केल्या.जर एक्सरसाइजशी तुलना केली तर स्टेयर मशीनवर अर्धा तास वर्कआऊट करणारा 70 किलो वजनाचा माणूस 223 कॅलरीज खर्च करेल. नीटनुसार प्रतिमिनिट किती कॅलरी खर्च होतात,याचा फार्म्युला मेटाबॉलिक रेट आणि वजन किलोग्रॅमच्या आधारावर काढता येते. ऑफिसात फक्त इकडेतिकडे केल्यास प्रति मिनिट तीन आणि पायर्या चढल्या-उतरल्यास प्रतिमिनिट सात कॅलरी खर्च होतात.जर तुम्ही अशा नोकरीत आहात, जिथे तुम्हाला दिवसभर सक्रिय राहावं लागत असेल तर नीट फार्म्युल्यानुसार कॅलरी खर्च करण्याची आवश्यकता नाही. बार्बरा ब्राऊन सांगतात, आपल्याला अशा फिजिकल अॅक्टिव्हिटीजवर लक्ष द्यावे लागेल, ज्याच्या करण्याने अधिक विचार करावा लागणार नाही. लिफ्टचा वापर न करणे,पायर्या चढणे-उतरणे, सायकलिंग,पायी चालणे, खुर्चीतून उठून मधेआधे फिरणे अशा या अॅक्टिव्हिटीज असू शकतात.

No comments:

Post a Comment