मंगलाबाई सोफ्यावर बसून 'राम जप' लिहीत होत्या. रामराव सकाळपासून चारदा वाचलेला पेपर हातात घेऊन टाईमपास करत होते. तेवढ्यात एका खांद्यावर पर्स लटकवलेली दुसऱ्या हातात मोठ्या पिशवीचे ओझे सावरत अलका आत आली. सासुकडे हास्य नजर टाकून तशीच ती आत गेली. मंगलाबाईच्या रागाचा पारा चढला. त्या रामरावांकडे तीक्ष्ण नजर टाकत म्हणाल्या,"पाहिलंत का? कार चालवायची आणि टॉप जीन्स घालण्याची काही गरज होती का?''
"अगं, पाहिलं नाहीस का, तिच्या हातात कसली जड पिशवी होती. कारशिवाय आणणार कशी? आणि कार चालवताना साडीची अडचण होणार नाही का? निलेश दौऱ्यावर गेलाय. आता घरची- बाहेरची सगळीच कामं ती सांभाळतेय." रामराव अगदी शांतपणे समजावून सांगत म्हणाले.
मंगलाबाईंना मात्र ही गोष्ट रुचली नाही.त्या नाराजीच्या स्वरातच म्हणाल्या," हो हो, तुम्हां बाप- लेकाने अगदी डोक्यावर चढवून ठेवलीय तिला. पहाच तुम्ही, नंतर आपल्याला एक ग्लास पाणीसुद्धा प्यायला द्यायची नाही."
दोघे याच विषयावर चर्चा करत होते तेवढ्यात रामरावांच्या हातातला पेपर गळून पडला. ते छातीवर हात ठेवून जोरजोराने श्वास घेऊ लागले. मंगलाबाईंनी घाबरून अलकाला आवाज दिला. अलकाने पाहताच जाणलं की, हार्ट अटॅक आहे.
तिने लगेच शेजाऱ्या- पाजाऱ्यांना कळवले. रामरावांना कारच्या मागच्या सीटवर झोपवून मंगलाबाईंना सोबत घेऊन हॉस्पिटलमध्ये घेऊन आली. मंगलाबाई हतबल होऊन अलकाकडे पाहत होत्या. सध्या तरी ती काही सांगण्याच्या आणि बोलण्याच्या स्थितीत नव्हती. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू झाले. अलका कधी रिसेप्शन, कधी आयसीयू, कधी मेडिकल स्टोरच्या चकरा मारत होती. काही वेळाने ती मंगलाबाईंकडे आली आणि म्हणाली," आई, काही काळजी करायसारखं नाही. बाबा आता धोक्याच्या बाहेर आहेत. मंगलाबाईंचे डोळे भरून आले. त्यांनी स्नेहभरलेला थरथरता हात अलकाच्या हातावर ठेवला.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत (सांगली)

पत्ता- संभाजी चौक, के. एम.हायस्कूलपाठीमागे,जत ता.जत जि. सांगली 416404
No comments:
Post a Comment