Tuesday, August 27, 2019

मोबाईलचा वापर व दुरुपयोग

आज मोबाईल आपला अविभाज्य घटक बनला आहेअन्नवस्त्रनिवारा याबरोबरच मोबाईलसुद्धा मूलभूत गरज बनला आहेत्याने आपल्या कित्येक गोष्टी सोप्या केल्या आहेतत्यामुळे आणखी काही वर्षात मोबाईलशिवाय जगणं प्रत्येकालाच अशक्य होणार आहेआजची परिस्थिती पाहाएकवेळ जेवायला नसले तरी चालतेपण मोबाईलमध्ये रिचार्ज टाकण्यासाठी लोकांकडे पैसा आहेअगदी हमालापासून ते भाजीवाल्या बाईकडेही मोबाईल दिसतो आहेफक्त ग्रामीण भागातल्या भिकार्यांकडे तेवढा मोबाईल नाहीनाही तर पुण्या-मुंबईसारख्या भिकार्यांकडेत्यांच्या नेत्यांकडेत्यांची एजंटगिरी करण्यांकडे मोबाईल आहेइतका हा मोबाईल माणसाशी फेव्हिकॉलसारखा चिकटला आहे.

     मोबाईलरिचार्जसाठी पोटच्या पोराला विकल्याची बातमी आपण वाचली आहेया मोबाईलसाठी घरातली बारकी पोरंही हट्ट धरून बसताहेतत्याच्यासाठी ’लंगर’ करताहेतअशाही बातम्या वाचायल्या मिळाल्या आहेतया मोबाईल फोनचा वापर मुली पळून जाण्यासाठी करताहेतत्यामुळे त्यांच्या हातात मोबाईल देऊ नकाअसा फतवाही काही फतवेबाजांनी काढला आहेम्हणजे या छोटाशा मोबाईलने माणसाच्या आंतर्बाह्य क्रिया अगदी ढवळून काढल्या आहेतइतका हा माणसाच्या जवळ आला आहेएखाद्या नातेवाईकापेक्षामित्रापेक्षाही याचे स्थान आज निकटचे बनले आहेघरात बसून टीव्हीचा रिचार्ज मारता येतेलाईट बिल भरता येतेफोन बील भरता येते.इतकेच काय तर आपण आता दुसर्यालाही पैसे मोबाईलमधून पाठवू शकतो.ऑनलाईन शॉपिंग तर आता नित्याचीच झाली आहे.बाजारात जाऊन वस्तू पाहानिवडा हा त्रासदायक प्रकार थांबला आहे.
     केवळ संवादासाठी माणसाजवळ आलेला मोबाईलआता त्याची सगळी कामे बसल्या जागी करू लागला आहेएक मिनिटही माणूस त्याच्याशिवाय राहू शकत नाहीअशी परिस्थिती आहेपण आता मोबाईलला आणि त्याच्या वेड्यांना वेडे ठरविणार्यांनाही त्याच्याशिवाय गत्यंतर राहणार नाहीअशी परिस्थिती निर्माण होत चालली आहेत्यामुळे त्याच्या नावाने कुणी ’नाके मुरडत’ असेल तर त्यांनी त्याचे अस्तित्व स्वीकारायला हवे.
     सरकारी क्षेत्रात काही योजनांमध्ये मोबाईलचा वापर आधीच सुरू झाला आहेहवामान अंदाजबाजारभावगॅस मागणीसातबाराबँक अपडेट अशा किती तरी गोष्टी मोबाईलद्वारा साध्य करणे सोपे झाले आहेआता आणखी तीस योजना किंवा सरकारी सेवा मोबाईलवर उपलब्ध होणार आहेतसूचना व प्रसारण मंत्रालय विभाग सध्या त्याच खटपटीला लागलं आहेकोर्टात अपिल करायचं असेल,रेशन कार्ड बनवायचं असेल अथवा शस्त्र परवाना किंवा नुतनीकरण करायचं असेल तर अथवा मोर्चासभाप्रदर्शनसाठी परवानगी मिळवायची असेल तर आता आपल्याला घरी बसल्या बसल्या करता येणार आहेतत्यासाठी कुठे जायची गरज भासणार नाहीसूचना आणि प्रसारण विभाग लवकरच देशभरात मोबाईल ई-डिलिव्हरी प्लॅटफॉर्म लाँच करणार आहेत्यानंतर तीसपेक्षा अधिक सरकारी सेवा मोबाईलवर उपलब्ध होणार आहेतआता काही राज्यांमध्ये काही सेवा उपलब्ध करण्यात आल्या आहेतत्यात कोर्टात अपिल करणेविवाहजन्म-मृत्यूच्या नोंदीमतदार यादीत नावाचा समावेश करणे,पाणी किंवा वीज बीलाची नवी जोडणीरेशन कार्डची मागणीलाऊडस्पिकरचा परवाना आदींचा समावेश करण्यात आला आहेयाशिवाय वृद्धावस्थाविधवाअपंग पेंशन योजनांसाठी आवेदनसुद्धा आता मोबाईलद्वारा करता येणार आहेनिवडणूक आयोगासाठी नऊ विविध ऍप्लिकेशन्स बनविण्यात आले आहेत.
     म्हणजे मोबाईल आता लोकांना देवासमान वाटणार आहेअगोदर माणसे एखाद्या माणसाने सहाय्य केल्यास त्याला धन्यवाद देतानातुम्ही नसता तर माझं काम झालं नसतंअसे म्हणत होतेआता इथून पुढे ’मोबाईल नसता तर... ’ असा हमखास उल्लेख लोक करणार आहेतलहानपणी शाळेत ’परीक्षा नसती तर...’, ’सूर्य उगवलाच नाही तर...’ असे निबंध पडतआता ’मोबाईल नसता तर... ’ असा निबंध नक्की पडणार आहे... पण पण त्याचा अतिरेक घातकच आहेमोबाईल आपल्यासाठी आहेआपण त्याच्यासाठी नाही,हे मुळात आपण लक्षात घेतले पाहिजेत्याचा वापर झाला कीतो बाजूला काढून ठेवला पाहिजेनाहीतर त्याचा त्रास आपल्याला होणारचकोणत्याही गोष्टीचा अतिरेक घातकच असतोत्याप्रमाणे मोबाईलचा अति वापर सगळ्यांनी टाळायला हवामोबाईलच्या अतिवापराने मानसिक टेन्शन वाढतंडोळे खराब होतातडोकेदुखीचा त्रास होतोहातकंबर यांची दुखणी सुरू होतातमोबाईलच्या अतिवापरामुळे लोकांना स्मृतिभ्रंश व्हायला लागला आहेदारू सोडवण्यासाठी व्यसनकेंद्रे सुरू झाली आहेततशी आता मोबाईलपासून सुटका करून घेण्यासाठी मोबाईल व्यसनकेंद्रे सुरू झाली आहेतत्यामुळे लोकांनी आताच सावध व्हायला हवेआणि मोबाईलचा गरजेपुरताच वापर करायला हवा.-मच्छिंद्र ऐनापुरे,जत 7038121012

No comments:

Post a Comment