ग्रामीण भागातल्या एका हायस्कूलमध्ये काऊंसलिंग प्रोग्रॅम सुरू
होता. काउंसलर प्रत्येक विद्यार्थ्याला,'भविष्यात मोठे
झाल्यावर तू काय होणार?' असा प्रश्न तो विचारत होता. करून त्याची इच्छा विचार होता. प्रत्येक मुलगा उभे राहून आपापली
स्वप्नं सांगत होता. कोणी म्हणत होतं, मी इंजिनिअर बनणार,
कोणी म्हणत होतं डॉक्टर. कुणाला बँक मॅनेजर, कुणाला
आयएसआय ऑफिसर. कुणाला उद्योजक बनायचं होतं. प्रत्येकजण आपापल्या इच्छा
मनमोकळेपणाने सांगत होता. हे सगळे त्या कार्यक्रमात बसलेला एक विद्यार्थी शांतपणे
ऐकत होता. त्याचा नंबर आल्यावर काउंसलरने त्याला
विचारलं,"भविष्यात तुला कोण व्हावंसं वाटतं?"
तो विद्यार्थी पटकन म्हणाला," सर,
मला शेतकरी व्हायचं आहे?"
हे ऐकल्यावर सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या.
काउंसलरने पुढं विचारलं,"तुला शेतकरीच का व्हावंसं वाटतं?"
तो म्हणाला," सर,माझे हे सगळे मित्र डॉक्टर, इंजिनिअर, आयएएस ऑफिसर, व्यावसायिक बनणार असतील तर यांच्यासाठी धान्य कोण पिकवणार? यांना खायला कोण घालणार? माझे वडीलदेखील शेतीच करतात. आम्हा शेतकऱ्यांच्या मुलांनी शेती करायची सोडून दिली तर या जमिनीत हिरवं सोनं कोण पिकवणार? आपला देश संपन्न आणि आनंदी राहायाचा असेल तर शेतकऱ्याचीही गरज भासणार आहे. आपल्या देशाने प्रगती साधायची असेल तर शेती महत्त्वाची आहे. त्यामुळे मी शेतकरी होणार."
हे ऐकून प्रोग्रामला आलेल्या सर्वच विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवल्या.
काउंसलरने त्याच्या डोक्यावर हात ठेवत म्हटले,"या मातृभूमीचा तूच खरा सुपुत्र आहेस. तू फक्त तुझ्या स्वतःच्या भल्याचा विचार केला नाहीस तर संपूर्ण देशाचा, सर्वांच्या भल्याचा विचार केलास."-मच्छिंद्र ऐनापुरे,जत (सांगली) 7038121012

No comments:
Post a Comment