नागरिकांच्या चुका व अज्ञानामुळे
इंटरनेटच्या माध्यमातून सायबर गुन्हेगारीचे प्रकार वाढले असून, यामुळे नागरिकांचे पैसे व गोपनीयतेला धोका निर्माण झाला आहे. बँकांनी
याबाबत सभासद व ग्राहकांना सजग करण्यासाठी नियमितपणे जनजागृती करण्याची आवश्यकता
आहे. सायबर साक्षरता महत्त्वाची आहे.बँकांनी मोबाइल, इंटरनेट,
एटीएम व अन्य कार्डांच्या वापराबाबत ग्राहक व सभासदांना वेळोवेळी
माहिती दिली पाहिजे तसेच जनतेनेही बदलत्या तंत्रज्ञानाची माहिती घेऊन अपडेट राहणे
गरजेचे आहे. सायबर गुन्ह्यांतील फिशिंग, हॅकिंग, नायझेरियन फ्रॉड, सायबर बुलिंग, डेटा थेप्ट, क्रिप्टोग्राफी, सॉफ्टवेअर
पायरसी यासह बिटकॉइन क्रिप्टो करन्सी, मल्टिलेव्हल
मार्केटिंग आदी प्रकारांची सविस्तर माहिती करून घ्यायला हवी.
खरे तर आज तंत्रज्ञानातील
क्रांतीने सार्या जगाला झपाटून टाकले आहे. स्मार्टफोन बहुतेकांच्या हाती आला आहे.
सोशल मीडियाचा प्रभाव वाढला आहे. इंटरनेटच्या माध्यमातून व्यवहार ऑनलाईन होऊ
लागले. व्हॉट्सअँप, फेसबुक किंवा ट्विटरसारख्या सोशल
मीडियावर चुकीच्या वा आक्षेपार्ह गोष्टीही येऊ लागल्या. पण ऑनलाइन पेमेंट करताना
कोणती खबरदारी घ्यावी? सायबर गुन्ह्य़ांना आळा कसा घातला जाऊ
शकतो? सायबर कायदा व आयटी कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदी
कोणत्या? अशा इंटरनेटच्या जगतातील विविध पैलूंच्या
माहितीपासून मात्र बहुतांशी वापरकर्ते अनभिज्ञ आहेत. नव्या तंत्रज्ञानाने
आपली मोठी सोय झाली आहे. वेळ व पैसा वाचू लागला आहे. पण जशी अन्य क्षेत्रात
गुन्हेगारीचा शिरकाव झाला,तसे याही क्षेत्रात झाला. त्यामुळे
या गुन्हेगारीपासूनच सावध राहण्याची जबाबदारी आपली आहे, पण
याबाबत आपण तसे सावध नाही. त्यामुळे याचा फायदा सायबर क्षेत्रातले गुन्हेगार घेऊ
लागले आहेत.
सर्वाधिक सायबर
हल्ले होणार्या देशांच्या यादीत भारत सातव्यास्थानी आहे. अनेक गोष्टींचे
डिजीटलायझेशन होत असतानाच सायबर गुन्ह्य़ांमध्येही वाढ होताना दिसत आहे. महत्त्वाची
माहिती चोरण्याच्या उद्देशाने अनेक हॅकर्स डेटा चोरी करतात. याच सायबर सुरक्षा आणि
डेटा चोरीसंदर्भात अमेरिकेतील एका कंपनीने नुकतेच सर्वेक्षण केले. या
सर्वेक्षणानुसार सायबर हल्ले होणार्या देशांच्या यादीमध्ये भारत सातव्या स्थानी
आहे. या कंपनीने नुकत्याच जाहीर केलेल्या 'स्टेट ऑफ द
इंटरनेट'च्या अहवालामध्ये सायबर सुरक्षा आणि डेटा चोरीसंदभातील
आकडेवारी जाहीर केली आहे. मागील वर्षी भारतात झालेल्या एकूण सायबर हल्ल्यांपैकी 40 टक्के म्हणजेच 53 हजारांहून अधिक सायबर हल्ले हे
आर्थिक क्षेत्रांशीसंबंधित बेवसाईट्स आणि अँप्लिकेशन्सवर झाले आहेत. फिशिंग,
वेब हॅक्स आणि मालवेअर प्रकारातील सायबर हल्ल्यांच्या प्रमाणात 2017 सालात वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे आणि सर्वाधिक चिंतेची बाब म्हणजे
ही वाढ आर्थिक व्यवहारांसंदर्भातील सेवांशी संबंधित आहे. त्यामुळेच भारताने सायबर
सुरक्षेच्या दृष्टीने इंटरनेट वापरासंदभातील कठोर नियम, त्यासंदर्भातील
पायाभूत सुविधा आणि त्यासंदर्भातील अँक्शन प्लॅनवर लवकरात लवकर काम करून डिजीटल
व्यवहार अधिक सुरक्षित करण्याचा प्रयत्न करायला हवा.
ऑनलाइन पेमेंट, इंटरनेट बँकिंग, सोशल मीडिया अकाऊंट
इत्यादीसाठी असलेल्या आपल्या पासवर्डची पुरेपूर काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
बँकिंगच्या व्यवहारात आणि आता नोटबंदीनंतर तर सर्वांनीच वेगवेगळ्या प्रकारचे वॉलेट
वापरायला सुरुवात केल्याने ही बाब खूप महत्त्वाची आहे. इलेक्ट्रॉनिक उपकरण आणि
इंटरनेट नेटवर्क वापरणे हे 'इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी अँक्ट,
2000' या कायद्याखाली येते. अमेरिकेतील कायद्याच्या धर्तीवर भारत
सरकारनेही बनवलेला हा कायदा खूप कडक आहे. 2008 मध्ये या
कायद्यात दुरुस्ती करून काही नव्या तरतुदींचाही समावेश करण्यात आला. व्हॉट्सअँप
किंवा अन्य सोशल मीडियावर पडलेली पोस्ट आपण सहजपणे फॉरवर्ड किंवा शेअर करतो. पण
त्यात काही आक्षेपार्ह, अश्लील, बदनामीकारक
असेल तर आपण या कायद्याच्या कचाट्यात सापडू शकतो, हे लक्षात
घ्यायला हवे.त्यामुळे कोणीही आंधळेपणाने अनुकरण करू नये. नव्या गोष्टी
वापरताना त्या गोष्टी शिकून घ्यायला हव्यात. बँकांनीदेखील वेळोवेळी आपल्या
ग्राहकांना प्रशिक्षण दिले पाहिजे. सायबर साक्षरता महत्त्वाची आहे.
No comments:
Post a Comment