मुलांच्या सुरुवातीच्या
वर्षांमध्ये पुरेशा सूक्ष्मघटकांचे सेवन अत्यंत महत्त्वाचे असते. मात्र, या पोषणघटकांच्या कमतरतेमुळे 75 टक्के
मृत्यू होतात आणि या गंभीर आकडेवारीत भर पडत चालला असल्याचा अहवाल नुकताच
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने (एमओएचएफडब्ल्यू) जाहीर केला आहे.
त्यामुळे ही किती गंभीर आहे, हे समजण्यास आकडे पुरेसे
आहेत.नवजात बालकांच्या पोषण वाढीसाठी शासनासह सामाजिक हित जोपासणाऱ्या संस्थांनी
पुढाकार घेण्याची गरज आहे.
देशातील 13 टक्के लोकसंख्या सहा वर्षांखालील मुलांची आहे आणि दररोज त्यातील
12.7 लाख मुले अपुऱ्या पोषक घटकांमुळे मरण पावतात.
मुलांच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये पुरेशा जीवनसत्व आणि खनिजांच्या
सूक्ष्मघटकांचे सेवन अत्यंत महत्त्वाचे असते. मात्र, या
पोषणघटकांच्या कमतरतेमुळे 75 टक्के मृत्यू होतात. पाच
वर्षांखालील बालकांमध्ये मृत्यूची प्रमुख कारण कुपोषण हेच आहे.
बाळाचे पहिले हजार दिवस
महत्त्वाचे महत्त्वाचे असतात.कारण बालकांच्या आयुष्यातील पहिले 1000 दिवस त्यांच्या नंतरच्या आयुष्यासाठीचा पाया रचतात.
त्याच्या आरोग्याची रचना करतात, त्याला आकार देतात. या
कालावधीत पोषक घटकांनी युक्त आहाराचे सेवन अत्यंत महत्त्वाचे ठरते. कारण यामुळेच
शारीरिक वाढ, शिकण्याची क्षमता यांच्याबाबत मुलांची क्षमता
वाढते.
सहा महिन्यानंतर कुपोषणाचा धोका
संभवतो.
बालकाच्या वयाच्या सहा
महिन्यांनंतर कुपोषणाचा मोठा धोका असण्याचे कारण म्हणजे सहा महिन्यानंतर बाळाला
केवळ स्तनपान न देता बाहेरचे अन्नपदार्थ देण्यास सुरुवात होते. याच टप्प्यात पोषक
घटक देण्यातील तफावत सर्वाधिक जाणवते. कारण, या
टप्प्यावर मुलांच्या गरजा वाढलेल्या असतात आणि स्तनपान कमी होते.या कालावधीत
बालकांच्या खानपानकडे पुरेशी काळजी घेण्याची आवश्यकता आहे.यासाठी जनजागृतीदेखील
महत्त्वाची असून प्रशासनाने यावर अधिक भर देण्याची गरज आहे.
No comments:
Post a Comment