ही गोष्ट दिलासा देणारी असले तरी चिंतेची मात्र हमखास आहे. कारण अलीकडच्या मुलांचा मैदानावरचा खेळ पुरता हरवला आहे.
मोबाईल,टीव्ही,लॅपटॉप यासारख्या बदलत्या तंत्रज्ञानामुळे आणि सततच्या अभ्यासाच्या दबावामुळे मुलांनी खेळणे सोडून दिले आहे. शारीरिक हालचाल,श्रम कमी झाली आहे. साहजिकच लहान वयातच अनेक आजार मुलांना चिटकू लागले आहेत. याबाबत फार मोठी चिंता सर्वत्र व्यक्त होत असली आणि त्याच्यावर उपाययोजना करण्याचे प्रयत्न असले तरी ते अपुरे पडत असल्याचे दिसत आहे. मात्र आपल्या देशातील किशोरवयीन मुले क्रिकेटच्या नादाने निदान घराबाहेर पडत असून त्यामुळे त्यांना थोडीफार शारीरिक श्रमाची सवय आहे, असे म्हटले पाहिजे. काही मुले अन्य खेळ खेळत असले तरी क्रिकेटला याबाबतीत अधिक श्रेय द्यायला हवे. आपल्या गल्ली बोळात, मैदानावर क्रिकेट खेळताना दिसतातच शिवाय हा खेळ खेळताना मुले तहान भूक हरवतात.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार शारीरिक हालचाली करण्याच्याबाबतीत भारतातील किशोरवयीन मुले इतर देशातल्या मुलांच्या तुलनेत आघाडीवर असल्याचे दिसून येते. मुली घरातल्या कामांमुळे आणि मुले क्रिकेट मुळे शारीरिकदृष्ट्या सक्रिय असल्याचे डब्लूएचओ या संस्थेने म्हटले आहे. जगातील 11 ते 17 वयोगटातील मुला- मुलींचा 2001 ते 2016 या कालावधीत अभ्यास करून काही निष्कर्ष काढण्यात आले आहे. जगातील 80 टक्के मुले एका तासांपेक्षा कमी शारीरिक हालचाल करत असल्याचे आढळून आले आहे. खरे तर ही बाब मोठी चिंता करण्यासारखी आहे. या वयात मुले श्रमच करत नसतील तर पुढे जाऊन ते काय करणार आहेत, असा प्रश्न आहे. आपले शरीर निरोगी ठेवायचे असेल तर त्याला श्रम द्यावेच लागणार आहे. आजकाल शाळांमध्येसुद्धा खेळाच्या तासाला फार महत्त्व दिले जात नाही. या तासाला स्पर्धा परीक्षेचे तास ठेवून मुलांना बौद्धिकतेचा ओव्हरडोस दिला जातो. विशेष म्हणजे मुलांच्या शारीरिक श्रमाकडे दुर्लक्ष करण्याची चिंताजनक परिस्थिती फक्त आपल्याच देशात नाही तर संपूर्ण जगातच आहे.
टोंगा, समोआ, अफगाणिस्तान आणि जांबिया हे चार देश सोडून 146 देशांमधील किशोरवयीन मुले-मुली शारीरिक दृष्ट्या कमी सक्रिय असल्याचे संशोधनात दिसून आले आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेने मुला-मुलींनी दिवसभरात एक तास तरी शारीरिक श्रम केले पाहिजे अशी शिफारस केली आहे. 'द लांसेट चाईल्ड अँड आडोलेसेन्ट हेल्थ' या नियतालिकेत प्रकाशित करण्यात आलेल्या 'डब्लूएचओ' च्या संशोधनाचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. यात म्हटले आहे की, 85 टक्के मुली आणि 78 टक्के मुले किमान एक तास शारीरिक हालचाल करण्याची शिफारस पूर्ण करण्यास सक्षम नाहीत. या अभ्यासाच्या सहलेखिका लिएने रिले यांनी स्पष्ट केले आहे की, 2001 ते 2016 या दरम्यान मुलांच्या शारीरिक श्रम आणि हालचालीत काहीच फरक पडलेला नाही. सर्वाधिक श्रमहीन किशोरवयीन मुले फिलिपीन (93 टक्के)मध्ये आहेत. दक्षिण कोरियातील 97 टक्के किशोरवयीन मुली काम करत नाहीत.
भारत आणि बांगलादेश मधील किशोरवयीन मुली मात्र सर्वाधिक काम करत असल्याचे या अभ्यासात आढळून आलं आहे. याला कारण म्हणजे मुली घरकामात कुटुंबाला मदत करीत असतात. स्वयंपाकपासून अनेक घरगुती कामे मुली करत असतात. भारतातील मुले क्रिकेटच्या नादाने शारीरिक हालचाली करत असतात तर मुली घरकामात हातभार लावून शरीराला काम देत असतात. पण ही शारीरिक हालचाल फारच कमी आहे. किमान दोन तीन तास मुलं-मुली काम करायला हवीत.यासाठी घरातील मोठ्या माणसांनी मुलांकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायला हवे. खरे तर मुलांच्या व्यायामासाठी उद्युक्त करायला हवं आहे. शाळा पातळीवरदेखील मुलांच्या शारीरिक हालचाली वाढवण्यासाठी प्रयत्न व्हायला हवे आहेत. शासन स्तरावर यासाठी हालचाली व्हायला हवेत. शासनाने यासाठी अभ्यासक्रम राबवताना 'कमवा व शिका' सारखे उपक्रम घेतले पाहिजेत. यातून काम करण्याची आवड निर्माण होईल, त्याचबरोबर आर्थिक जाणकारीसुद्धा त्यांना मिळत जाईल. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत 9423368970

No comments:
Post a Comment