Friday, December 13, 2019

(मोटीवेशन) आनंदी रहा... आयडिया सुचतील


एकाद्याला विचारून बघा, त्याच्या आयुष्याचे ध्येय काय आहे? कोणी म्हणेल- चांगलं करिअर, तर कोणी म्हणेल चांगलं आयुष्य. आणखीही अशीच काहीतरी उत्तरं येतील. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही सारी ध्येये तेव्हाच पूर्ण होऊ शकतील, जेव्हा माणूस खूश, आनंदी असेल. जर तुम्ही आनंदी राहाल तरच तुमच्या आयुष्यातली सर्व स्वप्ने पूर्ण होतील. नोकरी असेल किंवा बिझनेस, काम करण्याची एनर्जी तेव्हाच मिळेल, जेव्हा तुम्ही आनंदी रहाल. आनंदी असाल तेव्हाच तुमचं डोकं मोकळं राहील. आणि चांगल्या चांगल्या आयडियाज येतील. खरोखरच एकादी आयडिया तुमचं लाइफ बदलू शकेल. त्यामुळे आनंदी राहा. आयुष्याच्या प्रत्येक गोष्टीकडे नव्या दृष्टीकोनातून पाहण्याचा प्रयत्न करा. मग पहा, जगसुद्धा तुम्हाला वेगळ्या नजरेने पाहील आणि लोक म्हणतील-मित्रा! इतक्या आयडिया तुझ्या डोक्यात येतात तरी कोठून? आयुष्यात पुढं जायचं असल्यास तुमच्याजवळ युनिक आयडिया असायला हवी. तरच तुम्ही या गर्दीतून वेगळा सिद्ध करू शकाल. आता अडचण अशी आहे की, आयडिया काही झाडाला लागत नाहीत. आयडिया डोक्यात तेव्हाच येतात, जेव्हा माणूस आनंदी राहतो आणि डोकं खुलं ठेवतो.

खरे तर आयडिया केव्हा, कशा आणि कोठून येतात हे कुणीही सांगू शकत नाही. यासाठी स्वत:ला रिलॅक्स ठेवायला लागतं. वास्तविक, तणावामुळे आपली विचार करण्याची शक्ती नष्ट होते. जर तणावाच्या जागी तुम्ही स्वत:ला आनंदी ठेवाल आणि ऑल इज वेल च्या कॉन्सेप्टवर काम कराल ,तरच तुम्हाला नव्या नव्या गोष्टी सुचतील ,ज्या दुसर्या कुणालाच सुचू शकणार नाहीत. कित्येकदा एकाद्या अडचणीत सापडल्यावर तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी तुमची अडचण सुटण्याचे नाव घेत नाही आणि अचानक मग तुमच्या डोक्यात सॉलिड आयडिया येते आणि अडचण दूर होते. आनंदी राहिल्यास तुमचा उत्साह दुणावतो. आयुष्य हसरं-हसरं आणि मोकळं- मोकळं वाटायला लागतं.माइंड पॉझिटिव्ह गोष्टींवर नजर टाकत असतं. मग अडचणींवर समाधान शोधण्याचं काम आपोआप व्हायला लागतं.लोक विचार करायला लागतात आणि तुम्ही आयुष्याच्या दौडीत पुढे निघून जायला लागतात.-मच्छिंद्र ऐनापुरे,जत 7038121012 

No comments:

Post a Comment