Friday, December 13, 2019

(मोटीवेशन) यशासाठी निवडा- लाइफ लाइनी


प्रत्येकजण यशाच्या वाटेवर चालायला तयार असतो. या वाटेत कित्येकदा अशा संधी येतात, त्याने तुमचं आयुष्य बदलून जाईल, पण तेव्हा तुम्हाला नेमकं काहीच सुचत नाही. तुम्हाला वाटतं की, अडचणींवरचा मार्ग सुटणार नाही आणि मग तुम्ही निराश व्हायला लागतात. पण कामादरम्यान नेहमी चार लाइफ लाइन तुमच्यासाठी तयार असतात. कौन बनेगा करोडपतीप्रमाणेच या लाइफ लाइनींचा तुम्ही वापर केलात, तर तुमच्या अडचणींवर मार्ग निघू शकेल. कित्येकदा प्रोफेशनल लाइफमध्ये तुम्ही अडचणीत सापडता. कळत नाही की, काय करायचं? पण लक्षात ठेवा- कौन बनेगा करोडपतीच्या धर्तीवर अडचणीच्यावेळीदेखील चार लाइफ लाइनी नेहमी मदतीसाठी धावून येतात.

ऑयडियन्स पोल
जेव्हा जेव्हा  तुम्ही एकादा महत्त्वाचा निर्णय घ्यायला निघाला असाल, तेव्हा तेव्हा तुम्ही दोन मिनिटांसाठी थांबा आणि तुमच्या टीमच्या सदस्यांपुढे तो निर्णय मांडा. तुमच्या टीमच्या सदस्यांचा सल्ला कदाचित तुमच्यासाठी कामाचा नसेल, पण त्या गोष्टीकडे पाहण्याच्या दृष्टीकोनामध्ये सुधारणा होईल.ज्यावेळेला तुमचा कुठला प्रोजेक्ट अडचणीत सापडला असेल, त्यावेळेला रिव्यू आणि फिडबॅकची आवश्यकता असते. लोकांकडे मदत मागण्याने तुमचा स्मार्टनेसपणा कमी होत नाही, उलट यामुळे तुम्ही कामाच्याबाबतीत पूर्ण डेडिकेट आहात आणि लोकांच्या भावनांचा सन्मानदेखील करता, हे त्यांच्यासमोर येईल. चुकांपासून बचावण्यासाठी ही एक चांगली पद्धत आहे.
डबल डिप
कित्येकदा कन्फ्यूजन परिस्थिती येते, तेव्हा तुम्हाला दोन विकल्पांंवर काम करायला हवं. जर तुमच्या बॉसला कोणतीच आयडिया पसंद आली नाही तर तुमच्याजवळ बॅकअप आयडिया असायला हवी. अशाप्रकारे विजय तुमचाच असेल.
फोन ए फ्रेंड
कित्येकदा ऑफिस कामादरम्यान माणसाला समजत नाही की, काय करावं आणि काय नाही. अशा अडचणीच्यावेळी आपल्या खास मित्राला फोन करा. त्याच्या सोबत इकडच्या-तिकडच्या छान गप्पा मारा. त्यामुळे तुम्हाला पुन्हा एनर्जी येईल. मित्रांबरोबर कामाच्याबाबतीत चर्चाही करू शकता. जेव्हा तुम्ही तणावात असता, तेव्हा थोडा वेळ थांबा. मित्रांबरोबर हलक्या-फुलक्या गप्पा मारा. यामुळे तुम्ही रेलॅक्स व्हाल. काम करण्यासाठी आनंद महत्त्वाचा आहे. आनंद मित्रांकडूनच मिळतो, हे लक्षात ठेवा.
एक्सपर्ट एडवाइज
जेव्हा केव्हा एकादा अतिमहत्त्वाचा निर्णय असेल, तेव्हा विशेषतज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा आहे. कधी कधी विशेष प्रोजेक्ट यशस्वी बनवण्यासाठी एक्सपर्टला फीही देण्याची आवश्यकता असते. सल्ले कधीच फुकट मिळत नाहीत. उदाहरणच घ्यायचे तर तुमचेच घेऊ- तुम्ही गायक बनण्याचा विचार करत असाल आणि तुम्ही तुमची नोकरी सोडणार असाल तर एकदा तुम्हाला मुझिक डायरेक्टरशी भेटून बोलावं लागेल. ते तुम्हाला मिळणार्या संधीबाबत योग्य तो सल्ला देऊ शकतील.-मच्छिंद्र ऐनापुरे,जत 7038121012 

No comments:

Post a Comment