आपण आपल्या देशातील प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी मोठे अभियान चालवत आहोत. जगभरात जवळपास सगळ्याच ठिकाणी अशाप्रकारची अभियाने चालवली जात आहेत. सध्या तरी आपला पहिला प्रयत्न एकदा वापर केला जाणार्या प्लास्टिकपासून मुक्तता मिळवण्याचा आहे. कारण ते जगाच्या प्लास्टिक प्रदूषणामध्ये मोठी भूमिका निभावत आहे. या प्लास्टिकबरोबरच आणखी एक आव्हान आपल्यासमोर उभे राहिले आहे, ते म्हणजे मायक्रो-प्लास्टिकचे! मायक्रो-प्लास्टिक म्हणजे प्लास्टिकचे बारीक बारीक कण.सुक्ष्म कण. जे सहज डोल्यांना दिसत नाहीत. हे कण सर्वत्र आहेत. या हवेत आहेत, ज्या हवेतून आपण श्वास घेतो. त्या पाण्यात आहेत, ज्या पाण्याचा आपण वापर करतो. त्या अन्नात आहे, जे आपण खातो.
हे सुक्ष्म कण नदीत आहेत, तलावात आहेत आणि समुद्रातदेखील आहेत. हे कण आपल्या जमिनीत आणि मातीमध्येदेखील मिसळले आहेत. या मातीत त्याचे प्रमाण वाढत चालले आहे. रासायनिक खतांच्या वापरामुळे आपल्याला धोका पोहचत असल्याने त्याच्या ऐवजी कंपोस्ट खत वापरण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे आताच्या घडीला रासायनिक उर्वकांऐवजी केरकचर्यांपासून बनलेले कंपोस्ट खत वापरण्यावर भर दिला जात आहे.पर्यावरण वाचवण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. पण अडचण अशी आहे की,आपल्या केरकचर्यांमध्ये प्लास्टिक असतं. जे कंपोस्टच्या माध्यमातून आपल्या शेतात जात आहे. अमेरिकेसारख्या काही देशांसाठी ही समस्या मोठी चिंताजनक बनली आहे. कारण तिथे पीक उत्पादन वेगाने वाढवण्यासाठी काही असे पदार्थ मिसळले जात आहेत, ज्यात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक असते. वास्तविक, मातीमध्ये मिसळलेल्या प्लास्टिकच्या दुष्परिणामाबाबत आपण अजूनपर्यंत अज्ञानी होतो. पण आता याचे परिणाम हळूहळू आपल्या समोर येत आहे.
एंग्लिया रस्किन युवर्सिटीने जमिनीत आढळणार्या या मायक्रो-प्लास्टिकवर संशोधन केले, तेव्हा खूपच काही धोकादायक संकेत मिळाले आहेत. त्यांना आढळून आलं आहे की,जमिनीत आढळून येणारी गांडुळे कमकुवत बनत चालली आहेत. जिथे जितके मायक्रो-प्लास्टिक आहे, तिथे तिथेच कमकुवत गांडूळ आहेत. गांडूळ आपल्या जमिनीतील उर्वरताच नाही तर आपल्या अन्न सुरक्षेचाही मोठा आधार आहेत. एक तर ते मातीत असलेल्या कचर्याचा रोपांसाठी खतात रुपांतर करतात आणि दुसरे म्हणजे माती ते अशी काही भुसभुशीत बनवतात की, त्यामुळे झाडांच्या मुळांना सहजरित्या श्वास घ्यायला मिळतो. खासकरून बीज ते अंकुरणमध्ये याची सर्वात महत्त्वाची भूमिका असते. यामुळेच अलिकडच्या काही वर्षांत कंपोस्टवर अधिक जोर दिला जात आहे. पण आता मातीत मायक्रो-प्लास्टिक असणं म्हणजे मातीची उत्पादकता कमी होणं. महत्त्वाचं म्हणजे जे शास्त्रज्ञ अशा निष्कर्षाला पोहचले होते की,मातीत मायक्रो-प्लास्टिक असण्याने मातीची उत्पादकता वाढवली जाऊ शकते. मात्र त्यांचा निष्कर्ष धक्कादायक आढळून आला आहे.आणि तोही नेमका उलटा. जमिनीत आढणार्या मायक्रो-प्लास्टिकमुळे मातीची उत्पादकता कमी होते.
या प्रयोगाने आपल्याला आणखी एक कारण दिले आहे, ते म्हणजे प्लास्टिकपासूनची मुक्तता वेगाने वाढवण्याची आवश्यकता का आहे? या जगाची लोकसंख्या आताच्या घडीला 750कोटी आहे. आपल्याला जितक्या लोकांचे पोट भरायचे आहे, तितक्या अन्नाची आवश्यकता मानवाच्या इतिहासात कधीही नव्हती. अशा परिस्थितीत अन्न उत्पादनात जरादेखील कमतरता भासली तर जगाचे राजकीय संतुलन बिघडू शकते. असे म्हटले जाते की, कुठल्याही देशाची आर्थिक परिस्थिती ताकदवान बनवण्याची असेल तर त्याला अन्न आत्मनिर्भरता महत्त्वाची आहे. पण या आत्मनिर्भरतेवर आता मायक्रो-प्लास्टिक घाला घालत आहे. मायक्रो-प्लास्टिक सध्याच्या घडीला विकतच्या बाटलीबंद पाण्याच्या बाटलीतून आपल्या शरीरात जात आहे. आपल्या शरीरावर या मायक्रो-प्लास्टिकने घाला घालायला सुरुवात केली आहेच, पण आता आपल्या जमिनीलाही हेच मायक्रो-प्लस्टिक मातीत गाडू पाहात आहे.यामुळे अनेक देशांची आर्थिक ताकद मातीमोल होऊ लागली आहे. यापासून सावध होण्याची आवश्यकता आहे. -मच्छिंद्र ऐनापुरे,जत9423368970
No comments:
Post a Comment