Tuesday, December 24, 2019

(तात्पर्य 1) पूर आणि देव


एकेकाळी एका गावात भयंकर पाऊस पडला. ज्यामुळे गावात पूर आला.  गावात एक माणूस राहत होती, ज्याचा देवावर अटल विश्वास होता.  पूर आला तेव्हा सर्व गावकरी सुरक्षित ठिकाणी जाऊ लागले.  हे लोक त्या माणसालाही आपल्यासोबत यायला सांगत होते.  परंतु तो म्हणाला की तुम्ही सर्व निघून जा,  देवावर माझा पूर्ण विश्वास आहे, तो मला वाचवायला येईल.  हे ऐकून गावातील लोक निघून गेले.  हळूहळू संपूर्ण गावात पुराचे पाणी पसरले. आता पुराचे पाणी त्याच्या  गुडघ्यावर  येऊ लागले. आता बचावकर्ते नाव घेऊन त्याला न्यायला आले.  पण त्याने पुन्हा तेच उत्तर दिले की माझा देव मला वाचवण्यासाठी येईल.  बचावकर्ते निघून गेले.
आता गावात आणखी पाणी वाढू लागले आणि तो माणूस त्याच्या घराच्या छतावर जाऊन बसला. आता बचावकर्ते पुन्हा त्याला घेऊन जायला आले. तू आला नाहीस तर हकनाक तुझा जीव जाईल. फार हट्ट करू नकोस, अस बचाव कर्ते सांगत होते,पण त्यांच्या बोलण्याचा त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही. बचावकर्ते  हताश हो ऊन माघारी परतले. थोड्यावेळाने संपूर्ण गाव पाण्याखाली बुडाले. त्या माणसाचा अखेर मृत्यू झाला. ज्यावेळेला मेल्यावर तो माणूस देवाला भेटला त्यावेळेला तो माणूस देवाला जाब विचारू लागला- देवा, मी तुमच्यावर किती विश्वास ठेवला, पण तुम्ही मला वाचवायलादेखील आला नाही?  देव त्याला म्हणाला,अरे, मी तुला वाचवण्यासाठी कितीतरी लोकांना पाठवले,पण तू त्यांचे ऐकलेच नाहीस. माणसे, गाडी आणि नौका कोणी पाठवल्या याचा अंदाज तर लावायचा होतास.
तात्पर्य: देव अशा. लोकांनाच मदत करतो,जे स्वतः ची मदत स्वतः ला  करतात.- मच्छिंद्र ऐनापुरे, जत 7038121012

No comments:

Post a Comment