Saturday, May 2, 2020

हसण्यासाठी जन्म आपुला

दरवर्षी मेच्या पहिल्या रविवारी 'जागतिक लाफ्टर डे' साजरा केला जातो.  याची सुरुवात मुंबईपासून झाली.10 मे 1998 रोजी या दिवसाचा पहिला दिवस डॉ. मदन कटारिया यांनी साजरा केला होता.  मात्र आज जगभर अनेक देशांमध्ये मेच्या पहिल्या रविवारी 'वर्ल्ड'  लाफ्टर डे साजरा केला जातो.  हा दिवस साजरा करण्याचे उद्दिष्ट म्हणजे लोकांना हसवण्याच्या फायद्यांबद्दल जागरूक करणे आणि जगात आनंद पसरवणे. यावर्षी हा दिवस 3 मे रोजी साजरा केला जात आहे.
रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.  हसण्याने एंटीबॉडी तयार करणार्‍या पेशींची संख्या वाढते.  तसेच टी-पेशींचा प्रभाव वाढतो.  यामुळे बर्‍याचदा सर्दी- पडशांपासून  बचाव होतो. त्याच वेळी, रोगप्रतिकारक शक्ती वाढल्याने अनेक प्रकारची ऍलर्जी  आणि संक्रमणपासून देखील संरक्षण मिळण्यास मदत होते.  हास्य आपला ताण कमी करतो.  शिवाय सुमारे 45
 मिनिटांसाठी मांस पेशी रिलॅक्स होतात. यामुळे तुम्हाला फ्रेश वाटते.
आयुष्य जगताना समोर येणाऱ्या अडचणींमुळे टेंशन सतत डोक्यावर असू शकतं. थोडक्यात चिंता आणि काळजी अनेकांच्या हा जगण्याचाच एक अविभाज्य भाग असतो. मात्र सतत चिंता काळजी करत बसल्यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते. यासाठी हसणं हा दैनंदिन ताणतणावाला दूर करणारं उत्तम औषध ठरू शकतं. हसण्यामुळे शरीरातील सर्व पेशी मोकळ्या होतात. ज्यामुळे ताणतणावात निर्माण होणारे हॉर्मोन्स कमी प्रमाणात निर्माण होतात.
मनातील विचारांचा नकळत तुमच्या शरीरावर परिणाम होत असतो. जर तुम्ही सतत नकारात्मक विचार करत असाल तर त्यामुळे तुम्हाला शारीरिक समस्या होऊ शकतात. याउलट सतत आनंदी आणि प्रसन्न राहील्यास मनात केवळ चांगले आणि सकारात्मक विचार येतात. सकारात्मक विचारांमुळे तुमची विचार सरणी सुधारते.
 दिवसभरात काही वेळ हसण्यासाठी जरूर द्या. ज्यामुळे तुमच्या शरीरातील नसा मोकळ्या होतात, रक्तप्रवाह सुधारतो आणि रिलॅक्स वाटू लागते. मानसिक आजार आणि हॉर्मोनल असतुंलन दूर करण्यासाठी हसणं हा एक चांगला उपाय आहे.
झोपण्यापूर्वी हसण्याआव्हा व्यायाम केल्यामुळे तुमचे शरीर शिथील होण्यास मदत होते. ताणतणाव कमी झाल्यामुळे आणि रिलॅक्स वाटू लागल्यामुळे तुम्हाला शांत आणि निवांत झोप लागते.
 हसणं ही एक नैसर्गिक गोष्ट आहे. हसत-खेळत काम केल्यामुळे काम तर चांगले होतेच शिवाय कामाचा अती ताणदेखील येत नाही. सतत हसणाऱ्या आणि प्रसन्न व्यक्तिमत्वाच्या व्यक्ती इतरांना नेहमीच आकर्षित करतात. जर तुम्हाला लोकसंग्रह करण्याची सवय असेल अथवा तुम्ही सामाजिक कार्यात सक्रीय असाल तर हसण्याचा तुमच्या व्यक्तिमत्वावर चांगला परिणाम होऊ शकतो.

No comments:

Post a Comment