शिक्षको बोधकशैव षडेते गुरव: स्मृता:।।
अर्थात प्रेरणा देणारे, माहिती सांगणारे, सत्य सांगणारे, मार्गदर्शन करणारे, शिक्षण देणारे आणि बोध करणारे हे सगळे आपल्याला गुरू समान असतात.
जे आपल्याला अक्षराचे ज्ञान देतात, तेच आपले शिक्षक असतात, असे नाही. जीवनात जे काही योग्य आहे त्याचे मार्गदर्शन करून भव सागर पार करायला मदत करतात ते गुरू. अर्थात हे कोणीही असू शकतात. लहान मोठा, श्रीमंत गरीब, शिक्षित अशिक्षित. एकादी घटना किंवा अनुभवसुद्धा आपला शिक्षक बनू शकतो. गुरुदेव या नामाने प्रसिध्द असलेले कवी, नाटककार आणि साहित्यकार रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलं होतं की, प्रत्येक झाड पहिल्यांदा जमिनीवर पडलेलं एक बीज असतं.
ते म्हणतात की, प्रकृती रोज एक शिकवण देत असते. त्यामुळे शिक्षण देखील त्याच्या सानिध्यातच घ्यायला हवं. हा विचार सोबत घेऊनच त्यांनी शांतिनिकेतनची स्थापना केली. विशेष म्हणजे रवींद्रनाथ टागोर यांच्याकडे त्यांच्या शाळेतील शिक्षक अभ्यासाकडे कधीही लक्ष न देणारा विद्यार्थी म्हणून पाहत होते.
टागोर यांनी कायद्याचे शिक्षणदेखील अर्ध्यावरच सोडले. परंतु पारंपरिक शिक्षण पूर्ण न केल्याचा परिणाम त्यांच्या आयुष्यावर कधी झाला नाही. ते एकमेव असे कवी आहेत, ज्यांच्या दोन रचना दोन देशांचे राष्ट्रगीत बनल्या आहेत. भारताचे राष्ट्रगीत 'जन गण मन..' आणि बांगलादेशचे राष्ट्रगीत 'आमार सोनार बांग्ला.... या कृती आता अजरामर झाल्या आहेत.
त्यांच्या 'गीतांजली' या प्रसिद्ध रचनेला 1910 मध्ये प्रतिष्ठित 'नोबेल पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले आहे. सांगण्याचे तात्पर्य हे की या जगात असे अनेक लोक आहेत, जे एक तर कोणत्यातरी कारणाने किंवा आवड नसल्याने शिक्षण पूर्ण करू शकले नाहीत. पण त्यांच्या आयुष्यावर काही परिणाम झाला नाही.
पण एकाद्या गुरूच्या दिलेल्या मार्गदर्शनामुळे त्यांना स्वतः ला दुसऱ्याला मार्गदर्शक बनवले. अमेरिकी लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या,अभिनेत्री माया एन्जोलो यांची कहानी देखील यापेक्षा वेगळी नाही. त्यांना शिक्षण सोडावं लागलं. त्यांनी डान्स आणि अकटिंग करण्याचा निर्णय घेतला. त्या एका काळ्या गुलामाच्या नात होत्या.त्यांची जगप्रसिद्ध आत्मकथा 'आय नो वाय द केज्ड बर्ड सिंग्ज' या पुस्तकाने त्यांना यशाच्या शिखरावर नेऊन ठेवलं. त्या म्हणतात की, त्यांच्या आयुष्यात त्यांचे गुरू अनेक बनले , ज्यांनी त्या योग्य मार्ग दाखवला. यातल्याच एक मार्टिन लुथर किंग ज्युनिअर. त्यांनी मायाला तिची आत्मकथा लिहायला प्रेरित केले. नंतर मग माया एन्जोलो यांनी मागे वळून कधी पाहिलेच नाही.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत
खूप छान आहे
ReplyDelete