Friday, September 13, 2019

मुनव्वर सुलताना: अफसाना लिख रही हूं


चित्रपट सृष्टीची नशा काही औरच असते. आणि त्यात ज्यांच्या चित्रपटांना जबरस्त यश मिळालेले असते, अशांना त्यापासून दूर राहणं अवघडच असतं. मुमताज, नीतू सिंह, श्रीदेवी यांच्यापासून माधुरी दीक्षितपर्यंत अनेक अभिनेत्रींनी लग्न केल्यानंतर चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला होता. पण त्या काही वर्षांनी पुन्हा परत आल्या. मात्र अशा काही अभिनेत्रीही आहेत, ज्या लग्नानंतर चित्रपट सृष्टीला कायमचा रामराम ठोकला. परत त्यांनी वळूनही पाहिले नाही. अशाच अभिनेत्रींपैकी एक मुनव्वर सुलताना! त्यांच्यावर चिित्रित करण्यात आलेले अफसाना लिख रही हूं... हे गाणे त्यावेळी फारच गाजले होते. त्यांचा 15 सप्टँबर स्मृतिदिन. त्यांच्याबद्द्ल थोडेसे...

काही अभिनेत्रींनी लग्नानंतर कुटुंबाला प्राधान्य देत काही वर्षे चित्रपटांपासून दूर राहतात. एक ब्रेक घेतात. आणि मग पुन्हा काही सालानंतर चित्रपटांमध्ये परततात. मुमताजपासून नीतूसिंह आणि श्रीदेवीपासून ते माधुरी दीक्षितपर्यंत अनेकांनी असेच केले. कधी कधी काहींचा हा ब्रेक दीर्घ असतो, तर कधी कमी इतकेच! बेगम पारा (दिलीप कुमार यांचा भाऊ नासिर खानची अभिनेत्री पत्नी आणि अभिनेता आयुब खानची आई) या पन्नास वर्षे चित्रपटांपासून लांब राहिल्या. पण अलिकडेच आलेल्या संजय लीला भन्साळी यांच्या सांवरिया या चित्रपटात त्यांनी पुनरागमन करत सोनम कपूर हिच्या आजीची भूमिका साकारली.
काही अभिनेत्रींनी लग्नानंतर चित्रपटसृष्टीला कायमचाच निरोप दिला. अर्थात असं काही नाही की, त्यांना चित्रपटांचे प्रस्ताव मिळत नव्हते.  वैजयंतीमाला यांना लग्नानंतर चित्रपटात परत आणण्यासाठी राज कपूर, गुलजार, यश चोप्रासारख्या दिग्गज चित्रपटकर्त्यांनी खूप प्रयत्न केले. नर्गीस, बबीता, टीना मुनीम, मीनाक्षी शेषाद्री अशा अभिनेत्रींनी चित्रपटांना अलविदा केले ते कायमचेच. यात आणखी एक नाव आहे, ते म्हणजे मुनव्वर सुलताना यांचे! मुनव्वर यांना डॉक्टर व्हायचे होते.पण  योगायोगाने त्या चित्रपटात आल्या. लाहोरमध्ये जन्माला आलेल्या सुलताना यांनी खजांची (1941) या चित्रपटात छोटीशी भूमिका केली केली होती. त्यानंतर त्यांना मजहर खान यांनी मोठी संधी दिली. चित्रपट ग्लॅमरचे आकर्षण असलेल्या मजहर खान यांनी कायद्याचे शिक्षण अर्धवट सोडून  1921-22 मध्ये चित्रपटाचा मार्ग स्वीकारला. बरेली येथे जन्मलेल्या खान यांनी 20 वर्षे चित्रपट सृष्टीत अभिनय केला. 1942 मध्ये त्यांनी आपली फिल्म कंपनी स्थापन केली. 1945 मध्ये पहली नजरमध्ये मुनव्वर यांना संधी दिली. या चित्रपटातील दिल जलता है तो जलने दे... हे गाणे  खूपच गाजले.
मुकेश यांनी पहली नजर मध्ये मोतीलालसाठी गाणी गायली. मोतीलाल यांच्या शिफारशीनुसार काम चित्रपटही मिळाला होता. मुकेश यांचा लांबचा नातेवाईक असलेल्या मोतीलाल यांनीच त्यांना दिल्लीहून मुंबईला बोलावले होते. पहली नजरचे गाणे पडद्यावर मोतीलालसोबत सुलताना यांचे क्लोज अप चित्रिकरण करण्यात आले होते.
मुनव्वर यांना निर्माता ए. आर. कारदार यांनी दर्द (1947) मध्ये त्यांचा भाऊ नुसरत यांची नायिका बनवले. यात सुरैया यांनी सहायक अभिनेत्रीची भूमिका साकरली होती. यात अभिनेत्री मुनव्वर यांच्यासाठी अभिनेत्री टुनटुन यांनी अफसाना लिख रही हूं दिले बेकरार... हे गाणे गायले होते. हे गाणे मुनव्वर यांच्यावर चित्रीत करण्यात आले होते. परीक्षकांनी या चित्रपटाला बकवास चित्रपट म्हणून हिणवले होते, मात्र प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले.
मुनव्वर यांचा बाबूल चित्रपटदेखील सुपर हिट झाला. प्रेम त्रिकोणावर आधारित असलेल्या या चित्रपटात दिलीप कुमार, नर्गीस ही जोडी होती. या चित्रपटातील छोड  बाबूल का घर आज पिया के घर जाना पडा... हे गाणे आजही लग्नसमारंभात वाजवले जाते. 1947 मध्ये भारत-पाकिस्तान विभाजनादरम्यान काही कलाकार पाकिस्तानमध्ये गेले. पण मुनव्वर यांनी भारतातच राहण्याचा निर्णय घेतला. 1948 मध्ये मुनव्वर यांची भेट फर्निचर उद्योजक शरीफ अली भगत यांच्याशी झाली. नंतर त्यांनी विवाह केला. भगत यांनी मुनव्वर यांना घेऊन दोन चित्रपटही बनवले. मेरी कहानी आणि प्यार की मंजिल हे ते दोन चित्रपट. लग्नानंतर सुलताना यांनी चित्रपट सृष्टीला रामराम ठोकला. त्यांचा जल्लाद (1956) हा शेवटचा चित्रपट. या चित्रपटाचा नायक दिलीप कुमार यांचा भाऊ नासिर खान होता. तो विभाजननांतर पाकिस्तानमध्ये गेला होता,पण नंतर भारतात परत आला. सुलताना यांचे निधन 15 सप्टेंबर 2007 मध्ये झाले.-मच्छिंद्र ऐनापुरे,जत  



No comments:

Post a Comment