प्रेरणायी घटना दगड आणि स्त्री
श्रीलंकेत इंग्रजांचं राज्य होतं. तामिळी पंडित आरुमूग नावलर कादिर गामण्मुख मंदिराच्या बाहेर एका दगडावर आपल्या मित्रांसमवेत गप्पा मारण्यात दंग होते. एक इंग्रज त्यांच्या दिशेने आला. जवळ येऊन तो आरुमूग नावलरांना म्हणाला," आत काही लोक दगडाची पूजा करताहेत आणि तुम्ही मात्र चक्क दगडावर बसून चकाट्या पिटता आहात? "
काही दिवसांनी त्याच रस्त्यावरून तोच इंग्रज आपल्या कुटुंबासमवेत घोडागाडीतून चालला होता. त्याने नावलर यांना घोडागाडी थांबवली आणि शेजारी बसलेल्या आपल्या पत्नी आणि बहिणीची ओळख करून दिली.
आरुमूग नावलर त्या इंग्रजाला म्हणाले," दोन्ही स्त्रियाच आहेत. मग यातील एक तुमची पत्नी आणि एक बहीण हे कसे काय?" इंग्रज समजून चुकला. त्याने नावलरची माफी मागितली आणि आपला रस्ता धरला. .. - मच्छिंद्र ऐनापुरे, जत
सरपंचांचा माणूस बापूंना न्यायला आला, पण बापू त्याला भेटले नाहीत. तो परत गेला, तेव्हा गांधीजी लोकांमध्ये बसून त्यांना मार्गदर्शन करीत असल्याचे त्याने पाहिले. भाषण संपल्यावर तो बापूंना भेटला. आपली झालेली चूक त्याने कबूल केली आणि त्यांची माफी मागितली. बापू त्याला म्हणाले, " वेळ खूप मौल्यवान आहे. आपल्याला वेळेचा सदुपयोग करून घेता आला पाहिजे." - मच्छिंद्र ऐनापुरे, जत
भिकारी म्हणाला," मी राजा. " ऐकून चकित झालेल्या सिकंदरने पुन्हा विचारले, " तू कोणत्या देशाचा राजा आहेस? तुझा राजवाडा, तुझे ऐश्वर्य कुठं आहे?" तो बेफिकीर भिकारी तितक्याच बेदरकारपणे म्हणाला, " मनावर विजय मिळवलेला राजा. ही सारी दुनिया माझ्या परमपित्या परमेश्वराच्या संपत्तीने भरून गेलेली आहे. असे असताना मी बापडा वेगळे असे टिचभर धन घेऊन काय करू? कुठे जाऊ?"
सिकंदरला त्याच्या बोलण्यामागचा गर्भितार्थ समजला. त्याला खर्या अर्थाने खर्या राजाचे पहिल्यांदा दर्शन घडले. - मच्छिंद्र ऐनापुरे, जत
श्रीलंकेत इंग्रजांचं राज्य होतं. तामिळी पंडित आरुमूग नावलर कादिर गामण्मुख मंदिराच्या बाहेर एका दगडावर आपल्या मित्रांसमवेत गप्पा मारण्यात दंग होते. एक इंग्रज त्यांच्या दिशेने आला. जवळ येऊन तो आरुमूग नावलरांना म्हणाला," आत काही लोक दगडाची पूजा करताहेत आणि तुम्ही मात्र चक्क दगडावर बसून चकाट्या पिटता आहात? "
काही दिवसांनी त्याच रस्त्यावरून तोच इंग्रज आपल्या कुटुंबासमवेत घोडागाडीतून चालला होता. त्याने नावलर यांना घोडागाडी थांबवली आणि शेजारी बसलेल्या आपल्या पत्नी आणि बहिणीची ओळख करून दिली.
आरुमूग नावलर त्या इंग्रजाला म्हणाले," दोन्ही स्त्रियाच आहेत. मग यातील एक तुमची पत्नी आणि एक बहीण हे कसे काय?" इंग्रज समजून चुकला. त्याने नावलरची माफी मागितली आणि आपला रस्ता धरला. .. - मच्छिंद्र ऐनापुरे, जत
वेळ
साबरमती आश्रमात गांधीजींकडे कुठल्याशा गावचे काही लोक आले. त्यांनी गांधींजींना सभेसाठी आमंत्रित केले. बापू म्हणाले," ठीक आहे, उद्या संध्याकाळी बरोबर पावणे चार वाजता तुम्ही मला न्यायला या. सरपंचाने सभेची वेळ चारची ठेवली होती. दुसर्यादिवशी सायंकाळचे पावणे चार वाजले. पण सरपंचांचा कुणी माणूस त्यांना न्यायला आला नाही. मग स्वतः बापूंनी सायकल घेतली आणि त्या गावाच्या दिशेने निघाले. सरपंचांचा माणूस बापूंना न्यायला आला, पण बापू त्याला भेटले नाहीत. तो परत गेला, तेव्हा गांधीजी लोकांमध्ये बसून त्यांना मार्गदर्शन करीत असल्याचे त्याने पाहिले. भाषण संपल्यावर तो बापूंना भेटला. आपली झालेली चूक त्याने कबूल केली आणि त्यांची माफी मागितली. बापू त्याला म्हणाले, " वेळ खूप मौल्यवान आहे. आपल्याला वेळेचा सदुपयोग करून घेता आला पाहिजे." - मच्छिंद्र ऐनापुरे, जत
खरा राजा
विजयी सिकंदरचे सैन्य एका जंगलातून माघारी परतत होते. सिकंदरसुद्धा त्यांच्या समवेत होता. वाटेत त्याने एका वृक्षाखाली एका बेफिकीर भिकार्याला पाहिले. तो भिकारी आपल्याच मस्तीत डफली वाजवत गाणे म्हणण्यात दंग झाल्;आ होता. असल्या दारिद्र्यग्रस्त परिस्थितीतही इतक्या धुंदपणे गाणे भिकार्याला भिकार्याला पाहून सिकंदरला मोठे आश्चर्य वाटले. तो थांबला. भिकार्यालात्याने त्याचे नाव विचारले.भिकारी म्हणाला," मी राजा. " ऐकून चकित झालेल्या सिकंदरने पुन्हा विचारले, " तू कोणत्या देशाचा राजा आहेस? तुझा राजवाडा, तुझे ऐश्वर्य कुठं आहे?" तो बेफिकीर भिकारी तितक्याच बेदरकारपणे म्हणाला, " मनावर विजय मिळवलेला राजा. ही सारी दुनिया माझ्या परमपित्या परमेश्वराच्या संपत्तीने भरून गेलेली आहे. असे असताना मी बापडा वेगळे असे टिचभर धन घेऊन काय करू? कुठे जाऊ?"
सिकंदरला त्याच्या बोलण्यामागचा गर्भितार्थ समजला. त्याला खर्या अर्थाने खर्या राजाचे पहिल्यांदा दर्शन घडले. - मच्छिंद्र ऐनापुरे, जत
No comments:
Post a Comment