Friday, September 23, 2011

माणूस होणार अदृश्य...!

विज्ञान्-तंत्रज्ञान
माणूस होणार अदृश्य...!
    माणूस हिंदी चित्रपटाच्या पडद्यावरून अदृश्य होतो, तसा प्रत्यक्षात अदृश्य झाला तर ...! असे शक्य होईल काय? पण तशी शक्यता आता दृष्टीक्षेपात आली आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी मीटा मॅटिरियल्स नावाचा खास पदार्थ शोधून काढला आहे. या पदार्थामुळे कोणतीही व्यक्ती क्षणात डोळ्यांआड होण्याची क्षमता प्राप्त करू शकते. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार याचा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिशिअन कोणत्याही वस्तूला अदृश्य करू शकतो.शास्त्रज्ञांच्या एका आंतरराष्ट्र्रीय टीमने अशा एका पदार्थाची निर्मिती केली आहे. , प्रकाशयात्रेच्या दिशेवर नियंत्रण मिळवू शकतो.
    अशाप्रकारे प्रकाशाच्या दिशेवर नियंतरण मिळवल्यास मनुष्याबरोबरच मोठ-मोठे टँक आणि जहाजांना अदृश्य करून दहशतवाद्यांवर मात करू शकता येते. विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्यामते हा नाविण्यपूर्ण पदार्थ प्रकाशाची दिशा बदलण्यास समक्षा आहे. अमेरिकेच्या नौदलाने २६ ऑक्टोबर १९४३ मध्ये फिलाडेल्फियात या पदार्थाचा गुप्त प्रयोग केला असल्याच्या बातम्या आहेत. या प्रयोगात रडार आणि जहाज प्रकाशापासून अदृश्य अथवा पारदर्शित करण्याचा प्रयत्न केला गेला होता. मातर बहुतांश तज्ज्ञांच्या मतानुसार अशा प्रकाराचा कथीत प्रयोग म्हणजे केवळ दंतकथा आहे.तर काहींच्या मते मॅटीरियल्सचा फिलाडेफ्लियामध्ये वास्तवात प्रयोग करण्यात आला आहे. आणि आता त्याचा विस्तार करण्याचे कार्य चालू आहे.
    हा फॉर्म्युला प्रत्याक्षात उतरला आणि मनुष्याच्या जीवावर उठलेल्या, माणुसकीला काळिमा फासायला निघालेल्या दहशतवाड्यांच्या हाती लागल्यास त्यांच्या नापाक इराद्याला बळच मिळणार आहे. आजचे दहशतवादीच इअतके चलाख आहेत कि, कधी येतात आणि विद्वंश करून जातात, याचा थांगपत्तासुद्धा कुणाला लागत  नाही. अशा अतिरेक्यांना हा फॉर्म्युला सापडल्यास काय होईल याचा विचार करणेच नको.सुरक्षाकवच सहज भेदणार्‍या या दहशतवाद्यांना राष्ट्रपतीभवन, पंतप्रधान कार्यालय, सुरक्षा मंत्रालय,अणुकेंद्र हा परिसर म्हणजे 'किस झाड की पत्ती'समान आहे. आताच त्यांच्याकडे जगातील उच्च , विकसित आणि प्रगत असे तंत्रज्ञान अवगत आहे. जगातील विकसित देशांचे तंत्रज्ञान त्यांच्या कह्यात आहे. त्यामुळे वस्तू किंवा माणसाला अदृश्य करणारे तंत्रज्ञान त्यांच्या हाती लागल्यास मानवाचा अंत अधोरेखितच आहे,असे ग्रहीत धरायला हरकत नाही.
    हा संभ्याव धोका सोडला तर मात्र देशांच्या सुरक्षेच्यादृष्टीने हे तंत्रज्ञान वरदान ठरू शकते.सुरक्षा सैनिक अदृश्य हो ऊन आपले कार्य करत राहतील आणि सुरक्षाकवच भेदण्याचा प्रयत्न करणारे त्यांच्या गळाला लागतील. परंतु खरा प्रश्न असा आहे कि, अल-कायदा, दाऊद्सारख्या दहशतवाद्यांच्या नजरेतून हा फॉर्म्युला सुटेल का? म्हणतात ना, कुठलीही गोष्ट चांगली किंवा वाईट नसते.परंतु त्याचे चांगले आणि वाईटपण त्याच्या वापरण्यावर अवलंबून असते. शास्त्रज्ञांनी हे तंत्रज्ञान पूर्णत: विकसित व्हायला आणखी काही बरीच वर्षे लागणार असल्याचे म्हटले आहे. परंतु या तंत्रज्ञानाचा वापर ही दुनिया कसा करेल, हे मात्र येणारा काळच ठरवेल.                           ..                                                                                                                                                                                                _ मच्छिंद्र ऐनापुरे, जत

No comments:

Post a Comment