Thursday, September 22, 2011

चर्चा बड्यांच्या घटस्फोटाची !

घटस्फोट हा प्रकार आता भारतासारख्या संस्कृतीशील देशातही सामान्य झाला आहे. कोण केव्हा घटस्फोट घेईल, सांगता येईनासा झाले आहे. लग्न म्हणजे बाहुला- बाहुलींचा खेळ समजला जात आहे. ग्लॅमरचे वलय असलेल्या लोकांचे तर काही बोलूच नका. अगदी तिखट-मीठ लावून त्यांच्या घटस्फोटाच्या कहाण्या चर्चिल्या जातात. कुणाची किती मोडली ? सध्या कुणाचे कुणाबरोबर अफेअर सुरू आहे. बात कुठवर आली आहे. या सगळ्या गप्पा खंमग चर्चिल्या जातात. अर्थात त्या यापुढेही चवीने चघळल्या जाणार हे सांगायला नको. अझहर-ज्वाला, अरुण नायर- एलिझाबेथ हर्ले, राहूल- श्वेतासिंग आणि अदनान सामी- सबा गलाधारी आदींच्या घटस्फोटांची चर्चा अशीच रंग भरत राहिली.
आता आपल्या अझरुद्दीनचीच गोष्ट घ्या. बिचार्‍याने पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन अभिनेत्री राहिलेल्या संगिता बिजलानीशी लग्न केले होते. पण  आता चौदा वर्षाच्या सुखी संसारानंतर ग्रहण लागले असून त्यांच्या या लग्नाला  'फूल्-स्टॉप'  लागण्याची वेळ आली आहे. या दोघांच्या संबंधात तणावाचे वातावरण ढवळू लागले ते,  अझहरच्या जीवनात बॅडमिटन चॅम्पियन ज्वाला गुट्टा शिरकाव्यामुळे ! मिडिया त्यांच्या खमंग बातम्या रसरसून द्यायला लागल्याने  अझहर आणि संगीताच्या संबंधात बेबनावाच्या ठिणग्या पडायला लागल्या. याच काळात  ज्वाला गुट्टासुद्धा आपल्या नवर्‍याला - चेतन आनंदला सोडून एकटी वेगळी राहात होती.  अझहरसुद्धा ज्वालाला पसंद करत होता म्हणे कारण आणि  तिच्यासाठी एक बीएमडब्लू गिफ्ट दिली होती अशी चर्चा मिडियात रंगली होती. . खरं खोटे ती दोघेच जाणोत. पण दोघेही चांगले खेळाडू आहेत.  एक ४८ वर्षाचा तर एक २७ वर्षाची. पण काय माहित दोघांचं  वाजणार का नाही ते ? सध्या तरी खासदार अझहर पुत्रशोकात आहे.
अरुण नायर आणि एलिझाबेथ हर्ले यांच्या लग्नाबाबत तर तुम्हाला माहितच आहे. या दोघांचा विवाह बराच काळ गाजत राहिला. लिज एक टॉप मॉडेल आणि अभिनेत्री. तर अरुण नायर एक श्रीमंत एनआरआय. लिज लग्नाअगोदर अभिनेता ह्यूग ग्रांटसोबत १० वर्षांपासून डेटिंग करत होती. अरुण नायरजवळ पैशाचं झाड असताना त्याहीपैक्षा अधिक झाडं लिजजवळ होती. शेन वार्नसोबतच्या संबंधाच्या चर्चेनंतर लिजने नायरकडे लिजने घटस्फोटाची मागणी केली. त्यांचं वैवाहिक जीवन चार वर्षातच संपुष्टात आलं. या  घटस्फोटानंतर लंडन आणि भारतात मोठ्या  धुमधडाक्यात झालेल्या  लग्नाला घटस्फोटाने अखेर पूर्णविराम मिळाला. आता लिजच्या प्रेमप्रकरणाची गाडी ऑस्टेलियाचा क्रिकेटर शेन वॉर्नशी सुरू आहे.
तुम्हाला आपला राहूल तर माहितच आहे. तोच तो महाजनांचा. रिऍलेटी शो ' दुल्हनिया ले जाएंगे' नंतर त्याचं लग्न डिम्पीशी झालं. त्याअगोदर चर्चा करुया त्याच्या पहिल्या लग्नाची. त्याची पहिली बायको श्वेता हिला तो १३ वर्षांसून ओळखत होता. पण त्यांचं लग्न एक वर्षसुद्धा टिकलं नाही. श्वेताला करण्यात आलेल्या मारहाणीच्या खुणा मिडियासमोर आल्या तेव्हा त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चेला ऊत आला. त्यातच राहुलसुद्धा  ड्रग्स प्रकरणात पकडला गेला होता. असं कळतं की हा घटस्फोट त्याला मोठा महागात पडला.
अदनान सामी आणि सबा गलाधारी यांच्या घटस्फोटाची बातही अशीच चविष्ट आहे.  अदनान सामी आपली पहिली बायको झेबा बख्तियार हिच्यापासून घटस्फोट घेताना चांगलाच वादात अडकला होता. त्याला  आपल्या मुलाच्या  कस्टडीसाठी बर्‍याच खस्ता खाव्या लागल्या आहेत. कोर्टकचेरी खेळावी लागली.  नंतर त्याचे लग्न सबा गलाधारी हिच्याशी झाला. मात्र दुदैवाने त्याचा हाही विवाह घटस्फोटाने संपुष्टात आला. त्याचा   घटस्फोट गाजला तो त्याच्या 'रॉक'   नावाच्या कुत्र्याच्या कस्टडीवरून.  मिडियाने  तर त्यांचा विषय हास्यास्पद करून टाकला होता.  त्याचबरोबर मुंबईतल्या पाच प्लॅटच्या हक्कावरूनही त्यांचा  घटस्फोट रंगला होता.  शेवटी ते सबाला मिळाले. अदनान सामीला त्याच्या संगीत आणि गाण्याने जेवढी पब्लिसिटी मिळाली नाही, त्याहीपेक्षा अधिक  त्याच्या  घटस्फोट मामल्यामुळे मिळाले.    - मच्छिंद्र ऐनापुरे , जत

2 comments:

  1. प्रसिध्द दिग्दर्शक अनुराग कश्यप याने 1997 मध्ये आरती बजाजसोबत लग्न केले होते. लग्नाच्या 12 वर्षांनंतर दोघे वेगळे झाले. यानंतर त्याने 2011 मध्ये कल्की कोचलिनशी लग्न केले. हे लग्न फक्त चार वर्षे टिकले आणि 2015 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला

    ReplyDelete
  2. सीमा म्हणतेय, आयुष्यात पुढे जायचेय!
    बॉलीवूड अभिनेता सोहेल खान आणि सीमा सजदेह हे लवकरच घटस्फोट घेणार आहेत. त्यांनी लग्नाच्या २४ वर्षानंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला. एका मुलाखतीमध्ये सीमाने घटस्फोट घेण्याच्या निर्णयामागील कारण सांगितले आहे. ती म्हणाली, "मी आता माझ्या आयुष्यातील अशा टप्प्यावर पोहोचले आहे की, मला कोणाचीही पर्वा नाही. मला आयुष्यात पुढे जायचे आहे, म्हणून मी हा निर्णय घेतला आहे. माझ्या मुलांना आणि कुटुंबाला माझ्या या निर्णयाबाबत माहीत आहे. मी माझ्या आयुष्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत आहे, हे माझ्या कुटुंबाला माहीत आहे. मी सर्व नकारात्मकता माझ्या आयुष्यातून काढली आहे. मी कोण आहे, हे माझ्या जवळच्या लोकांना माहीत आहे. ' सीमा ही फॅशन डिझाइनर असून तिचे एक फॅशन स्टोअरदेखील आहे. या फॅशन स्टोअरचे नाव 'बांद्रा १९०' असे आहे. 'प्यार किया तो डरना क्‍या' या चित्रपटाच्या सेटवर सोहेल आणि सीमा यांची भेट झाली. त्यानंतर १९९८ मध्ये त्यांचा विवाह सोहळा पार पडला. त्यांना निर्वाण आणि योहन नावाची दोन मुले आहेत. ते दोघे २०१७ पासून वेगळे राहत आहेत.

    ReplyDelete