(ठिकाण: गावातला
रस्ता)
(चतुर्भुज एम.ए. उत्तीर्ण होऊन आपल्या गावात आला आहे. तो हा विचार करतोय की, गावातले लोक आपल्याला पाहून आनंदी
होतील. त्याच्या पुढ्यात एक काबुली जातीचे मांजर आहे.)
नीलरत्न: कसं काय चतुभाऊ, गावी कधी आलात?
चतुर्भुज: एम.ए.ची परीक्षा
देऊन आता आताच येतो आहे.
नीलरत्न: व्वा छान! तुमचे हे मांजर खूपच
सुंदर आहे.
चतुर्भुज: या खेपेची परीक्षा इतकी अवघड होती की,...
नीलरत्न: (मधेच) अरे भावा, असले मांजर कुठून मिळवले?
चतुर्भुज: रोख देऊन विकत घेतले. या खेपेला
मी जे विषय घेतले होते, ते खरे तर...
नीलरत्न: (मधेच) भावा,हे मांजर कितीला पडले?
चतुर्भुज: आठवत नाही. नीलरत्नजी, आपल्या गावातल्या मुलांच्या परीक्षा कशा गेल्या?
नीलरत्न: खूप छान! पण असले मांजर अख्ख्या
पंचक्रोशीत कुणाकडे नाही.
चतुर्भुज: ( अचानक रागावतो) मला वाटतं,
तुमच्या सर्वांच्या नशिबात गळ्याला फास लावून मरण्याचेच लिहिले आहे.
(गावातली आणखी एक व्यक्ती पराणदेखील
जवळ उभा राहून त्यांचे बोलणे ऐकत होता. या दरम्यान गावातली मुलं
एकत्र जमली होती.)
पराण: अरे बाप रे! चतुभाऊ तर संतापाने थरथर कापतो आहे.
(चतुर्भुज काही न बोलता पुढे निघाला.)
मुले: (टाळ्या वाजवत त्याच्या मागे मागे चालू लागतात.)
काबुली मांजर! काबुली मांजर!
(लेखक-रवींद्रनाथ
टागोर)
अनुवाद-मच्छिंद्र ऐनापुरे
No comments:
Post a Comment