Thursday, January 31, 2019

प्रसिद्धी कुणाला नकोय!


आपल्याला नेहमी अनेक प्रकारची माणसं भेटत असतात. त्यातल्याच काहींना प्रसिद्धी नको असते. कुणी कौतुक केलं तर म्हणतात, मीदेखील असं करू शकतो,पण मला प्रसिद्धी नकोय. अर्थात कुणाला प्रसिद्धी नकोय, ही खरे तर चांगलीच गोष्ट म्हटली पाहिजे. पण त्यामुळे चांगलं काम न करणं मूर्खपणाचं नाही का? मला तर वाटतं, याच्यापेक्षा आणखी कोणी दुसरा मूर्ख असू शकेल. प्रसिद्धी नको म्हणून तो फक्त कामापासून दूर जाण्याचं काम करतो.
फ्रान्सच्या क्रातिच्या दरम्यानचे विचारवंत मान्टेन म्हणतात की, जी माणसं प्रसिद्धीच्या विरोधात चर्चा करतात, तीदेखील या विरोधात असे पुस्तक लिहू इच्छितात, आणि त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर आपलं नाव असावं म्हणतात. प्रसिद्धीला विरोध करतानाही त्यांना प्रसिद्धी हवी असते. मान्टेन पुढे म्हणतात की, प्रत्येक गोष्टीची देवाण-घेवाण होते. आपण आपल्या मित्रांना सन्मान देऊ शकतो, गरज पडली तर त्याच्यासाठी जीवदेखील देऊ शकतो,पण आपली प्रसिद्धी वाटणारी प्रकरणांची उदाहरणे अभावानेच मिळतील. प्रसिद्धीसाठी काम करणं चुकीचं नाही,पण साधन आणि साध्य यात पावित्र्य असायला हवं. कथाकार- नाटककार चेखव म्हणतात की, तुम्ही खुशाल प्रसिद्धीचे शिखर गाठा, पण एवढे लक्षात ठेवा की, हे जे काही मिळालं आहे, ते तुम्ही दुसर्याला मदत केल्यानं मिळालं आहे.चेखव असंही सांगतात की, जर तुम्ही खरोखरच दुसर्यांसाठी काम केलं आहे, तर विश्वास ठेवा- ते तुम्हाला प्रसिद्ध बनवल्याशिवाय सोडणार नाहीत.चेखव यांच्या गोष्टी अशा लोकांसाठी मार्गदर्शक आहेत, जे प्रसिद्धीसाठी आरोप-प्रत्याराोप करून गदारोळ उडवतात. अशा माणसांची ही प्रसिद्धी तत्कालीन असते. हा प्रसिद्धी मिळवण्याचा दुसरा प्रकार आहे. मात्र जे येणार्या पिढीला दिशा,मार्ग दाखवण्याचे काम करतात, जे मैलाचा दगड ठरतात, अशी माणसं अशा मार्गाचा अवलंब करीत नाहीत.



No comments:

Post a Comment