आजच्या तरुणपिढीला गांजा बरबाद करते आहे. आज दुष्काळी
भागासह सधन म्हणजेच ऊसक्षेत्रातदेखील गांजा मोठ्या प्रमाणात पिकवला जात असून आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे हा गांजा चक्क वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये मिळू लागला आहे.
देशी आणि विदेशी दारू जशी वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये कंपन्या काढू लागल्या
आहेत, तसेच गांजादेखील वेगवेगळा फ्लेवर मारून चोरट्या मार्गाने
बाजारात येऊ लागला आहे. त्यातच हुक्का पार्टी करण्याचे फॅड आजच्या
तरुणाईमध्ये आलेली आहे. त्यामुळे अशा नवनव्या नशाखोरीमुळे तरुण
वर्ग बरबाद होत चालला आहे. त्याला सावरण्याची गरज असून यासाठी
शासनाने कडक कायदे करण्याबरोबरच कायद्याची अंमलबजावणी करणार्यांनी डोळ्यांत तेल घालून अशा घटनांना आळा घालण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज
आहे. आजच्या तरुणांमध्ये व्यसनाधिनता प्रचंड वाढली असून यामुळे
अनेकांना अकाली वृद्धत्व आणि कायमस्वरुपी पाठी लागणारे आजार चिकटू लागले आहेत.
हा भारतासारख्या तरुण देशाला घातक आणि मारक आहे.
अलिकडच्या
वर्षभरात विशेषत: मुंबई पोलिसांनी आणि अंमली पदार्थ विरोधी पथकाने सर्वाधिक
अंमली पदार्थांमध्ये गांजा मोठ्या प्रमाणात जप्त केला आहे. त्यांनी
दोन कोटींपेक्षा अधिक किमतीचा सुमारे एक हजार साठ किलो गांजा हस्तगत करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे हे प्रमाण गेल्यावर्षीच्या तुलनेत दुप्पट आहे. यावरून गांजाची मागणी अधिक असल्याचे दिसतेच पण तो पिकतोही तितक्याच प्रमाणात
असे स्पष्ट दिसते. ऊसात, ज्वारी,मक्याच्या पिकांत गांजा सहजरित्या पिकवता येतो, हे स्पष्ट
झाले आहे. दुष्काळी भागात तर गांजा लागवडीचे लोण मोठ्या प्रमाणात
आहे. इतर अंमली पदार्थांपेक्षा सर्वात स्वस्त आणि सहज उपलब्ध
होणारा गांजा कमी मेहनतीत चांगली कमाई करता येते, याचे भान आल्याने
अनेक लोक या पिकाच्या लागवडीसाठी प्रयत्न करताना दिसत आहेत.
शहरी भागासह
ग्रामीण भागात हुक्का पार्ट्या होत आहेत. यासाठी खास पार्लरची
व्यवस्था होत आहे. देवदेवता चिलीम ओढायचे असे सांगून हुक्का ओढण्यात
काही गैर नाही, असे पटवून दिले जात असल्याने तरुणवर्ग हुक्क्याकडे
वळला असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. हुक्क्याच्या फ्लेवरची चटक
लागलेल्यांना गांजाच्या व्यसनाकडे वळवले जात आहे. हुक्क्यामध्ये
अनेक फ्लेवर उपलब्ध असतात. ऑरेंज, पायनापल,
पल, मिंट, चॉकलेट असे अनेक
फ्लेवर असून सोशल मीडियावरून आता गांजामध्ये हेच फ्लेवर उपलब्ध करून देण्याची मागणी
होऊ लागली आहे. काही प्रकरणे अमली पदार्थविरोधी पथकाच्या निदर्शनास
आली असून त्यादृष्टीने तपास सुरू आहे. अनेक पालक हे प्रकार पोलिसांच्या
निदर्शनास आणून देत असून गांजाचे व्यसन करताना आढळल्यास कारवाईचा बडगा उगारण्यात येईल,
असा इशारा पोलिसांनी दिला आहे. सिगारेटपासून व्यसनाधीन
झालेली तरुण मुले पुढे हुक्का आणि त्यापुढे गांजाच्या आहारी जातात. नैसर्गिक आणि काहीच केमिकल नसल्याने शरीराला अपायकारक नाही, असेही त्यांच्या मनावर बिंबविण्यात येते. त्यामुळे साहजिकच
नशा करणार्यांमध्ये गांजा घेणार्यांचे
प्रमाण अधिक आहे.
या जीवघेण्या
व्यसनामुळे पालक चिंतेत असून याआधी हुक्का घेतलेल्यांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले
आहे. अमली पदार्थविरोधी पथक आणि मुंबई पोलिसांनी वर्षभरात
केलेली कारवाई पाहिली तर गांजाच्या मागणीत कित्येक पटीने वाढ झाल्याचे दिसून येते.
हुक्क्याप्रमाणे गांजाही आता वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये येत असल्याची चर्चा
सोशल मीडियावर सुरू आहे. तशा तक्रारीदेखील पोलिसांकडे येऊ लागल्या
आहेत. नुकत्याच एका कारवाईमध्ये अमली पदार्थविरोधी पथकाने मँगो
फ्लेवर गांजा हस्तगत केला होता.उद्याचे भविष्य असलेल्या आजच्या
तरुणांना या व्यसनापासून परावृत्त करण्याची गरज आहे. यासाठी विशेष
प्रयत्नांची गरज आहे. तरुणांचा चांगल्या कामात, उपक्रमात मन गुंतवणे आवश्यक असून यासाठी ग्रामीण स्तरापासून वरपर्यंत विशेष
मोहिम उघडण्याची आवश्यकता असून पालकांनीदेखील याबाबतीत जागृत राहिले पाहिजे.
चुकीचे काही घडत असेल तर त्याची माहिती तात्काळ पोलिसांना द्यायला हवी.शाळा-महाविद्यालयांमध्ये तरुणांच्या कलागुणांना अधिक
प्रमाणात वाव मिळावा,यासाठीही प्रयत्न होणे गरजेचे आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे,जत
मस्त सर
ReplyDeleteसर माझा ही ब्लॉगर आहे मला तुमची मदत पाहिजे ब्लॉग विषयी
ReplyDelete