“काका, दोन रुपये द्या” तो पोरगा प्रतापसमोर उभा राहून उजवा
हात पसरत म्हणाला. प्रताप पंचायत समितीच्या शिक्षण विभागात लिपिक
होता. ऑफिसबाहेरच्या गाड्यावर चहा प्यायला आला होता.
त्या पोराला रागावत प्रताप ओरडला, “गाढवा, लाज नाही वाटत,
भीक मागायला? ”
तो पोरगा म्हणाला, “ द्या ना साहेब. देव तुमचं भलं करेल! तुमच्या कमाईत देव आणखी भर घालेल. ”
प्रतापने त्याला पुन्हा झिडकारलं. “चल, निघ येथून. काही तरी काम करून खा जा. ”
पोराने त्याला उलटे उत्तर दिले, “ तुम्हीसुद्धा भिकारीच आहात की! ”
हे ऐकून प्रतापचं भलतंच पित्त खवळलं. त्याच्यावर जोरात ओरडून म्हाणाला, “ गाढवा, म्हणतोयस काय तू? मी
तुला काय भिकारी दिसतो का? ”
“ हो, तुम्ही लाच मागता. हीसुद्धा भीकच आहे की! पगार असतानाही भीक मागता! ”
पोरगं त्याला काय म्हणायचं आहे, ते म्हणून गेलं.पण प्रतापचं डोकं
भडकवून गेलं. त्याला प्रचंड राग आला,पण
त्याने तो गिळला.त्या पोराने बरोबर त्याच्या वर्मावर बोट ठेवलं
होतं. लाच मागणं म्हणजे भीक मागण्यासारखचं आहे. तो लाच घेतल्याशिवाय फाईलीला साधा हातही लावत नव्हता.
ते पोरगं
अजून तिथेच होतं. आजूबाजूला माणसं होती. तो पोरगा त्याला आणखी काही म्हणून लाज काढेल, या भितीने
प्रताप पाय आपटतच आपल्या ऑफिसच्या दिशेने निघाला. पण आपल्या टेबलाजवळ
बसल्यावरही त्याच्या कानात त्या पोराचे शब्दच आदळत होते आणि मनाला वेदना देत होते.-
No comments:
Post a Comment