भारतीय सिनेमाचा एक स्तंभ असलेल्या जुबैदाचे नाव आजच्या पिढीला ठाऊकही नसेल. भारतीय सिनेमासृष्टीचा पहिला बोलपट 'आलमआरा'. या चित्रपटातील जुबैदा ही पहिली नायिका होती. आज कटरीना कैफ, प्रियांका चोप्रा, जॅकलीन फर्नांडिस सारख्या रूपवतीप्रमाणेच जुबैदादेखील त्याकाळातील 'मल्लिका' होती. काही निवडक कलाकारांमध्ये तिचं नाव घेतलं जायचं. मूकपट ते बोलपट असा तिचा यशस्वी सिने प्रवास राहिला आहे.जुबैदा ही 1910 मध्ये एका नवाब घराण्यात जन्मली होती. तिची अम्मी बेगम फातिमा त्या काळात जेव्हा चित्रपटात काम करणं म्हणजे घाणेरडं काम म्हटलं जातं होतं, तेव्हा फातिमा यांनी सगळ्या सीमा ओलांडून अभिनय आणि दिग्दर्शन क्षेत्रात उतरल्या होत्या.
मूक पटाच्या त्या काळात त्यांनी 'फातिमा फिल्म कॉर्परेशन' नावाची आपली कंपनी सुरू केली होती आणि आपल्या तिन्ही मुलींना- शहजादी,सुलताना आणि जुबैदा पडद्यावर उतरवण्याची घोषणा केली होती. या तिघी बहिणींमध्ये सर्वात आकर्षक, प्रतिभासंपन्न आणि लोकप्रिय ठरली ती जुबैदा.
केवळ चौदा वर्षांची असतानाच जुबैदाने चित्रपटात प्रवेश केला होता. 1924 मध्ये तिचा पहिला चित्रपट आला 'गुल बकावली'. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटात काम करण्यासाठी तिला त्या काळात खूप मोठी रक्कम मिळाली होती. जुबैदाला पुढेही तिच्या समकालीन महिला कलाकारांपेक्षा सर्वाधिक मानधन मिळत होतं. मूक पटांमध्ये तिचा सर्वाधिक चर्चित राहिलेला चित्रपट म्हणजे 'बलिदान' (सेक्रोफाईस). गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या एका कथेवर आधारित या चित्रपटाची निर्मिती नवल गांधी यांनी केली होती. या चित्रपटात तिची बहीण सुलताना, जाल मर्चंट आणि मास्टर विठ्ठल सारख्या लोकप्रिय कलाकारांनी काम केलं होतं.
आपली निर्मिती कंपनी स्थापन केल्यानंतर फातिमा यांनी चार वर्षांत आठ मूक चित्रपटांची निर्मिती केली होती. 'बुलबुल-ए-पाकिस्तान', 'चंद्रावली', 'हीर रांझा', 'नशीब की देवी', 'कनकतारा, 'शकुंतला' आणि 'वंडरफूल प्रिन्स' या सगळ्या चित्रपटांमध्ये जुबैदा हिने तिची मोठी बहीण शहजादी सोबत काम केलं होतं. जुबैदाने एकूण 36 मूक पटात अभिनय केला आहे.
जुबैदा सर्वाधिक चर्चेत आली ती तिच्या पहिल्या बोलपटामुळे. इंपिरियल फिल्म कंपनीचे संस्थापक आर्देशिर इरानी यांनी ज्यावेळेला 'आलमआरा' या पहिल्या बोलपटाची निर्मिती करण्याचे ठरवले तेव्हा त्यांच्या डोक्यात कुरळ्या केसांची आणि नृत्य-गायन करणाऱ्या जुबैदाशिवाय दुसरे कुणाचे नाव नव्हतेच. 'आलमआरा' ची नायिका बनवून त्यांनी जुबैदाला अजरामर करून टाकले. 'आलमआरा' हा वेशभूषा प्रधान चित्रपट 14 मार्च 1931 रोजी मुंबईच्या मॅजेस्टिक सिनेमामध्ये पहिल्यांदा प्रदर्शित झाला. भारतातल्या पहिल्या बोलणाऱ्या, नाचणाऱ्या आणि गाणाऱ्या अशा जादूमय चित्रपटाला पाहण्याकरता प्रेक्षक अक्षरशः तुटून पडले. पहिला शो सायंकाळी तीन वाजता होता,पण प्रेक्षक सकाळपासूनच या सिनेमा हॉलसमोर गर्दी करून होते. इतकी प्रचंड गर्दी झाली होती की, शेवटी गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आले. पहिल्या शोची एक एक तिकिटे पन्नास पन्नास रुपयांना विकली गेली. आणि इथूनच तिकिटांच्या काळ्या बाजाराला सुरुवात झाली. पहिल्या बोलपटाच्या तिकिटांची काळ्या बाजाराने होण्याची ही नोंद आपल्याला घ्यावी लागणार आहे. 'आलमआरा' चित्रपटाची कथा एका :कंठहार'वर आधारित होती. ही कथा त्याकाळात प्रसिध्द नाटककार जोसेफ डेविड यांनी लिहिली होती. जुबैदाशिवाय या चित्रपटात मास्टर विठ्ठल, जिल्लो बाई, पृथ्वीराज कपूर, डब्ल्यू. एम.खान आणि जगदीश शेठी यांनी काम केले होते. मास्टर विठ्ठल यांना या चित्रपटात काम करण्यासाठी एक हजार रुपये मासिक वेतन मिळत होते. एकोणात चाळीस हजार रुपयांचे बजेट असलेल्या या चित्रपटात काम करण्यासाठी जुबैदाला मात्र दीड हजार मासिक वेतन मिळत होते. शिवाय इतर कामाचे वेगळे पैसे मिळत होते.
नायिकाप्रधान असलेल्या या चित्रपटातील जुबैदाच्या कामाचे कौतुक झाले. या चित्रपटाचे वैशिष्ट्य होतं ते म्हणजे संगीत. जुबैदाने गायलेले ' बदला दिलाए या रब तू सीतमगरों से...' हे गाणे ऐकून प्रेक्षक तिचे दिवाने बनले. प्रेक्षकांच्या मागणीनुसार जुबैदाने सुरुवातीला आणि मध्यंतरामध्ये पडद्यासमोर नृत्यही केले.
1931 मध्येच सागर मूवीटोनच्या 'रोमॅंटिक प्रिन्स- मेरी जान' या पहिल्या बोलपटात जुबैदा मास्टर विठ्ठलसोबत पडद्यावर आली. या चित्रपटात तिच्या भावाची भूमिका साकार केली होती, ती पुढे नावाजलेल्या महान निर्मिता आणि दिग्दर्शक मेहबूब खान यांनी. अभिनय, नृत्य आणि गायन क्षेत्रात लिलया वावरणाऱ्या जुबैदाने बोलपटाच्या पहिल्या चार वर्षांत अक्षरशः तिने या क्षेत्रात महाराणीसारखे राज्य केले. बंजारन मुलीची भूमिका असो किंवा कट्टर मुस्लिम मुलीची किंवा हिंदू देवीची ,जुबैदाने आपली अभिनयकुशलता सिद्ध केली. 1931 मध्येच प्रदर्शित झालेल्या 'वीर अभिमन्यू' चित्रपटात तिच्यासोबत काम केलेल्या जाल मर्चंटबरोबर तिची पुढे जोडी जमली. त्यांची ही जोडी पुढे अनेक चित्रपटात लोकप्रिय झाली. 'वीर अभिमन्यू' मध्ये जुबैदाने उत्तराची भूमिका साकारली होती. जुबैदा 'सुभद्रा हरण' मध्ये सुभद्रा बनली आणि 1933 मध्ये आलेल्या सागर मूवीटोन च्या 'महाभारत' चित्रपटामध्ये द्रौपदी बनली. त्यावेळी यश हाच पर्याय असलेल्या या जोडीने 'खातून', 'माँ', 'औरत की जिंदगानी', 'किसका प्यार' आदी चित्रपट केले.
1932 मध्ये सागर मूवीटोनचा संस्मरणीय चित्रपट आला तो म्हणजे 'जरीना'. एजरा मीर द्वारा दिग्दर्शित चित्रपटात तिने एका बंजारन मुलीची भूमिका केली जोती. ही बंजारन मुलगी आणि एका टांगेवाल्याची दुःखद प्रेमकथा होती. भारतीय कथानकावर आधारित असलेल्या या चित्रपटाचे वातावरण मात्र पूर्णतः अभारतीय होते. एजरा मीर यांनी या चित्रपटात चुंबन दृश्याचा वापर अनेकदा केला होता. शिवाय जुबैदाने घातलेल्या वस्त्रांमुळेदेखील त्यावेळी मोठी खळबळ उडाली जोती.
1933 मध्ये जुबैदा महालक्ष्मी सिनेटोन मध्ये गेली. इथे तिची जोडी शाहू मोडकसोबत सुपरहिट ठरली. 'नंद के लाला' चित्रपटात जुबैदाने राधाची भूमिका साकारली. आणि 'मुरलीवाले तुझको लाखों प्रणाम...' हे गणेदेखील गायले. हे गाणे इतके लोकप्रिय झाले की ते त्याकाळात गल्लीबोळात वाजत होते. विशेष आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या कर्मठ काळात एका मुस्लीम मुलीने अशी भूमिका करणं आणि गीत गाणं याला अजिबात विरोध झाला नाही. मुन्शी प्रेमचंद यांच्या कादंबरीवर आधारित 'सेवासदन' या नावाने बनलेल्या चित्रपटात जुबैदाने शाहू मोडक यांच्यासोबत प्रमुख भूमिका केली. 1932 मध्ये रमणिक देसाई दिग्दर्शित आणि तब्बल 19 गाणी असलेल्या 'मीराबाई' चित्रपटात जुबैदाने मीराची भूमिका साकारली होती.
1935 मध्ये जुबैदा आणि जाल मर्चंट यांची जोडी असलेला चित्रपट म्हणजे 'आजकल'. रामशंकर चौधरी यांचा हा चित्रपट चालला नाही. यानंतर जुबैदाचित्रपटातून गायब झाली. तिने राजा धनराजगिर यांच्याशी विवाह करून चित्रपटांना रामराम ठोकला. जवळपास20 बोलपटांमध्ये तिने काम केले.
1981 मध्ये भारतीय चित्रपटाच्या सुवर्णजयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात जुबैदाला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याहस्ते गौरव करण्यात आला होता. तेव्हा ती व्हीलचेअरवर व्यासपीठावर आली होती. आपल्या शेवटच्या काळात ती आजारी होती. 1988 मध्ये पतीच्या निधनानंतर ती विरह सहन करू शकली नाही. 20 सप्टेंबर1988 रोजी तिचे निधन झाले.-मच्छिंद्र ऐनापुरे

No comments:
Post a Comment