Saturday, October 28, 2017

रोबोट: मानवाचा मित्र

      जपान सातत्याने घटणार्या जन्मदर आणि वयोवृद्ध लोकांच्या समस्येशी सामना करताना दिसत आहे. सध्याच्या घडीला 65 वर्षांपेक्षा अधिक वयाची लोकसंख्या जवळपास एक चतुर्थांश आहे. वृद्धापकाळातील जगणं तसं अनेक समस्यांनी घेरलेलं असतं. या कालावधीत त्यांना कुणाच्या तरी आधाराची गरज असते.हाच मोठा प्रश्न सध्या जपानकडे आहे.त्यांचे जीवन सुस्थितीत जाऊ दे, शेवटपर्यंत त्यांना सुखा-समाधानाचे जीवन जगता यावे,यासाठी जपान प्रयत्नशील आहे. त्यासाठी त्यांनी रोबोटिक टेक्नॉलॉजीचा आधार घेण्याचे ठरवले आहे. मात्र हे तंत्रज्ञान कितपत सहाय्यभूत ठरेल, हे प्रत्यक्षच पाहावे लागणार आहे.

     इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशनच्या अंदाजानुसार 2019 सालापर्यंत जगभरात रोबोटिक किंवा या तंत्रज्ञानाशी जोडलेल्या गेलेल्या सेवांवर 135.4 अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत खर्च केला जाईल.रोबोटचा सर्वात जास्त वापर आरोग्य सेवा आणि प्रोसेस मॅन्युफॅक्चरिंग उद्योगांमध्ये होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहेखरे तर आज रोबोट कित्येक कामाच्या क्षेत्रात मानवाच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप करत आहे,पण आतादेखील अशा क्षेत्रांची कमतरता नाहीजिथल्या परिस्थितीनुसार मानवाच्या तात्काळ निर्णय घेण्याच्या क्षमतांचा विकल्प शोधणे सोपे नाहीकित्येक क्षेत्रांत मानवाचा उन्नत दृष्टीकोन आणि रोबोट हे दोन्ही एकत्र येऊन काम करू लागले तर मानवाची प्रगतीच आहेयाकडे लोकांचे अधिक लक्ष आहे.
     जगातला पहिला सायबोर्ग (सायबरनेटिक ऑर्गेनिज्मचे संक्षिप्त नावटाइप रोबोट हायब्रिड एसिस्टीव लिंब (एचएएलयाचे सर्वात मोठे उदाहरण आहे.जपानच्या सायबरडाइन कंपनीद्वारा बनवण्यात आलेला हा रोबोट सूट घालणार्या माणसाची शारीरिक क्षमता वाढवतोवास्तविकज्यावेळेला आपल्याला काही करायचं आहेजसं कीचालणे.तेव्हा आपण विचार करतो कीआपल्याला चालायचं आहेयासाठी जे आवश्यक संकेत आपल्या मेंदूतून त्या पेशींपर्यंत पोहचतात,ज्यांना ते काम करायचं आहे.हे संकेत मज्जातंतूच्या माध्यमातून पोहचतातया प्रक्रियेत फारच कमी संकेत आपल्या त्वचेवरही उमटतातहा रोबोट सूट हेच संकेत पकडतो आणि आपली ऊर्जा हे काम करण्यासाठी लावतो.या रोबोटिक सूटचा वापर बर्याच गोष्टींमध्ये किंवा परिस्थितींमध्ये केला गेला आहे.याचा एक प्रकार आहे,सिंगल जॉइंट,जो हात आणि गुडघ्याच्या सांध्याच्या रुपात केला जातोशिवाय अंथरुणावर पडलेल्या माणसाठीदेखील उपयोगाचा ठरला आहेत्याचबरोबर याचा होल बॉडी सूट आपत्कालीन बचाव आणि मदत कार्यासाठीदेखील लाभाचा ठरला आहे.
     2011 च्या विध्वंशकारी भूकंपानंतर जपानमधल्या एका वीज संयंत्रात झालेल्या अणूस्फोट अपघातात रेडिएशनदरम्यान मदतकार्य करणार्या लोकांनी हा सूट परिधान केला होताटोकियोच्या हानेडा विमानतळावर यातलाच लंबर प्रकारचा सूट मजुरांसाठी वापरला जातोअधिक वजन असलेला माल उतरवण्यासाठी याचा उपयोग होतो.
     आज जपान ज्या समस्यांशी लढा देत आहेत्याच समस्यांना आगामी काळात बाकीच्या देशांनादेखील तोंड द्यावे लागणार आहेअशा परिस्थितीत लोकसंख्येच्या या बदलाच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी जपानने जी सुरुवात केली आहेत्याकडे सगळ्यांनीच गंभीरपणे पाहणे,गरजेचे आहेभारतासारख्या देशाला तर खासकरून या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे आहेआपल्या देशातही वृद्धांची लोकसंख्या पुढच्या काही दशकात वाढणार आहेयादृष्टीने पेपर रोबोट उल्लेखनीय आहेहा रोबोट घरीच वृद्धांचा सांभाळ करतो आणि युवकांबरोबर त्यांचा सुसंगतपणा बसवण्याकामी फारच उपयुक्त सिद्ध होत आहे हा रोबोट सॉफ्टबँक या जपानी कंपनीने तयार केला आहेहा रोबोट वृद्धांची शारीरिक काळजी घेण्याबरोबरच त्यांची भावनात्मक दृष्ट्याही काळजी घेतो.
अलिकडेच सोनी कंपनीने पुन्हा एकदा रोबोटिक व्यवसायात उतरण्याचा निर्णय जाहीर केला आहेआता त्याला 10 वर्षांपेक्षा अधिक वर्षे उलटली आहेत,ज्याला एबो नावाच्या रोबोटचे उत्पादन बंद करूनहा रोबोट दिसायला कुत्र्यासारखा होता.या खेपेलाही अशाच प्रकारचा रोबोट बनवण्याची इच्छा त्यांनी जाहीर केली आहे.हा मानवाचा सांभाळ,पोषणसारख्या नियमित गरजांसाठी उपयुक्त ठरेलअसा त्यांना विश्वास आहे.
     आता रोबोटसोबत राहणं,काही अवघड नाहीइथे कुणाला फसवण्याचाही प्रश्न येत नाहीआज या तंत्रज्ञानामध्ये वेगाने प्रगती होताना दिसत आहेजे लोकांना व्यावहारिक मदत करू शकतेइतिहासात खरे तर तंत्रज्ञानाच्या बदलामुळे कित्येकांना आपल्या नोकर्या गमवाव्या लागल्या आहेत.पण काही गोष्टींना आकार देण्याच्या कामी त्यांनी आपल्याला मदतदेखील केली आहे.त्यामुळे तंत्रज्ञान मानव विकासवाढीशी पुरते गुंतले गेले आहे.मानवाच्यादृष्टीने अशी काही कामं आहेतजे रोबोट करू शकत नाहीतत्यामुळे हा बदल सकारात्मकरित्या घेऊन पुढे जाण्याची गरज आहे.

No comments:

Post a Comment