परवा माझ्या डॉक्टरमित्राकडे
गेलो होतो. खरे ते आमच्या
फॅमिली डॉक्टरसारखेच आहेत.गेली सतरा-अठरा
वर्षे, आमच्या कुटुंबातले सर्वच सदस्य उपचारासाठी त्यांच्याकडेच
जात असतो.आमच्या गप्पा चाललेल्या असताना एक व्यक्ती आपल्या आजारी
मुलाला घेऊन दाखवायला आला. अर्थात आजार सर्दी,खोकला,ताप असाच होता. तपासून झाल्यावर
त्याने डॉक्टरांना विनंती केली की, मुलाला अँटीबायोटिक्स द्या. डॉक्टरांनी खूप सांगण्याचा प्रयत्न केला,पण त्याने आग्रह
धरताना त्याशिवाय मुलगा लवकर बरा होत नाही, असे सांगितले.
नाईलाजाने डॉक्टरांनी अँटीबायोटिक्सची औषधे लिहून दिली. त्यांनी असे काही पेशंट आहेत की, सांगून-समजावूनही अँटीबायोटिक्स औषधे देण्याचा आग्रहच करतात. शेवटी त्यांचा आग्रह मोडता येत नाही, हा त्यांचा व्यावसायिक
अनुभव स्पष्ट केला. रुग्णांना अर्थातच अँटीबायोटिक्स का हवी असतात,
याची आपल्याला कल्पना आहे. त्यांना लवकर बरे व्हायचे
असल्याने वारंवार असा आग्रह रुग्णांकडून डॉक्टरांना केला जातो, मात्र वारंवार अँटीबायोटिक्स घेतल्याने त्याचे धोके आहेत, याबाबत खरे तर मोठ्या प्रमाणात जनजागृतीची आवश्यकता आहे. कारण एका डॉ़क्टराने अँटीबायोटिक्सचा डोस नाही दिला तर दुसरा देणार नाही कशावरून?
त्यामुळे याची जबाबदारी डॉक्टरांवर सोपवण्यापेक्षा जनजागृतीच्या माध्यमातून
अँटीबायोटिक्सचा आग्रह कमी करता येऊ शकतो.
जागतिक आरोग्य
संघटनेनेदेखील याची मोठ्या प्रमाणात दखल घेतली असून यावर्षीचे घोषवाक्यच त्यांनी ङ्ग
अँटीबायोटिक्सचा वापर करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या ङ्ग असा निश्चित केला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांसह सामाजिक क्षेत्रात काम करणार्या संस्थांनी याबाबत अधिक जागरूक राहून अँटीबायोटिक्सच्या अतिसेवनाचे तोटे
लोकांसमोर आणण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. अँटीबायोटिक्स अर्थात
दुधारी तलवारीसारखे असल्याचे म्हटले जाते. त्याची उपयुक्तता जितकी
महत्त्वाची आहे, तितकीच दुष्परिणामही. कुठल्याही
गोष्टीचा अतिरेक जितका वाईट,तितकाच नव्हे त्याहून अधिक तोटा याचा अतिवापराचा
आहे,हे खरे तर समजून घेतले पाहिजे.
मागच्या शतकाच्या
प्रारंभी एका अपघाताच्या घटनेच्यानिमित्ताने डॉ. अलेक्झांडर यांना पेनिसिलीनचा शोध लागला. हा शोध क्रांतिकारक ठरला. यामुळे जंतूमुळे होणारे आजार
पूर्ण बरे होतात, हे दिसून आल्याने जगभरातच या औषधाला मागणी वाढायला
लागली. औषध कंपन्यांनी यावर अधिक लक्षकेंद्रित करून नवनवीन अँटीबायोटिक्स
औषध निर्मितीवर भर दिला. मात्र याचा चांगला फायदा असा झाला की,
जंतूमुळे होणारे क्षय,न्यूमोनिया,मलेरिया,कुष्ठरोग,एड्स यांसारख्या
रोगांवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.विशेष म्हणजे रुग्णाला गरजेनुसार शस्त्रक्रिया करताना जंतूसंसर्गाचा
धोका टाळता येऊ लागला. डॉक्टर आणि रुग्ण यांच्या संरक्षणाला कवच
मिळाले.
मात्र, आता याचा वापर अप्रमाणात वाढला
आहे. लवकर बरे होण्याच्या नावाखाली अनियंत्रित औषधांचा मारा आपलाच
घात करणारा आहे, याची खरे तर कल्पना येण्याची गरज आहे.
या औषधांमुळे आपण जंतूंवर विजय मिळवला असला तरी जंतूदेखील आपल्या अस्तित्वासाठी
प्रयत्नशील असतातच! ते आपल्या गुणसूत्रात सातत्याने बदल करत असतात.
त्यामुळे ते नव्या स्वरुपात आपल्या शरीरावर मारा करत असतात. त्यामुळे आपण जी औषधे वापरतो, त्यांचा परिणाम हळूहळू
होईनासा होतो. शेवटी काय तर ज्या जंतूसाठी आपण त्यांच्यावर प्रभावी
ठरणारी औषधे घेतो,तीच औषधे प्रभावहीन ठरतात.आणि जंतू आपला मारा करतात आणि आपल्या शरीरावर कब्जा करतात. जर ती औषधे कुचकामी ठरत असतील, तर मग आपण फार मोठ्या
धोक्याला सामोरे जाणार असू. आज किरकोळ आजार गंभीर ठरत आहेत,
याला कारणही तेच आहे. विशेष म्हणजे अँटीबायोटिक्सची
आणखी प्रभावी औषध निर्मिती व्हायला वेळ लागणार आहे. अलिकडच्या
काही वर्षात याबाबत अद्याप प्रगती दिसून आलेली नाही. यासाठी संशोधन,
औषधनिर्मितीसाठी मोठी गुंतवणूक अपेक्षित आहे.यासाठी
सर्वच देशांना पुढाकार घ्यावा लागणार आहे.
काही डॉक्टरांच्या
म्हणण्यानुसार अँटीबायोटिक्स औषधे ही विषाणूपासून होणार्या आजारांना उपयुक्त नाहीत.
ती जंतूपासून होणार्या आजारासाठी उपयुक्त आहेत.
डॉक्टरी सल्ल्याने घेतलेली औषधे ही जितक्या कालावधीसाठी घ्यायवयाची आहेत,
तितकी ती घ्यायला हवीत. म्हणजे त्याचा कोर्स पूर्ण
करायला हवा. अँटीबायोटिक्स औषधांचा परिणामच आजारावर होत नसेल
तर आजार वाढून त्यातून पुढे धोके वाढणार आहे. शेवटी मृत्यूशीच
गाठ आहे.त्यामुळे सामान्य औषधाने आजार बरा होत नसेल तरच शेवटच्या
टप्प्यात अँटीबायोटिक्सचा वापर करायला हरकत नाही. कोणत्याही आजाराचा
प्रभाव हा दोन तीन दिवस राहत असतो, याकालावधीत आजार बरा झाला
नाही तर डॉक्टरी सल्ल्याने उपचार घ्यायला हवेत. सध्याच्या घडीला
तर अँटीबायोटिक्स संजिवनी मंत्र आहे, त्याचे महत्त्व आबाधित ठेवणे,ही सगळ्यांचीच जबाबदारी आहे.
No comments:
Post a Comment