म्हटलं जातं की मनुष्य प्राणी
हा चुकांचा पुतळा आहे.त्याच्या हातून चूक होणार नाही तर कुणाच्या हातून होणार? परंतु, चुका
झाल्यानंतर निर्माण झालेली परिस्थिती जो सुधारतो,तोच जीवनात
यश प्राप्त करू शकतो.त्यामुळे चूक झाली म्हणून घाबरू जायचं नाही किंवा हताश
व्हायचं नाही.परिस्थितीला सामोरे जाऊन चूक का झाली, याचा
अभ्यास करायचा, त्याची कारणमीमांसा शोधायची.असे केल्याने
पुन्हा कधी चुका होणार नाहीत.
चुका काही फक्त आपल्याच हातून
होत नाहीत.भल्या भल्या माणसांकडून चुका होत असतात. मात्र त्यातूनच शिकताही
येतं.आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की,बहुतांश यशस्वी प्रॉफेशनल्सकडून
कित्येकदा मोठमोठ्या चुका झाल्या आहेत.मात्र तुमच्यासाठी वाईट गोष्ट ही की ,तुम्हाला या परिस्थितीचा सामना करावा लागेल.जर तुमच्या चुकीमुळे तुम्हाला
कंपनीतून काढून टाकले तर तुम्हाला नवीन नोकरी शोधावी लागेल. शिवाय संबंधित
एम्प्लॉयरला झालेल्या गोष्टी साँगाव्या लागतील. जर तुम्हाला मोठी चूक करूनही
कंपनीतून काढून टाकले नाही तरी तुमची गमावलेली विश्वसनीयता मिळवण्यासाठी तुम्हाला
मोठ्या जोमाने काम करावे लागणार आहे.
चिल होऊ नका
कित्येकदा तुम्ही चुका करता
मात्र आपली प्रतिष्ठा धुळीला मिळेल या भितीने ही गोष्ट तुम्ही कुणाला सांगत
नाही.पण ज्यावेळेला लोकांना तुमची चूक समजते तेव्हा तुम्ही यात मोठं असं काही घडलं
नाही, असा आभिर्भाव
आणता आणि तसे वागता. चुकीचे कारण तुम्हाला अगोदरच माहीत होते. यामुळे तुमच्या
कलीग्जला वाटते की, तुम्हाला परिणामांची काळजी नाही आणि
तुम्ही सच्चा माणूस नाही.तुमचा टीम लिडर निर्णय घेईल की ,तुमच्यात
निर्णय क्षमता नाही आणि तुम्ही विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नाही.तथ्यांना
दुर्लक्ष करून तुम्ही चूक सुधारण्याची संधी गमावून बसता.
पाय जमिनीवर हवेत
विचार करा की , सगळ्यात वाईट परिस्थिती काय असणार
आहे.जर तुम्ही तुमच्या क्लायंटला चुकीचा ई मेल गेला असेल तर त्यामु़ळे कंपनीला
मोठे नुकसान होऊ शकते का ? तुमच्या करिअरवर काय परिणाम होणार
आहे? तुमच्या प्रतिष्ठा किंवा नोकरीवर परिणाम होणार
आहे का?एकदा का तुम्ही सगळ्यात वाईट परिस्थितीसाठी तयार होता
तेव्हा तुम्ही प्रभाव कमी करण्याच्या दिशेने काम करू शकता.यामुळे तुम्ही कंपनी आणि
स्वतःची रिकवरी करण्यासाठी काम करू शकता.
हायपर ऍक्ट करू नका
परिस्थितीला नाटकीय स्वरूपात
घेऊ नका.सारखे सारखे 'सॉरी' बोलू नका.ओवर ऍक्ट टाळा. आपल्या चूकीला बरोबर समजून वारंवार क्षमा मागू
नका.तुमच्यासाठी हे तुम्हाला प्रायश्चित असेल पण त्यामुळे समोरच्याला त्याचा
वेळ वाया घालवण्यासारखे आहे.तुम्हाला तुमच्या कंपनीच्या कामावर फोकस करायला हवा
आणि आपल्या गोष्टींमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करायला हवा.बॉसच्या समोर दाखवा
की, तुम्ही दडपण योग्य प्रकारे हाताळू शकता.
स्वतःला माफ करा
चूक झाल्यावर काही काळ वाईट
वाटणं साहजिक आहे. पण तुम्ही स्वतःला या परिस्थितीशी बांधून घेऊ नका.जर तुम्ही
टीमसोबत मिळून एखाद्या प्रॉजेक्टवर काम करत असाल तर फ्रेश डेड्लाईनवर फोकस करा.तुम्हाला
रोज आत्मग्लानीची आवश्यकता नाही.काही काळ चिंतन केल्यानंतर पुढे जा.स्वतःला
चुकीसाठी माफ करा.कामावर लक्ष द्या.तुमचे सकारात्मक योगदान मनात निर्माण होणारे
दुःख दूर करेल.
शिकण्याची संधी
आपल्या चूकीला शिकण्याची संधी
समजा.एकदा का तुम्ही तात्काळ निर्णय घाल, तेव्हा तुम्ही रात्री शांतपणे झोप घेऊ शकाल.सुरवातीच्या
चुकीनंतर सुधारणा करा आणि अहॉधून काढा की कोणत्या एटीट्यूड,विचार,संवाद आणि ऍक्शनच्या कारणामुळे चूक झाली आहे.मोठ्या चुका करिअरमध्ये मोठा
बदल आणू शकतो.
चुका करण्यापासून कसे दूर राहाल
अधिक मेहनत घ्या
ज्यावेळेला चुका होतात तेव्हा
अधिक कष्ट करण्याची तयारी ठेवा.कामाच्या ठिकाणी सकाळी लवकर जा.कंपनीच्या
अपेक्षेपेक्षा अधिक आऊटपुट द्या.असे काम करा की , जे इतर दूसरे करू इच्छित नाही.टार्गेट पूर्ण करण्यासाठी अधिक
काम करा.शानदार क्वालिटीच्या कामासाठी प्रयत्न करा.आपली टीम,मॅनेंजर,
आणि क्लायंटकडून आऊटपुट आणि डेडलाइनशी संबंधितकेलेली वायदे पूर्ण
करा.आपली ओळख अशा माणसाची बनवा की जो समस्या निर्माण झाली तर मोठी मेहनत करतो.
No comments:
Post a Comment