Monday, October 23, 2017

(करिअर वाटा) समुद्राच्या तळाशी शोधा तुमचे भविष्य

     जर तुम्हाला समुद्र आवडत असेल, त्यातल्या जीव-जंतू,प्राण्यांविषयी, समुद्राच्या तळाविषयी माहिती जाणून घेण्याची उत्कट इच्छा असेल,उत्सुकता असेल तर तुमच्यात मरीन बायोलॉजिस्ट बनण्याचे सगळे गुण आहेत, असे म्हणायला हरकत नाही.मरीन बायोलॉजिस्ट समुद्राच्या तळाची माहिती गोळा करतो, पण याचे कार्यक्षेत्र समुद्राची व्यापकता शोधणे आहे. यात समुद्री जीवांचे आयुष्य जवळून जाणून घेणं, रोप आणि मायक्रो ऑर्गेनिज्मच्या विविध प्रकारच्या जातींची ओळख करून घेणे,तिथे वाढत असलेल्या आजारांचा शोध घेणे, समुद्री जिवांचे आचरण आणि व्यवहार जाणून घेणे, त्याचबरोबर मानवाच्या व्यवहारांमुळे समुद्री जीवनावर परिणाम होतो, समुद्रातील नवीन प्रजातींचा शोध घेणे,या शोधांना सायंटिफिक जर्नलमध्ये प्रसिद्धी देणे,समुद्रातील नमुने घेणे, टेस्टिंग आणि समुद्री जनसंख्येची माहिती गोळा करणे आदींचा समावेश आहे.
     मरीन बायोलॉजिस्ट अनेक प्रकारच्या पदांवर काम करतात, जसे- वाइल्ड बायोलॉजिस्ट,जुलोजिस्ट, फिश आणि वाइल्डलाइफ बायोलॉजिस्ट, फिशरीज बायोलॉजिस्ट,एक्वेटिक बायोलॉजिस्ट, कंजर्वेशन बायोलॉजिस्ट आणि बायोलॉजिस्ट टेक्निशियन. काही मरीन बायोलॉजिस्ट या क्षेत्रात प्राविण्य मिळवतात. यामुळे ते बायोटेक कंपन्यांना समुद्रातील जीव-जंतूंची माहिती उपलब्ध करून देतात. यामुळे ते इंडस्ट्रियल प्रॉसेसमध्ये कारागिर सिद्ध होतात.
      मरीन बायोलॉजिस्टचे क्षेत्र फारच मोठे आणि विस्तृत आहे. यात समुद्रातील खोली ते यातील जीव-जंतूंच्याबाबतीत अभ्यास करावा लागतो. भारतात आता या क्षेत्रात प्रगतीला प्रारंभ झाला आहे.आज देशात असे काही तरुण आहेत, जे या रोमांचकारी करिअरचा स्वीकार करत नाहीत तर यात जोरदार यशदेखील मिळवत आहेत. समुद्राच्याखाली जीव, तेल आणि गॅसची माहिती मिळवण्यासाठीदेखील मरीन बायोलॉजिस्टची मदत घेतली जात आहे. सध्याच्या काळात काही देशी-विदेशी कंपन्या मरीन बायोलॉजिस्टची सेवा घेत आहेत.
     मरीन बायोलॉजिस्ट बनण्यासाठी कमीत कमी सायन्समध्ये ग्रॅज्युएट ( स्पेशिलायजेशन इन मरीन बायोलॉजी) असणं आवश्यक आहे. काही शिक्षण संस्था या विषयात पदवी शिक्षण देत आहेत. शोध-संशोधन आणि विद्यापीठांमध्ये  बायोलॉजीमध्ये पीएचडी मान्य करण्यात आली आहे.मरीन बायोलॉजी शिक्षणात इकोलॉजी,एनाटोमी, फिजियालॉजी, बायोकेमेस्ट्री, पॅथॉलॉजी,रिप्रॉडक्शन अँड डेवलपमेंट, ओशियन फार्मिंग,पॉल्यूशन बायोलॉजी, एनर्जी रिसोर्सेज अॅन्ड कंजर्वेशन आदींचा समावेश आहे. परदेशात काही मरीन बायोलॉजिस्ट लोकांना मोठ्या एक्वेरियम आणि थीम पार्कांमध्ये नोकर्या दिल्या जात आहेत. पर्यावरणाचे नुकसान होऊ नये, यासाठी समुद्रकाठाला पर्यावरण देखभालीसाठीदेखील परदेशात काही हॉटेलमध्ये मरीन बायोलॉजिस्ट यांची सेवा घेतली जात आहे.भारतात दक्षिण राज्यांमध्ये याबाबतीत मोहिम सुरू झाली आहे,कारण देशाचा समुद्री सीमाभाग बहुतांश या राज्यांमध्ये आहे.
     समुद्रातील जीव-जंतूंच्या अभ्यासात आवड असण्याबरोबरच एका मरीन बायोलॉजिस्टमध्ये काही खास गुण असायला हवेत. विचार करण्याची दुरगामी शक्ती,हुशारी, कॉम्प्युटरमध्ये प्राविण्यता, शोध-संशोधन करण्याची वृत्ती,लिहिण्या-बोलण्याची आवड आणि टीमसोबत काम करण्याची योग्यता असायला हवी.मरीन बायोलॉजिस्टला बहुतांश वेळी घराबाहेरच शोध-संशोधनाच्यानिमित्ताने घालवावे लागणार, हे उघड आहे. पाण्यात बुडालेल्या जहाजांचा शोध घेणे,समुद्री जीव-जंतूंवर बारीक नजर ठेवणे, नमुने गोळा करणे आदी गोष्टींचा समावेश असल्याने बहुतांश वेळ हा घराबाहेरच जाणार आहे. यांना सरकारी आणि कंजर्वेशन एजन्सीज,एनवायरमेंट लॅबोरेटरीज, मॅरीन लॅबोरेटरीज, वॉटर इंडस्ट्री, कोस्टल अर्थॉरिटिज, फिशरीज टुरिझ्ममध्ये काम करण्याबरोबरच लॅब टेक्नीशियनची नोकरी, विद्यापीठात ओशियनोग्राफिक्स लॅबोरेटरीज प्रायवेट सेक्टरमध्येदेखील काम करता येते.एवढेच नव्हे तर प्राणी संग्रहालय, म्युझियम, स्कूल सायन्स टीचर, विद्यापीठ प्राध्यापक पेशासुद्धा स्वीकारता येतो.त्याचबरोबर फ्रिलान्स कामाच्या सुविधादेखील उपलब्ध आहेत. प्रारंभी 15 ते 20 हजार रुपये वेतन मिळू शकते.नंतर त्यात वाढ होत जाते.
प्रमुख शिक्षण संस्था
1)   डिपार्टमेंट ऑफ कोस्टल डिजास्टर मॅनेजमेंट, पुडुचेरी युनिवर्सिटी,पोर्ट ब्लेयर
2)   वीर नर्मदा साऊथ गुजरात युनिवर्सिटी, सुरत(गुजरात)
3)   अन्नामलाई युनिवर्सिटी, अन्नामलाईनगर (तामिळनाडू)
4)   कोचीन युनिवर्सिटी ऑफ सायन्स एंड टेक्नॉलॉजी, कोच्ची(केरळ)
5)   डिपार्टमेंट ऑफ फिजिकल ओशियनोग्राफी,कोच्ची
6)   पुडुचेरी युनिवर्सिटी,पुडुचेरी  

No comments:

Post a Comment