माणसाला यशासाठी
संघर्ष करावा लागतो. कष्ट करावे लागतात.मेहनतीशिवाय फळ नाही, असे उगीच म्हणत नाहीत. आणि हे यश मिळाल्यावर जो आनंद
होतो,तो अवर्णनीय असतो.यश मिळवणं किंवा
जिंकणं सगळ्यांना चांगलं वाटतं. आणि महत्त्वाचे म्हणजे जितका
सामना चुरशीचा,तितका आनंदही मोठा असतो.असे
असतानादेखील आपल्याला आव्हान फारसं कठीण नको असतं.सोपी लढत व्हावी,
असे आपल्याला वाटत असते. कठीण सामन्यापासून बचावासाठी
पराभवाची भिती आपल्याला उकसावत असते.इथे राफेल नाडाल,जो टेनीस जगतातला महान खेळाडू आहे, त्याने जे काही म्हटले
आहे, त्याकडे अधिक लक्ष द्यायला हवे. तो
एकदा म्हणाला होता की,त्याला असा सामना जिंकायला मजा येते,
जो पाचव्या सेटपर्यंत ताणला गेला आहे.म्हणजे प्रतिस्पर्धीदेखील
तसा तगडा पाहिजे,त्यामुळे सामना तितकाच आनंद देतो.

मानसशास्त्रज्ञ
म्हणतात की, महिला शारीरिक आणि मानसिक संघर्ष
करून सृजनाची महान प्रक्रिया पूर्ण करते, त्यामुळेच ती पुरुषाच्या
तुलनेत अधिक समाधानी आणि सुखी असते. मग असा एक प्रश्न निर्माण होतो की, आज जे दु:खी
आहेत,त्याच्या मागे संघर्षापासून दूर पळणे, हा तर नसेल ना!
No comments:
Post a Comment