Saturday, December 8, 2018

यशासाठी व्हावी योग्य सुरुवात


   
 असं म्हणतात की, कोणत्याही कामाची सुरुवात चांगली असेल तर त्याचा शेवटदेखील चांगला होतो.जर तुम्ही दिवसाची सुरुवातसुद्धा चांगल्या प्रकारे कराल,तर तुम्हाला यश मिळण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे दिवसाची सुरुवात कशी करावी म्हणजे आपल्याला त्याचा लाभ मिळेल.हे आपण इथे पाहणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला यश मिळवायचे असेल तर आपल्या जीवनात काही ना काही बदल करणं आवश्यक आहे. सगळ्यात सोपा उपाय म्हणजे तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये बदल करायला हवा. सकाळच्या रुटीन वर्कवर अधिक फोकस द्यायला हवा. यात बदल करून तुम्ही यशाच्या शिखरापर्यंत सहज पोहचू शकता. किंवा तुम्हाला यशाचा मार्ग मिळू शकेल. यात तुम्ही रोज करणार्या कार्यांची संख्या वाढवू शकता. सकाळच्यावेळी महत्त्वाची अर्थात गरजेची कामे पूर्ण करावीत. त्यामुळे तुम्हाला नंतरच्या काळात खूप वेळ मिळतो. आणि हा वेळ उपयोगाच्या कामासाठी वापर करू शकता.

सकाळच्या कामाची लिस्ट बनवा
तुम्ही कदाचित तुमच्या मुलांना सकाळचा वेळ वाया घालवत असल्याबद्दल रागावत असाल. मात्र तुम्ही स्वत: हा वेळ वाया घालवत असाल. सकाळचा खूप सारा वेळ वायफट कामांसाठी खर्ची पडतो. खरे तर सकाळचा वेळ फक्त आवश्यक त्या कामासाठी खर्च करायला हवा. त्यावरच अधिक लक्ष केंद्रित करायला हवा. यासाठी सकाळच्या कामांची लिस्ट काढावी. अनावश्यक कामांना या यादीत स्थान देऊ नये. सकाळची वेळ महत्त्वाच्या कामात घालवल्यास दिवसभर कोणतेही टेन्शन तुम्हाला राहणार नाही आणि दिवसभर तुम्ही फ्रेश राहाल.
स्लीप हायजीन मेंटेन करा
कदाचित तुम्ही परफेक्ट स्लीप पॅटर्न फॉलो करत असाल., जसं की, रात्री स्मार्टफोनचा वापर करत नसाल. आरामदायी गादीवर झोपत असाल, लवकर झोपत असाल. पण कित्येकदा मनात चाललेल्या विचारांमुळे किंवा चिंता करण्याने झोप येत नाही. यापासून स्वत:ला वाचवायचे असेल तर अंथरुणाजवळ एक पेन आणि एक वही किंवा कागद किंवा झोपण्याअगोदर लगेच मनात चाललेल्या विचारांना शब्दबद्ध करा. आणि मग झोपी जा. यामुळे तुमचा मेंदू निश्चिंत राहील आणि चांगली झोप येईल. तुम्ही दुसर्यादिवशी केल्या जाणार्या दोन मुख्य कामांचाही उल्लेख करू शकता.
दुसर्यांचा विचार करा
जर तुम्ही सकाळी नऊ वाजता मिटिंग शेड्युल घेणार असाल तर कित्येक लोकांना ही मिटिंग अटेंड करायला अडचण येऊ शकते. जर तुमचे सहकारी तुमच्यासारखेच असतील तर मात्र ते अगदी आनंदाने तुम्ही सांगितलेल्या वेळेवर वर्कप्लेसवर पोहचू शकतात. सकाळच्या वेळेचा योग्य उपयोग केला जाऊ शकतो. यासाठी सगळ्यांना समजून घ्यायला हवे. लोकांना वेळेवर ऑफिसमध्ये पोहचून कामाला लागण्यासाठी प्रेरणा द्यायला हवी. ही एक कलाच आहे.
स्वत:शी संवाद साधा
जगातले सर्वात यशस्वी लोक दिवसाची सुरुवात खूप लवकर करतात. लवकर उठून ते स्वत:ला स्वत:शी जोडण्याचा प्रयत्न करतात.  ही सकाळ चांगला नाश्टा करण्यासारखी असते. सकाळी उठून तुम्हाला विनंती करायला हवी आणि दीर्घ श्वास घेऊन स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव करून घ्यायला हवी. या जगात येण्याचा आपला उद्देश शोधायला हवा. विचारांच्या गर्दीपासून दूर राहायला हवे. स्वत:च्या आवाजावर लक्षकेंद्रित करायला हवे.
गोंधळापासून स्वत:ला दूर ठेवा.
काही तज्ज्ञ सांगतात की, ज्यावेळी तुम्ही जागे असता, त्यावेळेला सकाळी करणार्या कामासंबंधीच्या सूचनांना डोक्यात प्रोसेस होऊ द्यायला हवं. तुम्ही गोंधळून जाऊ नका. तुम्हाला सकाळी उठल्यानंतर विचारांच्या जगात घुसण्यापेक्षा शांत राहायला हवे आहे.तुम्ही पाहिजे तर हळू आवाजात संगीत ऐकू शकता.यामुळे तुम्ही निश्चित करू शकता की, दिवसभर आपल्या ऊर्जेचा कशाप्रकारे वापर करता येईल.




No comments:

Post a Comment