बॉलीवूडला शिक्षक किंवा शिक्षण क्षेत्र कधी परका वाटला नाही. शेकडो चित्रपटांपैकी ७०- ८० चित्रपटांमध्ये हमखास शाळा- कॉलेजचा परिसर आलेला असतो. चित्रपटांमध्ये संस्कार करणारा शिक्षक जसा भेटला तसा कटकारस्थान करणारा, आतंकवादी शिक्षकही आपल्याला पाहायला मिळाला. हॉट प्राध्यापिका आणि तिच्याभोवती गुंजी घालणारा तिच्यासाठी वेडापिसा झालेला प्राध्यापक किंवा भोळा प्राध्यापक आणि त्याच्यावर जीव टाकणारी फटाकडी तरुण विद्यार्थींनी आपण पाहिली आहे. काही जुन्या चित्रपटांमध्ये समाजाला आपल्या आचरणातून दिशा, संस्कार देणारा शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणारा शिक्षक आपण पाहिला आहे. मात्र अलिकडच्या काळात असा शिक्षक क्वचित आढळून आला आहे. कडक शिस्तीचा, आपल्याच नादात असणारा, हास्यांची कारंजे उढविणारा अशी शिक्षकाची अनेक रुपं रुपेरी पडद्यावर आपण पाहिली आहेत. त्यावरच आपण आजच्या शिक्षक दिनाच्या निमित्तने चर्चा करणार आहोत.
आईच्या मायेला पारखी झालेली झालेली पण श्रीमंताघरची मुलं शिक्षकांची कशी भंबेरी उडवून पळवून लावतात. याची कहानी आपल्याला 'परिचय' चित्रपटात पाहायला मिळते. मात्र त्यांना शिक्षक कशाप्रकारे आपलासा करतो, आणि त्यांच्याशी एक नवं नातं जोडतो, याचे उत्तम चित्रण त्यात केलेले आहे. जितेंद्र आणि जया भादुरी (बच्चन) यांचा कसदार अभिनय आपल्याला पाहायला मिळतो. 'बूंद जो बन गई मोती' या चित्रपटाचा नायकसुद्धा 'यह कौन चित्रकार है...' गात मुलांना निसर्गप्रेमाचा धडा देत असतो. राजकपूरच्या 'मेरा नाम जोकर' या चित्रपटातला बराच भाग एका शाळेशी संबंधित आहे. तर मनोज कुमार यांच्या ' उपकार' आणि 'पूरब और पश्चिम' मध्येसुद्धा शिक्षणाच्या फायद्याच्या गोष्टी सांगितल्या आहेत.
शिक्षकाचा प्रामाणिक चेहरा
जुन्या चित्रपटांमध्ये प्रामाणिकपणाची मोहनमाळ हमखास शिक्षकाच्या गळ्यात घातलेली असायची.शिक्षकाशिवाय प्रामाणिक, सज्जन प्राणी त्यावेळी समाजात दिसायचा नाही. त्यामुळे समाजाचे प्रतिबिंब उतरवणार्या कहाण्यांमध्ये शिक्षक प्रामाणिकच दाखवला जायचा. पण पुढे काळ बदलला. समाजातील त्या शिक्षकाची छबी आणि भूमिकाही बदलली. आपल्या चित्रपटाने हा बदलसुद्धा तितक्याच तत्परतेने स्वीकारला आणि पडद्यावर स्पष्टपणे मांडला. पडद्यावर त्याकाळी शिक्षकाला अप्रामाणिक आणि सोशिकही दाखवले गेले. 'दो और दो पांच' मध्ये अमिताभ बच्चन आणि शशी कपूर एका शाळकरी मुलाचे अपहरण करताना शिक्षकांचा पेहराव घालून जातात. 'कुछ कुछ होता है' सारख्या चित्रपटात सेक्सी टीचर पडद्यावर आल्यावर बॅकग्राऊंडला 'मिस ब्रिगेंजा' अशी धून ऐकायला मिळते. फराह खानच्या 'मैं हूं ना' मध्ये दहशतवादी सुनील शेट्टी आपल्या नापाक इरद्यांना अंजाम देताना प्राध्यापकाचा चेहरा ओढून कॉलेजात अवतरतो. याच केमेस्ट्रीची टीचर बनलेली सुश्मिता सेन कमालीची हॉट दाखवून ग्लॅमरची कसरही भरून काढली आहे. आदित्य चोप्रा यांच्या 'मोहबतें' मध्ये परंपरानिष्ठ, प्रतिष्ठा जपणारा आणि शिस्तीचा भोक्ता असलेल्या एका प्रिंसिपलला त्याच्याच कॉलेजातील काही विद्यार्थी प्रेमाचा पाठ पडवतात. गेल्यावर्षीच्या '४०४' चित्रपटात आपल्या एका प्रयोगाच्या सस्केससाठी एका प्राध्यापकाने आपल्याच एका हुशार विद्यार्थ्याला बरबार करून सोड्ल्याची कथा दाखवली आहे.
चित्रपट देतात धडे
शिक्षण कसं घ्यावं आणि शिकवावं कसं, यावर प्रकाश टाकणारे बॉलीवूडमध्ये अनेक चित्रपट येत राहिले. अशा चित्रपटांचे कौतुकही झाले. संजय लिला भन्साळी यांच्या 'ब्लॅक' चित्रपटाच्या केंद्राशी एका अशा शिक्षकाची कहानी चित्रित करण्यात आली आहे, जो आपल्या मुक्या-बहिर्या आणि अंध असणार्या विद्यार्थीनीला शिकवतो- सावरतो. स्वतः ला जगण्यास सक्षम बनवतो. पण स्वत: मात्र अक्षम बनतो. शेवटी तिच शिष्या त्याला आश्रय देते. आशुतोष गोवारीकर यांचा 'स्वदेश' राष्ट्रवादाची नवी परिभाषा शिकवणारी आहे. त्यातच पुस्तकी ज्ञान सहजतेने समजून घेण्याचे आणि त्या ज्ञानाचे आपल्या आयुष्याच्या भरतीसाठी वापर करण्याची शिकवण देताना नजरेस पडतो.
आला नाविन्यांचा बहर
खरा नाविन्याचा बहर आला तो २००८ मध्ये आलेल्या अमिरखानच्या 'तारें जमीं पर' या चित्रपटानंतर. या चित्रपटाने उभे केलेल्या अनेक प्रश्नांपैकी एक प्रश्न होता. तो म्हणजे सगळी मुले एकाच पातळीत अध्ययन करू शकतात का? दुसर्या मुलाच्या तुलनेत आपला मुलगा अव्वल यावा म्हणून पालक त्याच्याकडून जीव तोडून मेहनत करून घेतो. त्याचे बालपण हिरावून घेतो. या सिनेमातला 'आर्ट टीचर' म्हणतो की,' अगर घोडे दौडाने का इतनाही शौक है तो रेसकोर्स में जाओ, बच्चे क्यों पैदा करते हो...?' यानंतरच्या चित्रपटात अमिर खान पुन्हा एकदा 'थ्री इडियटस' मध्ये असाच वेगळा विषय घेऊन पडद्यावर आला. चेतन भगतच्या कादंबरीवर आधारित 'फाईव पाँइंट समवन' मध्ये अशा तीन हिरोंची म्हणजे युवकांची कथा सांगितली आहे, जे शिक्षक नेहमी दहापैकी पाच्-सहा क्रमांक मिळवत असतात. पण हे मार्क कॉम्पिटिशन खास करून इंजिनिअरिंग क्षेत्राकडे फारच कमी असतात. पण राजकुमार हिरानी यांनी या डब्यात आपल्याकडील काही प्रभावी मुद्दे घालून या चित्रपटात आताच्या शिक्षण सिस्टीमवर प्रखरपणे प्रकाश टाकला आहे. यशस्वी होण्यासाठी चांगले मार्क मिळवण्यापेक्षा आपल्याला जे काम करायला आवडते, त्या कामांकडे वळा, असा संदेश दिला आहे.
अध्ययन- अध्यापन करणारे शिक्षक
'थ्री इडियटस' नंतर समाजाला अध्ययन -अध्यापनाचा डोस देणार्या चित्रपटांची भाऊगर्दीच झाली. यातले बरेच चित्रपट डप्पड होते. पण काही चित्रपट शिक्षण व्यवस्थेत बदल घडवायला सांगणारे अनेक चित्रपट आले. 'पाठशाला', चांस पे डांस', 'फालतू' सारखे चित्रपट हेच सांगतात. विक्रम मोटवानी यांच्या 'उडान' चित्रपटात हीच गोष्ट अधिक प्रभावीपणे सांगितली आहे. 'दो दुनी चार' या चित्रपटात एका शिक्षकाचा संघर्षमय जीवन आणि त्याचबरोबर शिक्षणाची सार्थकताही दर्शवली आहे. 'आय एम कलाम' मध्ये एका ढाब्यावर काम करणार्या छोटूची शिकण्याची दुर्दम्य इच्छा कहाणी प्रदर्शित केली आहे. 'आरक्षण' मध्ये शिक्षणाचे व्यापारिकरण दाखवण्यात आले आहे.
म्हणजे आपल्या बॉलीवूडने शिक्षकाला केवळ एका अँगलने हाताळले नाही. सर्व तर्हेने त्याला गोंजारले आहे. बॉलीवूडने समाजाला दिशा देणार्या शिक्षकाचे समाजातील आधुनिक प्रतिबिंब पडद्यावर उमटवले आहेत. त्याचा स्वीकारही प्रेक्षकांनी केला आहे.

No comments:
Post a Comment