राजस्थानातल्या एका गावात रामधन नावाचा शेतकरी राहात होता. तो साधासुधा होता,पण मोठा चतुर होता. गावातल्या कोणाच्यातदेखील त्याला धोका देण्याची हिंमत नव्हती. त्याच्या गावात पाणी टंचाई होती. साधी विहीरदेखील गावात नव्हती. गाववाल्यांना दूरवरून पाणी आणावे लागे.
रामधनचे वडील सनकी डोक्याचे होते. ते कोणावरही पटकन विश्वास ठेवत. दुसर्याचे ऐकून ते आपल्या मुलाबरोबर-रामधनबरोबर भांडायचे.एकदा रामधनचे वडील त्याच्याशी भांडण करून कुठे तरी निघून गेले. आठवडा उलटून गेला तरी ते परत आले नाहीत. रामधनला चिंता वाटायला लागली. त्याने शोधाशोध सुरु केली.
हिवाळ्याचे दिवस होते. त्याने आपल्यासोबत चार कांबळी घेतल्या आणि आपल्या वडिल्यांच्या शोधासाठी बाहेर पडला. वडिलांचा शोध घेत घेत तो फार लांब आला. एक हिरवगार असं गाव होतं. गावात एक खोल विहीर होती. तिला बारमाही पाणी असायचं. विहिरीवर एक शेतकरी बैलांच्यासाथीने रर्हाट चालवत होता. रर्हाटाजवळच त्या शेतकर्याचे तीन मित्र गप्पा मारत बसले होते. रर्हाट्याच्या मोटेतून येणारं पाणी पाटापाटानं पुढं पुढं जात होतं आणि रान भिजवत होतं. ते पाहाताच रामधनला नवल वाटलं. याआधी कधी त्याने रर्हाट पाहिलं नव्हतं. त्याने पहिल्यांदा पाण्यात हात घातला. मग त्याने हात-पाय धुतले आणि पानी प्याला. त्याला तरतरी आली. थकवा पळाला.
रामधनने शेतकर्याला विचारलं, भाऊ, तुमची विहीर तर झक्कासच आहे. पण एक मला कळत नाही. इतकं पाणी भरून देण्याकरता कोण बरं बसलं आहे विहिरीत? त्याला थकवा-बिकवा येत नाही काय?
रामधनची गोष्ट ऐकून शेतकरी हसला आणि म्हणाला, मोट तुझे वडील भरताहेत. त्यांच्या पाण्यामुळेच तर शेत भिजतं आहे.
रामधन म्हणाला, असं! माझे वडील इथं आले आहेत! पण भाऊ, या असल्या कडक्याच्या थंडीतदेखील मोटेत पाणी भरताहेत. त्यांना थंड कशी लागत नाही?
रामधनची गोष्ट ऐकून पुन्हा एकदा शेतकर्याला हसू आलं. जवळच बसलेले त्याचे मित्रदेखील हसू लागले. शेतकरी रामधनला म्हणाला,खरंय, थंड तर वाजतच असेल. जर तुला तुझ्या वडिलांची इतकी काळजी असेल तर त्या कांबळी मला दे.मी त्या त्यांच्याजवळ पोहचवीन. बाकीचे मित्रदेखील म्हणाले, हो.. हो, कांबळी देऊन टाक.
रामधन काही वेळ विचार करत राहिला. मग म्हणाला, हो..हो, तुम्ही बरोबर म्हणता आहात. ही घ्या कांबळी. आणि माझा राम राम सांगा . मी पुन्हा येऊन भेटेन, असे म्हणत त्याने चारी कांबळी देऊन टाकल्या.
रामधन तिथून निघून जाताच शेतकरी आणि त्याचे मित्र रामधनच्या मूर्खपणावर उशिरापर्यंत हसत राहिले. मित्रांपैकी एकजण म्हणाला, आता या कांबळी आपल्यात वाटून घेतल्या पाहिजेत. शेतकरी लोभी होता. म्हणाला, कांबळी तर मीच घेणार. मीच त्याला माझ्या हुशारीने ठकवलं.
शेतकर्याचे मित्र खवळले. त्यांनी गावातल्या सगळ्यांच ही घटना सांगितली. काही महिने उलटले. शेतकर्याच्या शेतातला गहू काढणीला आला होता. भरघोस पीक आलं होतं.शेतकर्याचं कुटुंब काढणीत गुंतलं होतं. एक दिवस अचानक रामधन तिथे हजर झाला. शेतकर्यानं त्याला ओळखलं. हसत हसतच त्याने विचारलं, काय भाऊ, कसं काय येणं केलंत? तुम्चे वडील तर खूप मजेत आहेत. कांबळी अंगावर ओढून ते विहिरीत आरामात झोपले आहेत. या खेपेला त्यांना द्यायला काय आणलं आहेस?
रामधन भोळेपणानं म्हणाला, भाऊ, या खेपेला काही द्यायला आलो नही तर न्यायला आलो आहे. गव्हाचं निम्म पीक आणि माझे वडील!
शेतकरी त्याच्या तोंडाकडेच पाहत राहिला. नंतर स्वत: ला सावरत म्हणाला, निम्म पीक!ते कसं काय?
रामधन म्हणाला, भाऊ, माझ्या वडिलांनी अगदी कडाक्याची थंडी असतानादेखील कुडकुडत मोटेत पाणी भरले. त्यामुळेच शेत भिजलं आणि तुम्हीच म्हणाला होतात. आता सांगा, मी अर्ध्या पिकाचा हक्कदार आहे की नाही?
पण शेतकरी मानायला कुठे तयार होता. तो रामधनला बरेवाईट बोलू लागला. रामधनने गावातल्या पंचांकडे तक्रार केली. शेतकर्याच्या तिन्ही मित्रांनी त्याचा बदला घेण्याचे ठरवले. त्याने त्यांना कांबळी दिल्या नव्हत्या. त्याचा राग काढण्याची नामी संधी त्यांना मिळाली होती.
पंचांनी सगळा प्रकार ऐकून घेतला. मग रामधनला म्हणाले, शेतकर्याने तुझी चेष्टा केली होती. अरे, इतक्या मेहनतीच काम कुठला माणूस करू शकेल का?
रामधन सहजपणे म्हणाला, मला काय ठाऊक? मी बापडा साधाभोळा माणूस. माझ्या गावात अशी एकदेखील विहीर नाही. असलं रर्हाट कधी पाहिलं नाही. बरे, तुर्तास याला चेष्टा समजू. पण मग त्यांनी माझ्या कांबळी हडप करताना विचार करायला हवा होता. मी तर यांची गोष्ट खरी समजून बसलो आणि कांबळी दिल्या. आता तुम्हीच मला न्याय द्यावा.
पंचांनी साक्षीसाठी शेतकर्यांच्या मित्रांना बोलावलं. ते संधीचीच वाट पाहात होते. ते तात्काळ म्हणाले, रामधन बरोबर म्हणतो आहे. शेतकर्याने खोटे बोलून त्याच्याकडून चार कांबळी हडपल्या आहेत.
पंचांनी निर्णय दिला, रामधनला शेतकर्याने खोटे बोलून ठकवलं आहे. आता याला आपल्या पिकलेल्या गव्हातलं निम्मं धान्य दंड म्हणून द्यावंच लागेल. शिवाय रामधनच्या वडिलांनादेखील याने शोधून त्याच्या ताब्यात द्यावं.
बिच्चारा शेतकरी पुरता खजिल झाला. गावकर्यांपुढे त्याचं काही एक चाललं नाही. त्याला अर्धं पीक रामधनला द्यावं लागलं. पण त्याच्या वडिलांना कोठून शोधून आणणार? तो रामधनला म्हणाला, भाऊ, अर्धे पीक घेतलं आहेस. आता तरी मला माफ कर. मी तुझ्या वडिलांना कोठून शोधून आणू? मी तर त्यांना ओळखतदेखील नाही. वाटल्यास, दुसरे काही तरी दंड म्हणून घे.
हे ऐकून रामधनला हसू आलं, बास, हारलास? स्वत: ला मोठा हुशार समजत होतास. जा, माफ केलं.माझे वडील घरी परतले आहेत. पण लक्षात ठेव, पुन्हा कधी कुणाला ठकवलं तर आख्खं पीक गमावून बसशील. असे म्हणून तो घराच्या वाटेला लागला.
करी पुरता खजिल झाला. ात द्यावं.ा याला आपल्या पिकलेल्या गव्हातलं निम्म धान्य दंड म्हणून द्यावंच लागेल. शिवाय रामधनच्या उ
No comments:
Post a Comment