एकदा बादशहा अकबरच्या सर्वात लाडक्या बेगमने तातडीने भेटायला येण्यासाठी म्हणून एका सैनिकाकरवी निरोप धाडला. बादशहा दरबारात होता. त्यामुळे तो सैनिक थेट दरबारात आला आणि बादशहाच्या कानात कुजबुजला. तातडीने बादशहा उठला आणि जायला निघाला. बादशहाची बेगमला भेटण्याची अतुरता पाहून बिरबलला हसू आले. ते पाहून बादशहाला संताप आला. तो बिरबलला म्हणाला," माझा अशा प्रकारे उपहास करण्याची तुझी हिम्मतच कशी झाली? तू स्वतः ला समजतोस कोण? चल, आत्ताच्या दरबारातून चालता हो. आणि पून्हा म्हणून माझ्या राज्यात पाय ठेवायचा नाहीस. "
बिरबलने बादशहाची आज्ञा शिरसावंद्य मानली आणि काही एक न बोलता तो दरबारातून निघून गेला. बिरबलवर जळणार्यांच्या पोटात आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. आता आपलेच राज्य ,असे म्हणत ते एकमेकांकडे पाहून गालातल्या गालात हसू लागले. आता बरेच दिवस झाले, पण बिरबल काही दरबारात परतला नाही. आता बादशहाला त्याची उणीव भासू लागली. त्याची बिरबलाशिवाय म्हणजे मोडलेल्या कण्यासारखा अवस्था झाली. बादशहाची कोणतीही समस्या एका चुटकीसरशी सोडवणार्या बिरबलच्या अनुपस्थितीमुळे बादशहाला अनेक समस्यांशी सामना करावा लागत होता. प्रश्नांची सोडवणूक होत नसल्याने अनेक प्रश्न रेंगाळत पडले होते.
एकदा बादशहा महालाच्या खिडकीतून बाहेर पाहत असताना त्याला कोणी तरी रथात बसून रस्त्यावरून जात असल्याचे दिसले. त्याने लगेच सैनिकाला त्याची माहिती काढून आणावयास सांगितली. सैनिकाने परत येऊन तो बिरबल असल्याचे सांगितले. आता स्वतः बादशहा रस्त्यावर आला. आणि समोरून येणार्या बिरबलला अडवले. त्याला बादशहा म्हणाला," माझ्या आज्ञेचं पालन केलं नाहीस." बिरबल म्हणाला," हुजुर, आपल्या आज्ञेची मी कधीच अवहेलना केली नाही. आपण मला आपल्या राज्याच्या जमिनीवर पाय न ठेवण्याची आज्ञा केली होती, म्हणून मी दुसर्या देशातील माती आणून रथात पसरली आहे आणि त्यावर मी उभा आहे. त्यामुळे मी आपल्या राज्याच्या मातीवर उभा राहण्याचा प्रश्नच येत नाही. आता माझे संपूर्ण जीवन मला याच रथावर घालवावे लागणार आहे." बिरबलची ही चतुराई बादशहाला भारी आवडली. शेवटी बादशहा त्याच्या या चतुराईवर तर फिदा होता. बिरबल आपल्याला सोडून जाणार नाही, याची पक्की खात्री बादशहाला होती.
तो बिरबलला म्हणाला," बिरबल, मी तुला दिलेली आज्ञा आत्ताच्या आत्ता मागे घेत आहे. आता उतर खाली" असे म्हणून त्याच्या उतरण्याची वाट न पाहता बादशहा स्वतः बिरबलजवळ गेला आणि त्याला हाताला धरून खाली उतरवले. बिरबल खाली उतरताच बादशहाने बिरबलला मोठ्या प्रेमाने अलिंगन दिले. दुसर्यादिवशी बिरबल हसतमुखाने दरबारात आलेला पाहून त्याच्यावर जळफळाट करणार्यांची तोंडे मात्र पाहण्यासारखी झाली होती.

No comments:
Post a Comment