Friday, March 15, 2019

भरवशाचा मार्ग


आपल्या सर्वांच्या आयुष्यात बरेच चढ-उतार येत असतात. मात्र हेच चढ-उतार कुणासाठी प्रेरणास्त्रोत बनतात,तर कुणासाठी कदाचित दु:खदेखील देऊन जातात. माणसाला एखाद्या कामात मिळालेले अपयशच पुढे त्याच्या यशाची सिडी बनून जाते. त्यामुळे अपयशाला घाबरून जायचं नसतं.उलट त्याला आव्हान म्हणून स्वीकारायचं असतं. कॉम्प्युटरचा एक सिद्धांत आहे, गी गो. म्हणजे गार्बेज इन गार्बेज आऊट! याचा अर्थ आहे- पेरले ते उगवले. जसे पोसाल,तसे बनेल. कॉम्प्युटर आणि मनुष्य, दोन्हीही एकमेकांसाठी मिळते-जुळते आहेत.
परंतु,मनुष्य फारच दिलचस्प प्राणी आहे. हा नेहमी स्वत:ला दुसर्यापेक्षा अधिक बुद्धिमान असल्याचे सिद्ध करण्याच्या मागे लागलेला असतो. आणि असाही विचार करत असतो की, हा नियम स्वत:ला सोडून बाकी सर्वांसाठी लागू आहे. किती भ्रमात राहत असतो हा! आपण सर्वजण रात्री झोपण्यापूर्वी खिशातल्या सर्व वस्तू काढून टेबलावर किंवा कपाटात ठेवून देतो. याच धर्तीवर किंवा याच गोष्टीतून प्रेरणा घेऊन आपण दिवसभरात आपल्या डोक्यात जमा झालेला वाईट विचारांचा कचरा रात्री झोपण्यपूर्वी काढून टाकण्याची सवय लावून घ्यायला हवी. आज आपल्याजवळ जमा झालेला वाईट विचारांचा कचरा आहे, त्याचा  आपल्याला उद्या काहीच उपयोग नसतो.त्यामुळे तो रोज रात्री आपल्या डोक्यातून काढून टाकायला हवा.

मार्क्स ऑरिलियस एकदा म्हणाले होते, आपले जीवन तेच असते, जे आपले विचार तसे बनवत असतात. जुन्या काळात माणसे तंत्र-मंत्र आणि यंत्र यांचा वापर करून जीवनात यश मिळवण्याचा प्रयत्न करत असत.पण आधुनिक युगात अशा प्रकारे या सगळ्यांचा नवा अर्थ लावायला हवा. तंत्र म्हणजे आपली कार्य करण्याची पद्धत आहे. मंत्र- आपल्या मनाचे विचार आहेत. आणि यंत्र- आपले अन्य व्यक्तिंशी बनवलेले संबंध आहेत. जर आपण तंत्र-मंत्र-यंत्र यांचा उपयोग योग्य प्रकारे करत असू तर यश नक्कीच आपल्या पायाशी लोळण घेईल. यश आणि त्याचे लक्ष्य यांमधला क्रियान्वयन माणसाच्या मूळ प्रवृत्तीची कल्पनाशीलता आहे. खरे तर स्वप्न पाहणं, तसं अवघड काम आहे. निश्चित स्वरुपात इच्छाशक्ती, उद्देश आणि प्रेरणा असेल तर साध्य सहज शक्य आहे. यासाठी संकल्प करायला हवा आणि स्वप्नाच्या लक्ष्याकडे क्रियान्वयन करायला हवे.
एका प्रसिद्ध विशेषतज्ज्ञाने म्हटले आहे की,दु:ख या गोष्टीचं नाही की, आम्ही कुठला कठोर निर्णय नाही घेतला.तर यासाठी आपण पूर्णपणे तयार झालो नव्हतो, ही गोष्ट इथे महत्त्वाची आहे. सर्वसामान्यपणे असं पाहायला मिळतं की, सामान्य व्यक्ती कुठल्या तरी विशेष क्षेत्रात यश मिळत नाही, हे पाहून पहिल्या किंवा दुसर्या प्रयत्नांनंतर विचलित होऊन जातात. आपला आत्मविश्वास गमावून बसतात आणि स्वत:ला अयोग्य, अक्षम आणि हीन समजायला लागतात. खरे तर माणसाने सदैव आपले मनोबल उंचावण्याची गरज आहे. सतत प्रयत्नाच्या मागे लागणारी व्यक्ती एक ना एक दिवस आवश्य यश मिळवल्याशिवाय राहत नाही. कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्याचा मूळ मंत्र स्वत:मध्ये सामावून घेण्यात अशी व्यक्ती यश मिळवते. अशामुळे कोणतीही शक्ती त्याला आपल्या लक्ष्यापर्यंत पोहचण्यासाठी रोखू शकत नाही. यश काही सहजसाध्य नाही. रोपटे लावल्यानंतर माळी त्याला दिवस, आठवडे, महिने पाणी घालत असतो.त्याचे संवर्धन करत असतो.तेव्हा कुठे मोसमात त्याला फळाची प्राप्ती होते.
एकदा एक प्रवासी एका चौकात थांबला. त्याने एका व्यक्तीला विचारले,हा रस्ता मला कुठे घेऊन जाईल? उत्तराला प्रश्न आला- तुम्हाला कुठे जायचे आहे? प्रवासी म्हणाला- मला माहित नाही. तेव्हा ती व्यक्ती म्हणाली- कुठलाही रस्ता पकड. तुम्हाला कुठे जायचे आहे, हेच मुळात माहित नहई तर काय फरक पडणार आहे? किती खरी गोष्ट आहे. आपण काहीच जाणून न घेता रेल्वेत जाऊन बसलो, बसमध्ये जाऊन बसलो, असं कधी होईल का? ती गाडी कुठे निघाली आहे? याचे उत्तर आपल्या सर्वांजवळ नाही, असाच आहे. पण मग आयुष्याच्या प्रवासाला लक्ष्याशिवाय मानसे का तयार होतात? लक्ष्य असे स्वप्न आहे, ज्यात निश्चित काळ आणि ते हासिल करण्याची योजना असते. लक्ष्यच स्वप्नांना मूर्तस्वरुप प्राप्त करून देते.
सर्वांना माहितच आहे, स्वप्नांना सत्यात उतरवायचे असेल तर लक्ष्य स्पष्ट असायला हवे. मापनयोग्य, मिळवण्यायोग्य वास्तववादी आणि समयबद्ध असायला हवे. आपली नजर मोठ्या उद्देशाकडेच असायला हवी. मनात ठोस विचार आणि समर्पणाची भावना असायला हवी. कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी काही गोष्टींचा विचार व्हायलाच हवा. आपल्या मनात स्वत:विषयी, आपल्या कामाविषयी आणि आपल्या जीवनाविषयी निष्ठा असायला हवी. जे काही आपण करत असतो, ते अगदी मनापासून करायला हवे. वर्तमानात आपण कुठल्या तरी तणावातून जात असेल तर  ते एका कागदावर लिहून काढा. एक म्हणदेखील आहे.-एका शांत समुद्रात नावाड्या कधीही निष्णात बनू शकत नाही. प्रत्येक काम सोपे असण्याअगोदर सर्वांनाच अवघड वाटत असतं. पण अवघड आहे म्हणून घाबरून पळायचं नाही. उलट अडचणी सोप्या करण्याची योग्यता असायला हवी. सर्वसामान्यपणे, आपण जे काम करायचे ठरवले आहे, ते सोडवण्याची क्षमता आपल्या ठायी अगोदरच असते. पण कित्येकदा काही कारणांमुळे आपण ती ओळखू शकत नाही. तेव्हा एक मोठी गोष्ट आपल्याकडे असायला हवी, ती म्हणजे आपण स्वत:वर भरोसा ठेवायला हवा आणि आपल्या क्षमतांना ओळखायला हवे. मग आपोआपच तुमच्या वाटचालीतील अडथळे दूर होतील.-मच्छिंद्र ऐनापुरे,जत

No comments:

Post a Comment