आपल्या हसण्यावर मोठी सांस्कृतिक बंधनं
लागली आहेत. म्हटल जातं की, विनाकारण नका हसू, आयुष्य काही हसण्यावरी नेण्याची गोष्ट
नाही. पण खरी गोष्ट अशी की, हास्य,हसू याच्याशिवाय जीवन म्हणजे एकाद्या आजारासारखं होऊन जाईल. अमेरिकेतील एक संस्था आहे, इंस्टीट्यूट फॉर द स्टडी ऑफ
ह्यूमन नॉलेज. या संस्थेच्या जागरूक डॉक्टरांनी माणसाच्या आरोग्यावर
संशोधन केलं आहे. ते या संशोधनानुसार अशा निष्कर्षापर्यंत पोहचले
आहेत की, हास्यात आरोग्य प्रदान करण्याची अदभूत क्षमता आहे.
हास्य प्रतिभेवर परिणाम करतं. तुम्ही अधिक बुद्धिमान
होता. मनातले असे काही कोपरे आहेत,जे निद्रावस्थेत
होते, ते अनायसे जागे होतात. हसणारी माणसं
आत्महत्या करत नाहीत. त्यांना हृदय विकाराचे झटके येत नाहीत.
आरोग्य विज्ञानदेखील सांगतं की, हास्य मनुष्याला
मिळालेले परिणामकारक नैसर्गिक औषध आहे. जर तुम्ही आजारी असताना
हसलात तर तुम्ही लवकर बरे व्हाल आणि धडधाकट आहात पण हसत नसाल तर तुम्ही लवकरच आजाराने
घेरून जाल. कारण हास्य स्ट्रेस हार्मोन कमी करतं आणि संक्रमणशी
लढा देणार्या अँटी बॉडीला ताकद देत.
ओशो यांनी हास्याचा उपयोग एका थेरेपीप्रमाणे
केला आहे. ते म्हणतात, हास्य आंतरिक स्त्रोतातून
शक्ती जागवून बाहेरील घटकापर्यंत घेऊन येतं. हास्यामागं एका ऊर्जेचा
प्रवाह प्रवाहित होत राहतं. ज्यावेळेला तुम्ही खळखळून हसता,
त्यावेळेला काही क्षण तुम्ही धानस्थ होऊन जाता, विचार शृंखला तुटते कारण हसणं आनि विचार करणं एकाचवेळी शक्य नाही. या एकदम उलट गोष्टी आहेत. याचा अर्थ तुम्ही एक तर हसू
शकता किंवा विचार करू शकता. भरभरून असलेलं हास्य परंपरा आणि भूतकाळातील
केरकचरा साफ करून एक नवीन जीवनदृष्टी देते. तुम्हाला आनखी क्रियाशील
आनि सृजनशील बनवतं. मनापासून हसल्यानं मन अकस्मात थांबतं.-मच्छिंद्र ऐनापुरे,जत
No comments:
Post a Comment