एक धोब्याचं गाढव होतं. तो दिवसभर कपड्यांची गाठोडी इकडून तिकडे आणि तिकडून इकडे वाहायचा. त्याचा मालक मोठा निर्दयी आणि कंजोष होता. गाढवाच्या पोटाची व्यवस्था न करताच त्याच्याकडून राबवून घ्यायचा. फक्त रात्री त्याला मोकळा सोडायचा. जवळपास चरून पोट भरावं असं काही नव्हतं. साहजिकच गाढव शारीरिकदृष्ट्या अतिशय दुर्बल बनले होते.
एके रात्री भटकत असताना त्याची एका जंगली डुकराशी गाठ पडली. गाढवाचे कृश शरीर पाहून गिधाड म्हणाले," दोस्ता! काय तुझी ही अवस्था, काही खातो-पितोस की नाही? बघ बरं किती कमजोर दिसतो आहेस!"
मग गाढवाने आपले रडगाणे गायला सुरुवात केली. मालक किती निर्दयी आणि कंजूष आहे, याचा पाढाच वाचायला त्याने सुरुवात केली.
डुक्कर म्हणाले," आता कसलीच काळजी करू नकोस. तुझे दिवस पालटले असे समज. अरे, इथे जवळच भाजीपाल्यांचा मोठा मळा आहे. तिथे काकडी, भोपळा, गाजर, मुळा, वांगी अशी किती तरी प्रकारची फळभाजी, भाजीपाला बहरला आहे. मी एका ठिकाणाहून आत जाण्याचा एक गुप्त मार्ग बनवला आहे. बस्स, रोज रात्री त्या मार्गाने आत घुसतो आणि मनसोक्त फळभाज्या- भाज्यांवर ताव मारतो. बघितलंस माझी तब्येत कशी गुटगुटीत झाली आहे! आता तूही येत जा माझ्याबरोबर..."
लाळ गाळत गाढव त्याच्यासोबत निघाले. मळ्यात घुसला. हिरवागार भाजीपाला, फळभाज्या पाहून तो अक्षरशः त्यावर तुटून पडला. खातच राहिला खातच राहिला. काय करणार बिच्चारा! त्याला कित्येक दिवसांतून असा खाना मिळत होता. त्यांनी भरपेट खावून ढेकर दिली. रात्र त्यांनी तिथेच काढली. पहाटे पहाटे ते बाहेर आले. जंगली डुक्कर जंगलाच्या दिशेने निघाला तर गाढव गाढव मालकाच्या घराच्या दिशेने ...!
आता रोज रात्री ते दोघे एके ठिकाणी एकत्र येऊ लागले. रात्रभर भाजीपाला, फळभाज्यांवर ताव मारू लागले. थोड्याच दिवसांत गाढवाची तब्येत सुधारली. त्याच्या कातडीला एकप्रकारची सुखासिन चमक येऊ लागली. आता तो त्याच्या उपासमारीचे दिवस पार विसरून गेला.
एके रात्री भरपेट खाल्ल्यावर गाढवाला गाण्याची हुक्की आली. स्वतः च्या आयुष्यावर तो जाम खूष होता. मग त्याने आपले कान सरळ केले. पाय झाडले. आणि वर तोंड करून गाण्याची पोझ घेतली, तोच डुक्कर काळजीच्या स्वरात पण बारीक आवाजात म्हणाला," काय झाले रे बाबा, तुझी तब्येत तर बरी आहे ना?"
गाढव डोळे बंद करून मस्त मजेत म्हणाला," मला गावंसं वाटतं... चांगले भोजन झाल्यावर गायलं पाहिजे. गर्दभ राग गाण्याचा विचार करतोय."
गाढवाने लागलीच विनवणी स्वरात इशारा दिला," नको, नको, असं काही करू नकोस. गाण्याच्या भानगडीत पडलास तर माणसे आपल्याला चोर समजून बदसून काढतील." मग गाढवाने हळूच पापणी वर करून तिरक्या नजरेने डुकराकडे पाहिले आणि म्हटले," डुक्करदादा, तू जंगली म्हणजे जंगलीच आहेस. संगीतातलं तुला काहीच कळत नाही."
डुक्कर हात जोडून म्हणाले," संगीतातलं मला काही कळो अथवा नको, पण मला माझा जीव प्यारा आहे. तू आपला बेसूर राग आळवण्याची जिद्द तेवढी सोडून दे. यातच आपलं भलं आहे."
गाढवाला डुकराचं बोलणं जिवाशी लागलं. त्याने आपली शेपटी हवेत फिरवली आणि तक्रारीच्या स्वरात म्हणाला," तू माझ्या रागाला बेसूर म्हणून हिणवतोस? हा माझा अपमान आहे. अरे! आम्ही गाढव लोक शुद्ध शास्त्रीय लयीत रेकत असतो. तुझ्यासारख्या मूर्खांना कसं कळणार ते?"
जंगली डुक्कर म्हणाले," गर्दभभाऊ, मी मूर्ख आणि जंगली असलो तरी मित्रत्वाच्या नात्याने माझे ऐक, तू तुझं तोंड तेवढ बंद कर. नाही तर माळी जागा होईल."
गाढव हसले," अरे मूर्खा! माझा राग ऐकून माळीच काय, या मळ्याचा मालकदेखील फुलांचा हार घेऊन माझ्या स्वागताला ये ईल."
डुकराने ओळखले, याला अधिक काही सांगण्यात अर्थ नाही. आपण आता इथून सटकले पाहिजे. तो गाढवाला हात जोडून म्हणाला," गर्दभभाऊ, मला माझी चूक कळली. तू फार मोठा गायक आहेस. मी मूर्ख गिधाड तुझ्या गळ्यात फुलांचा हार घालून सत्कार करू इच्छितो. मी ते पटकन जाऊन आणतो. मी इथून गेलो की दहा मिनिटांनी गायला सुरुवात कर. म्हणजे मी परत ये ईपर्यंत तुझे चालू राहिल."
गाढवाने अभिमानाने त्याला संमती दिली. डुकराने तिथून थेट जंगलाच्या दिशेने पळ काढला.गाढवाने तो गेल्यावर काही वेळाने गायला सुरुवात केली. त्याच्या रेकण्याच्या आवाजाने माळी जागा झाला. तो हातात काठी घेऊन आवाजाच्या दिशेने धावू लागला. ठिकाणावर पोहताच त्याने गाढवाला पाहिले आणि त्याच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. तो ओरडला," गाढवा, तूच का तो, रोज मळ्याची नासाडी करतो ते!"
मग काय! माळ्याने आपल्या हातातल्या काठीने गाढवाला बदड बदड बदडायला सुरुवात केली. काही वेळातच गाढव अर्धमेले हो ऊन निपचिप पडले.
No comments:
Post a Comment